ऋतुमती
ऋतुमतीचा अर्थ रजस्वला स्त्री.अस्सल गावठी भाषेत विटाळशी!
स्त्रीच्या वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी सुरू होऊन पार चाळीशी, पन्नाशीत संपणारी मासिक पाळी. दर महिन्याला न चुकता येऊन ठेपणारी! फक्त गर्भ राहिला तरच नऊ महिने बंद होणारे मंथली पिरीएड!
ह्या अवस्थेत तिची कंबर दुखते. अंग दुखतं. सतत रक्तस्राव होत असतो. बाहेर हिंडताना तिला अतिशय अवघडल्यासारखं होतं. तिला सतत स्पाॅटिंगची धास्ती वाटते. ती कशातच मन एकाग्र करु शकत नाही. काम करु शकत नाही. आता सॅनिटरी पॅडस् निघाली आहेत. पूर्वी तर जुन्या साडीच्या कापडाची घडी वापरावी लागायची. ती वरचेवर धुवावी लागे. वाळत घालायची चोरी! घरातल्या कुणी पुरुषानं पाहिलं तर?
आज हा विषय निघायचं कारण नाशिक जिल्ह्यातील देवळे या गावाच्या आदिवासी आश्रमशाळेत नुकतीच घडलेली एक घटना. आश्रमशाळेत वृक्षारोपण कार्यक्रम होता. एक विद्यार्थीनी ऋतुमती होती. शिक्षकांनी घोषणा केली की, जी कुणी मुलगी मासिक पाळीत असेल तिनं वृक्षारोपण करायला येऊ नये. तिला परवानगी नाही. ऋतुमती असलेल्या मुलीनं त्याचं कारण विचारलं. यावर संबंधित शिक्षकानं उत्तर दिलं,"मासिक पाळीत असलेल्या मुलीनं जर रोप लावलं तर ते जगणार नाही. जळून जाईल."
ते शिक्षक एवढंच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी त्या मुलीची उलट प्रश्न केल्याबद्दल खरडपट्टी काढली.
"तू उर्मट आहेस.आगाऊ आहेस. मला उलटी उत्तरं देतेस?शिक्षकांचा अपमान करतेस. त्यांचं ऐकत नाहीस. मी तुला शिक्षा करेन."असा दम त्या विद्यार्थिनीला दिला.
त्या मुलीच्या पाठीशी आदिवासी संघटना आणि महिला आयोग उभे आहेत. मिडियातही ही बातमी गाजली.
आता ऋतुमती स्त्रीनं झाड लावलं तर ते मरेल कसं? जळेल कसं? यामागे काही लाॅजिक आहे का?
पण अंधश्रद्धेपुढं तर्कशास्त्र काय करणार? ऋतुमती स्त्रीबद्दल अशा कल्पना फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. अगदी रजस्वला (पुष्पवती हा आणखी एक पर्यायी शब्द.) द्रौपदी च्या वस्त्रहरणाच्या काळापासून. ऋतुमतीला अपवित्र,अशुभ मानलं जातं. कामसूत्र सांगतं की रजस्वला, पुष्पवती स्त्रीचं तोंडही पाहू नये.
त्या तीन दिवसांत तिनं बाजूला बसायचं. कुणाला शिवायचं नाही. ही प्रथा पूर्वी घरोघरी होती. आजही ती खेड्यापाड्यात आढळते. आमच्या लहानपणी काही मैत्रिणींकडे "त्या बाईला कावळा शिवलाय" असं सांगायचे. चुकून एखादं लहान मूल शिवलंच तर ताबडतोब त्याच्या अंगावरचे कपडे काढून टाकले जायचे. तिनं तीन दिवस आंघोळ करायची नाही. तीनही दिवसांचे कपडे साठवून ठेवायचे. चौथ्या दिवशी ते वेगळे धुवायचे. आपलं जेवणाचं ताट आपणच घासायचं. पिण्याचं पाणी तिच्या भांड्यात वरुन ओतायचं. चौथ्या आणि पाचव्या दिवशी तिने नाहायचे. मग ती शुद्ध होऊन तिला घरात प्रवेश!
माझे वडील डॉक्टर होते. आई सामाजिक कार्य करायची. दोघं पुरोगामी विचारांचे. आमच्याकडं बाजूला बसत नसत. माझं तर म्हणणं, जशी आपण शी शू करतो. नाक शिंकरतो. लाळ थुंकतो. तसंच तीन दिवस वाहणारं रक्त हे एक उत्सर्जित आहे. ते नैसर्गिक आहे. त्यात अपवित्र काय? त्या तीन दिवसांत देवळात का नाही जायचं? त्या तथाकथित देवानंच तर दिलंय ना हे पाळीप्रकरण! स्त्रीनं ते मागून घेतलंय थोडंच! डोकं ठिकाणावर असलेली कोणतीही स्त्री ते देवाकडे मागणार नाही.
माझ्या रेडिओवरच्या करियरमधे मी ऋतुमती असताना अनेकदा रेकॉर्डिंगसाठी ऑफिसची गाडी घेऊन बाहेरगावी जावे लागत असे. नवरात्रीसाठी एक रुपक प्रोड्यूस करण्याची एकदा मला ऑफिस ऑर्डर आली. तेव्हा मी ऋतुमती होते. नाही म्हणणं शक्य नव्हतं. कारण सांगण्याची परिस्थिती नव्हती. मजबुरी होती. मी मुकाट्याने मशीन घेऊन देवळात गेले. अगदी गाभाऱ्यात जावं लागलं. देवीची पूजा,आरती सगळं ध्वनिमुद्रण केलं. पुजारी, भक्तमंडळींच्या मुलाखती घेतल्या. रुपक तयार केलं.
प्रत्यक्षात नवरात्र उत्सव सुरू झाला. मी तेव्हाही ऋतुमती होते. माझी शेजारीण माझ्याकडे आली आणि म्हणाली,"उद्या तुम्ही माझ्या कडे सवाष्ण म्हणून जेवायला या."
हे सवाष्ण प्रकरण मला कधीच पटले नाही. कुमारिका आणि विधवा यांना तुच्छ लेखून सवाष्णीलाच इतकं महत्त्व का? तिला एक पती आहे म्हणून? यात तिची कर्तबगारी काय?
शिवाय इथे मात्र समोर एक स्त्रीच असल्यान मी म्हटलं की माझे पिरीएडस् सुरू आहेत. मी चालणार नाही तुम्हाला सवाष्ण म्हणून. ती म्हणाली,"बरं झालं बाई सांगितलंत ते. मी दुसरी कुणीतरी बघते." ती पुढे म्हणाली,"तुमचं रुपक ऐकलं. छान होतं. देवीचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखं वाटलं."
मी तिला हे सांगितलं नाही की माझी "अडचण"असताना देखील मी देवीच्या गाभाऱ्यात गेले. जावं लागलं. तिला शाॅकच बसला असता आणि मी एक मैत्रीण गमावली असती.
एक प्रश्न थोडा धाडसानेच विचारते,देवी ही सुद्धा एक स्त्रीच आहे. मग एका स्त्रीची निसर्गदत्त व्यथा ती जाणू शकत नसेल का?
असो!
इत्यलम्!!
वाचने
13476
वाचनखूण
प्रतिक्रिया
40
लेखातील विचारांशी अगदी सहमत.
लेख आवडला
पुष्पवती,ऋतूमती असे सुंदर
In reply to पुष्पवती,ऋतूमती असे सुंदर by Bhakti
तेवढ government या दिवसात
In reply to तेवढ government या दिवसात by सुबोध खरे
म्हणजे काम किती? आणि पगार आणि
माझेही दोन पैसे....
लेख उत्तम, शेवटी नेमके आणि
In reply to लेख उत्तम, शेवटी नेमके आणि by अनिंद्य
आंध्र-तेलंगणा भागात प्रथमच
In reply to आंध्र-तेलंगणा भागात प्रथमच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
त्यांच्याकडे हा सोहळा पाहिला आहे.
In reply to त्यांच्याकडे हा सोहळा पाहिला आहे. by धर्मराजमुटके
टीकेचा प्रश्नच नाही. मी फक्त
In reply to टीकेचा प्रश्नच नाही. मी फक्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माझ्या मते पुर्वीच्या काळी मुलगी उपवर झाली, आई होण्यास....
कदाचित..
शिवाशिव
In reply to शिवाशिव by सरिता बांदेकर
दोन्ही बाबतीत कृती चांगल्याच
In reply to शिवाशिव by सरिता बांदेकर
माझ्या आजीनेसुद्धा मला मायेने
सवाष्ण
In reply to सवाष्ण by कर्नलतपस्वी
कविता वाचून या बाईंच्या
In reply to सवाष्ण by कर्नलतपस्वी
_/\_
अशा धाग्यांसाठी चर्चेसाठी
पाळी व देवळे
पाळी चालू असतांना सार्वजनिक देवळांत का जाऊ नये याविषयी माझं मत
In reply to पाळी चालू असतांना सार्वजनिक देवळांत का जाऊ नये याविषयी माझं मत by धर्मराजमुटके
बार्ईच्या वतीने सगळे निर्णय
आज्जी, तुस्सी ग्रेट हो!
In reply to आज्जी, तुस्सी ग्रेट हो! by सर टोबी
आजी ग्रेटशी सहमत.
मासिक पाळीत असलेल्या मुलीनं
खूप खोल विषय
घरी या गोष्टी पाळायचे केव्हाच
छान लेख आजी
आमच्या कडे पाळत नाहीत....
छान लेख आहे. माझ्या माहेरी
बाईच्या वतीने ....
मी सार्वजनिक देवळात देवदर्शनास गेलेलो असतांना मला शेजारी पाळीतली
In reply to मी सार्वजनिक देवळात देवदर्शनास गेलेलो असतांना मला शेजारी पाळीतली by धर्मराजमुटके
अगदी =
अवांतर :
उत्तम प्रतिसादाबद्दल आभार.
In reply to उत्तम प्रतिसादाबद्दल आभार. by आजी
=))))
विस्कळीतपणा ....
रोप व पाळी
आजींच्या भावनांशी आणि
लेख आवडला. शहरी धबडग्य्यात