मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अलक

मालविका · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अलक 1 "करावं तसं भरावं", या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेलं वाक्य. सहजच बसस्टॉपवर पुस्तकं विकणार्या मुलाकडून चार पुस्तकं घेतली. माझ्या घरी मी एकटाच. कामवाल्या मावशीच्या मुलांना देऊन टाकली. दोन दिवसांनी त्याच्याकडून फुगे घेतले,ऑफिसमधल्या मैत्रिणीला दिले. अशीच ओळख वाढत राहिली. काही विशेष करत नव्हतो मी. दोन दिवस ताप आला. कामवाल्या मावशी कपडे भांडीच काय दोन वेळचं जेवण पण करून गेल्या. ऑफिसलातली मैत्रिण येऊन डाॅक्टरकडे घेऊन गेली. आणि तोच बसस्टॉपवरचा मुलगा, घर शोधत आला. आज तो फुलं विकत होता. चौकशी करून जाताना चार फुलं टेबलावर ठेऊन गेला. मी करत गेलो, ते माझी ओंजळ भरत गेले. अलक 2 "नेहमी शुभ बोलावं रे, वास्तू तथास्तु म्हणत असते", आई कळवळून सांगायची. पण कधी कोणी ऐकलं नाही. इस्टेटीवरून दोन भावांत झालेली भांडणं विकोपाला गेली. "मी मेलो तरी मला बघायला येऊ नको", दोघांपैकी एकाच्या तोंडून निघून गेलं. लाॅकडाऊनमुळे धाकटा भाऊ शहरात अडकला आणि दुर्दैवाने मोठा भाऊ गावी कोरोनाने मरण पावला. धाकट्याला राहून राहून आईचे शब्द आठवत होते. पण वास्तू आधीच 'तथास्तु' म्हणाली होती. - धनश्रीनिवास

वाचने 2756 वाचनखूण प्रतिक्रिया 10

नगरी 20/07/2022 - 18:01
दोन्ही आवडल्या आणि त्या निमित्ताने अलक म्हणजे काय हे पण कळले