मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मत

!! चांडाळ चौकडी !!

अनिल हटेला ·
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

आयटीवाले....

सुचेल तसं ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गटणेंचा "आयटीतील मंदी आणखी दोन-तीन वर्षे" हा काथ्याकूट वाचत होतो. त्यावरचे काही प्रतिसाद वाचून आयटीवाल्यांवर उगीचच आगपाखड करण्यात येते असं जाणवलं. मी जवळपास दोन वर्ष मॅन्युफॅक्चरींग कंपनीत आयटी खात्यात नोकरीला होतो आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत आहे. त्यामुळे मला आयटी आणि नॉन-आयटी अशी दोन्ही ठिकाणं पहायला मिळाली. आयटीवाल्यांवर सर्वसाधारणपणे खालील आक्षेप ऐकायला मिळतात. आक्षेप क्र.१.

नामूमकीन हा चित्रपट कुणी पाहिला आहे काय?

चेतन सुभाष गुगळे ·
लेखनविषय:
चित्रपट :- नामुमकीन (१९८९) दिग्दर्शक :- हृषिकेश मुखर्जी गीतकार :- आनंद बक्षी संगीतकार :- राहूल देव बर्मन गायक :- किशोर कुमार गायिका :- लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल अभिनेते :- डॉ. श्रीराम लागू, संजीव कुमार, ओम शिवपुरी, राज बब्बर, विनोद मेहरा अभिनेत्री :- झीनत अमान सदर चित्रपट आपल्यपैकी कोणी पाहिला आहे काय? असल्यास तो आपल्याला आवडला का? तसेच हृषिकेश मुखर्जी ह्यांचे इतर अनेक चित्रपट गाजले. (जरी तिकीटबारीवर चालले नसले तरी त्यांच्याबद्दल कुठेना कुठे काहीतरी छापून आले आणि ते चर्चेत तरी राहिले) परंतू या चित्रपटाविषयी फारशी चर्चा होताना कुठे आढळत नाही. याचे कारण काय असावे?

यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग २

छोटा डॉन ·
तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु. पहिला भाग तुम्हाला " यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... " येथे पहायला मिळेल. ह्याच लेखाला तुम्ही पर्यायाने टारुबाबाच्या "अवांतर प्रतिसादांवर उपाय ह्याचाही "भाग-२" म्हणु शकता. असो.

शत सर्व्हर शोधताना...

नीलकांत ·
काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे. गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता.

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

छोटा डॉन ·
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

गांधीवाद्याची थप्पड

भास्कर केन्डे ·
लेखनविषय:
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

अनाम वीरा ...

मैत्र ·
लेखनविषय:
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

श्रावण मोडक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे. मूळ लेख आणि २ व चर्चा लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे.