शत सर्व्हर शोधताना...
काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे.
गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता. नवा घेणे गरजेचे आहे मात्र सर्व्हरची प्रोसेसिंग पावर जास्त असलेला सर्व्हर शोधणे आवश्यक होते. कारण मिपासारखी संकेतस्थळे जागा कमीच व्यापतात, त्यांना बॅन्डविड्थ जास्त हवी असते. आणि ज्या कोअर वर मिपा आहे त्यासाठी प्रोसेसर जास्त क्षमतेचा हवा असतो. ह्या प्रोसेसरचा भाग सहसा शेअर्ड होस्टींगमध्ये कमी असतो. नवीन सर्व्हर शोधतांना अश्या ठराविक गरजा असतांना अनेक पर्याय समोर आले. त्यापैकी काही अंतीम निवडीत होते.
पैकी आता निवडलेला उत्तम आहेच मात्र हा सर्वोत्तम नाही. जस जसा मिपाचा युजरबेस वाढत जाईल तसतसा मिपाच्या क्षमता वाढवण्याची गरज भासत राहील.
यावेळी माझ्या मनात आलेली एक बाब म्हणजे मिसळपावने काही अंशी तरी स्वत:चा खर्च स्वतः उचलायला हवा. मी असं म्हटलेलं कदाचीत तात्यांना आवडणार नाही, मात्र हे खरं आहे की मिसळपावला आता खर्च वाढता आहे. तो केवळ एकट्याने करावा यात म्हणावे तसे लॉजीक दिसत नाही. मिसळपावची क्षमता वाढतेय, लोक येताहेत याचा आनंद व्हायला हवा आणि एवढे लोकप्रिय संकेतस्थळ काही प्रमाणात तरी स्वतःचा खर्च उचलण्याच्या लायक व्हावे असे मला वाटते. लोकांना त्रास न होता असे करण्याचे पर्याय आहेत.
उद्या कुठल्याच कारणाने मिपाचे नुकसान होऊ नये आणि मिपाचा सदस्य या नात्याने मिपा अधीकाधीक समृध्द व्हावं असं मला वाटतं. एकहाती तात्या हा डोलारा सांभाळू शकतात मात्र काही मार्गांनी याकार्यात मदत झाली तर बरंच होईल ना?
शेवटी काय घ्यायचा तो निर्णय तात्या घेतील, मी माझं मत मांडलेलं आहे.
मिसळपाव च्या नवीन सर्व्हरमुळे काही बदल जाणवतो का? अर्थात खरा कस एकाच वेळी प्रचंड प्रमाणात पाहूणे आल्यावरच लागेल :(
तुमच्या काही सुचना असतील तर येथे द्या अथवा सरपंचाना व्यक्तिगत निरोप पाठवा.
नीलकांत
वाचने
9739
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
नीलकांत राव
अवश्य
In reply to अवश्य by विकास
वास्तवीक
च्यामारी, "
In reply to च्यामारी, " by विसोबा खेचर
दर ठरवण्याची पद्धत
- लेख लिहीणारे,
- चर्चा चालू करणारे
- चर्चेत वाद घालणारे
- चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
- कविता करणारे
- विडंबने करणारे
- मिपावरील कवितांची विडंबने करणारे
- एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
- चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
- शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
- धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे
आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे- कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!
हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)In reply to दर ठरवण्याची पद्धत by विकास
>>कुठल्यातर
In reply to दर ठरवण्याची पद्धत by विकास
सगळ्यात जास्त वर्गणी यांना ठेवा
जे काही ठरेल
सर्वमताने
In reply to सर्वमताने by यशोधरा
+ १
In reply to सर्वमताने by यशोधरा
+१
In reply to सर्वमताने by यशोधरा
मदत
In reply to सर्वमताने by यशोधरा
+१
एड सेन्स
वर्गणी?
In reply to वर्गणी? by नीलकांत
ठीक
In reply to वर्गणी? by नीलकांत
पेक्षा कॅपचा
याच वेळी
मला असे वाटते
थोडी बन्धने
In reply to थोडी बन्धने by मुक्तसुनीत
???
मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र
In reply to मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र by अभिजीत
+१
सर्वंच्या
पेपॅल
In reply to पेपॅल by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
बहोत बहोत
फेक आय डि
वर्गणी प्रमुख
In reply to वर्गणी प्रमुख by परिकथेतील राजकुमार
तुझ्याकडे जी वर्गणी
क्षमता
आम्हाला
स ह म त
कार्यक्षम
तात्या, आता बर्या बोलाने
मिपा
मिपाची सदस्यसंख्या
सर्वर बदलानंतर काही निरीक्षणे
In reply to सर्वर बदलानंतर काही निरीक्षणे by चतुरंग
हेच म्हणते..
सगळ्यांच्