पण माझ्या बाबांनी, जराही का कू न करता ते पाणी भातावर घेऊन खाल्लं. तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती.
क्या बात है! जियो...!
प्राजू, छोटेखानी परंतु सुंदर लेख. अगदी मनापासनं लिहिलेला वाटतो आहे!
कविताही छान आणि बोलकी आहे...!
आपला,
(मातृभक्त) तात्या.
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं. जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.
आमच्या घरात मी आणि माझी बहीण आहोत माझे बाबा दुप्पट सुखी आहेत .
;;)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
प्राजु, मस्तच लेख लिहिला आहेस. आता लवकरच माझ्या बाबांबद्दलचे लेखन माझ्या ब्लॉगवर आले तर नवल राहणार नाही.. :)
>मला दिलेल्या रूपयांचा बाबांनी कधीही हिशोब मागितला नाही की, पैसे कशाला हवेत असं विचारलं नाही
माझ्याहीबद्दल असेच झाले.बाबांनी कधी हिशेब विचारायचीच वेळ आली नाही कारण तो त्यांनी विचारण्यागोदरच त्यांच्याकडे पोहोचलेला असायचा आणि आजही पोहोचतो. मी त्यांच्यापेक्षा हिशेबात पक्की निघाल्याने उलट हिशेबतपासणी मात्र नेहमी झाली...आजही होते .. म्हणजे मी बाबांना हिशेब विचारण्याची आणि ती त्यांनी राजरोसपणे देण्याची ! अर्थव्यवहारातले कळायला लागल्यापासून तो सगळा प्रकारच मला संभाळायला घेतला शेवटी मी बाबांकडून... त्यांना समजवण्यापेक्षा ते तरी सोपे ! त्यांच्याकडून मार्गदर्शन होत असतेच म्हणा वेळोवेळी... :)
सुंदर लिहिले आहेस...
एक एक प्रसंग कसे डोळ्यासमोरून जातात.
बाबा रिझर्वेशन न मिळाल्यामुळे मुंबईहून माझ्यासाठी गाड्या बदलत.. रात्रभर हेक्टीक प्रवास करत.. इचलकरंजीत पोचले होते. तेव्हा डोळे भरून यण्या इतकी मी मोठी नब्व्हते किंवा बाबांनी आपल्यासाठी वेगळं काहीतरी केलं याचीही जाण नव्हती.
खरे आहे त्यावेळी आपल्याला जाणीव नसते, पण त्याची खरी किंमत आता जाणवते... आपण मोठे झाल्यानंतर...
कविता छान आहे..
सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी
आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..
ख-या अर्थाने आज तुम्ही आपल्या वडिलांचे आभार व्यक्त केले आहेत...
प्राजु... खरोखर मनापासून आवडले लेखन !
तु खुप भाग्यवान आहेस...
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं
उत्कृष्ट.....
मलाही आवडेल जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळवायला... :)
मुलीला बाबा इतका जवळचा मित्र नसतोच. पिता आणि बाबा या दोन शब्दांमध्ये हाच तर फरक आहे.. पितृत्व हे नाकारता येतं पण "बाबापण" हे मायेनं वेढलेलं असतं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छान लिहिले आहेस प्राजू! आमटीचा किस्सा तू आधी सांगितला होता. तुझे बाबांचे प्रेम छान दिसून येते. :)
मी पिता पुत्रात भांडणं झालेली खूप पाहिली आहेत. पण मुलगी आणि वडील यांचं भांडण कधीच नाही पाहिलं.
मी पाहिली आहेत, जवळच्या नात्यात वितुष्ट आले की खूप कडवटपणा येतो...आरुषी आणि रमेश तलवार हयांचे पण नाते फार चांगले होते असे वाटत नाही....खूप उदाहरणे आहेत अशी. तू भाग्यवान आहेस खरच!
जसं आई होणं हे स्त्रीसाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं तसं एका मुलीचा बाप होणं हे एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं असं मी म्हणेन.
तुझ्या भावनांचा आदर राखूनही मला वाटते की हे नेहमीच खरे नसते, थोडे ओव्हर-जनरलायझेशन होते आहे. तसे असते तर एवढ्या स्त्री भ्रुण हत्या का झाल्या असत्या? प्रत्येक पुरुषासाठी हे वेग-वेगळे असावे असे वाटते. शिवाय - हे (एका पुरूषासाठी जगातलं सगळ्यात मोठं सुख...) पुरुषानेच सांगितले तर बरे नाही का? :)
प्राजु मस्त लिहिले आहेस तुझ्या बा॑बा बद्दल.
माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात आणि ते आठवुन आज ही माझे डोळे पाणवतात.
खूप सुंदर लेख लिहीला आहेस.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
अगदी सुरेख..
अस्सेच आहेत माझेही बाबा...खूप आठवण करुन दिलीस गं....
बाबांचं काम सगळं भव्यदिव्यचं असतं.
अगदी अगदी ११ खोल्यांच घर होतं माझं......
सगळे प्रयोग बाबांवरच होत असत.
हेही १००% खरं बिचार्यांना काय काय पदार्थ खावे लागलेत...पिझ्झा केला होता मी पहिल्यांदा इतका जळला होता..पण चांगला लागतोय म्हणून खाल्ला बिचार्यांनी.....आई म्हणाली माझी पोळी थोडी जळली की म्हणता आज पोळी बनवताना पोटातले गॅस निघून जावे ह्या उद्देशाने बनली वाट्टं आणि पोरीने कसंही बनवलं तरी चालतं... तर म्हणाले, लाडकी लेक काय असते ते फक्त मलाच माहीत तिने काहीही वाढलं तरी ते किती चविष्ट लागतं हे समजायला मी होऊन पहा......
खूप खूप आठवणी आल्या...इतक्या सुंदर लेखासाठी तुझं अभिनंदन! कविताही खूपच छान!
तुझ्या आणि बाबांमधल्या नातेसंबंधाचा एक हळवा पट अवचित उलगडला आहेस.
तो स्वयंपाक कसा झालाय यापेक्षासुद्धा तो मी केला होता म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीने... ही भावना जास्ती होती
क्या बात है! खरं आहे. हे फक्त बाबाच करु शकतात.
तुझी कविताही उत्स्फूर्त आहे, सुंदर आहे!
वडील-मुलगी हे नातंच फार वेगळं आहे, खूप गुंतागुंतीचं आणि त्याच वेळी साधं, सोपं आणि सरळ असं मला वाटतं! माझे बाबा मला जे निकष लावत त्यातून माझ्या बहिणीला त्यांनी कित्येकवेळा सूट दिलेली दिसली की मी त्यांच्याशी भांडे पण मोठा झाल्यावर हळूहळू समजू लागले की बाप-लेक नात्यात तर्काचे नियम नव्हे तर भावनांचे गोफ असतात.
एकाचवेळी आपल्या मुलीबद्दल, तिच्या कर्तृत्त्वाबद्दल गाढ विश्वास असणारे बाबा मनात कुठेतरी तिच्याबद्दल काळजीने धास्तावलेले असतात. तसं दाखवणं हे त्यांना मनानं मान्य नसतं पण ते न दाखवण्याइतकं राजकारणीही त्यांना होता येत नाही!
चतुरंग
ए प्राजु मस्तच लेख लिहीलास बघ! ... माझे बाबा पण अस्सेच आहेत!! कधीही हिशोब मागितला नाही, कायम विश्वास दाखव्ला माझ्यावर, अपयशाच्यावेळेला एक मस्त पत्र लिहून एन्करेज केले होते त्यांनी मला.. बाबांचा कायमच आधार वाटतो मला...
शितलशी पण सहमत.. कधीही डोळ्यातून पाणी न काढणारे बाबा , त्या दिवशी इतके रडले.. मी बघायचच टाळत होते..
आईची बँगलोर ला बदली झाली होती मी १ वर्षची पण नसेन तेव्हा.. ते १-१.५ वर्ष बाबांनीच सांभाळल मला न दादा ला.. मी म्हणे तेव्हा बाबांनाच आई म्हणायचे ! :)
तुमच्या वडिलांवरून "फादर ऑफ द ब्राईड" सिनेमामधल्या वडिलांची आठवण झाली..
तो सुद्धा अतिशय सुंदर सिनेमा. वडिलांच्या मनाची मुलीच्या लग्नामुळे झालेली अवस्था अतिशय तरल पणे दाखवली आहे. अर्थात एका हिंदी सिनेमाने त्याची कॉपी करून करायच ते कडबोळ केलच.
आवडला. प्रामाणिकपणामुळे , साधेपणामुळे सुंदर झाला आहे.
या विषयावरून आठवले. "बापलेकी" या नावाचा लेखसंग्रह अलिकडे प्रकाशित झाला आहे. बाप-मुलीचे नाते हा या सर्व लेखांमधला धागा. अनेक चांगल्या लेखिका, अभिनेत्री आणि इतर क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांनी आपल्या वडीलांबद्दल लिहीलेले आहे. सर्वच लेख "काँग्रॅचुलेटरी" नाहीत. उदा. ना सी फडक्यांच्या मुलीने लिहिलेला लेख एक बाप आणि पती - आणि पर्यायाने एक व्यक्ती म्हणून फडक्यांची काळीकभिन्न बाजू दाखविणारा आहे. (असे लेख लिहायला प्रचंड धैर्य एकवटावे लागले असणार !) काही लेख वडीलांनीही मुलींबद्दल लिहीलेले आहेत. विजय आणि प्रिया तेंडुलकर या दोघांचेही लेख अत्यंत सुंदर झालेले आहेत ! पद्मजा फाटक, जाई निम्बकर, सई परांजपे सारख्या लोकांनी हजेरी लावलेली आहे. साडेचारशे पानांचा एक उत्तम दस्तावेज.
सुंदर लेख लिहीला आहेस. कविता पण छान. आमटीचा प्रसंग तर खासच.
>>माझे लग्न झाल्यावर पाठवणीच्या वेळी माझ्या प॑पाचे रडुन रडुन लाल झालेले डोळे अजुन आठवतात - शितल
माझे ही बाबा पाठवणीच्या वेळी असेच रडले होते. आईपेक्षा ही तेच जास्त रडले. आणि अजूनही जेव्हा केव्हा दिड दोन वर्षानी भारतात जाणं होतं त्या वेळी मी परत निघताना त्यांना रडू आवरत नाही. तिच स्थिती नवर्याची. एरवी कधीही डोळ्यात पाणी येणार नाही . पण गमतीत ७ वर्षाच्या मुलीचा लग्नाचा विषय काढला की लगेच त्याचे डोळे पाणावतात.
>> १५ जून हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. कधी पासून ते नाही माहिती.
अमेरिका मध्ये पहिला फादर्स डे १९ जून १९१० ला साजरा केला...स्पोकेन, वॉश्गिंटन येथे.
अमेरिकेत आणि बर्याच इतर देशात दरवर्षी जून च्या ३ र्या रविवारी फादर्स डे असतो. या वर्षी ३ रा रविवार १५ जून ला आला आहे. काही देशात जून च्या २ र्या रविवारी असतो.
ईश्वरी
'माता देवो भवो' वर अनेकदा भरभरून लिहीले जाते. आणि वडील मात्र बहुतेकवेळा 'अन् संग हिरो'च राहतात. आईचे महत्व असतेच आभाळाएवढे पण त्याच बरोबर वडीलही संपूर्ण संसारावर 'निळी छत्रीवाले' बनून राहतात.
डॉक्टरांचे बील नको म्हणून अंगावर आजारपण काढणारे, शर्ट शिवला की एक एक्स्ट्रा कॉलर शिवून घेणारे (कॉलर जूनी झाली, फाटली तर ही जास्तीची कॉलर शर्टाला शीवून तोच शर्ट वापरता येतो. तेवढ्यासाठी नवीन शर्टाचा खर्च नको, हा विचार), कर्तव्यकठोर आणि तरीही मुलांच्या बाबतीत हळवे वडील मलाही लाभले होते.
सगळ्याच वडीलांना मुलांपेक्षा मुली जास्त जवळच्या असतात. ह्याला कारण त्या आई-वडीलांना सोडून सासरी जाणार असतात. मुली बर्यापैकी संवेदनशील असतात. वडीलांच्या भावना, त्यांच्या मनातील विचार शब्दाविना ओळखतात. मुलांचे तसे नसते, लहानपणी ती हूड असतात, भावना ओळखण्याच्या कोमल संवेदनेपेक्षा व्यवहारातला रोखठोकपणा त्यांना जास्त भावतो. रफ अँड टफपणा त्यांच्या ठायी नैसर्गिकपणे असतो. आणि त्याहूनही भावना ओळखल्या तरी त्या नजरेतून दाखविण्याची, शब्दांतून मांडण्याची आवश्यकता त्यांना भासत नाही/जमत नाही. मुलांकडे बघण्याचा आई-वडीलांचा दृष्टीकोन लहानपणा पासूनच वेगळा असतो. त्याला वेगळ्या पद्धतीने वाढविले जाते. त्यालाही संवेदना असतात. वडीलांची शिस्त आणि आईचे प्रेम त्यालाही दिसते. त्याला वडीलांबद्दल आदर वाटला तरी वडीलांची सक्षमता त्याला जाणवते आणि त्यातल्या त्यात दुर्बल आईकडे तो प्रेमाने आकर्षित होतो. तिचा संरक्षक बनतो. असो.
ह्या विपरीतही अनुभव येऊ शकतात ह्याची जाणीव आहे. पण जनरली मुली वडीलांकडे आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात.
प्राजू, लेख मनाला भिडणारा आहे. अभिनंदन.
अवांतरः सुदैवाने किंवा दुर्दैवाने मला मुलगी नाही. ह्याची खंत अनेकदा वाटते पण मुलगी नाही ह्याचा आनंदही होतो कारण तिचे 'सासरी' जाणे मला झेपले नसते.
आणि मुलगे आईकडे आकर्षित होतात.
सहमत आहे...!
बाप आता वारला बिचारा! त्याचा खूप जीव होता माझ्यावर. मलाही त्याच्याबद्दल खूप आदर अन् प्रेम वाटे. परंतु कधी त्याची भक्ति नाही केली! भक्ति हा प्रकार काही निराळाच असतो! ती फक्त आईचीच केली आजतागायत! :)
बाप कितीही चांगला अन् प्रेमळ असला तरी मांडीवर डोकं ठेवायला आईच पाहिजे, डोक्यावर तेल थापायला आईच पाहिजे! :)
आपला,
(कट्टर मातृभक्त!) तात्या.
प्राजु, मस्तच लिहिले आहे तुम्ही. माझ्या बाबांनीही आमच्यासाठी खूप काही केले.
मी १०वीत असताना माझे बाबा ज्या कंपनीत होते ती बंद पडली. त्या नंतर ते काही दिवस घरी होते. आणि रोज दुपारी घराच्या बाल्कनीत बसून दूरवर काही तरी बघत आपल्याच विचारात असायचे. तेव्हा काय कळणार, आज माझा स्वतःचा संसार उभा राहिल्यावर मला थोडी थोडी कल्पना येत आहे त्यांच्या मनात काय विचार येत असतील तेव्हा, अर्ध्या संसारात असा आघात झाल्यावर.
बोट तुझे धरूनी पाऊल माझे स्थिरावले..
मायेच्या वर्षावात माझे बालपण विसावले..
छोटी पोळी , छोटा भात... वरण इवलसं
बाहुलीचं घर आपण बांधलं.. ते ही इवलसं..
क्षितिजाच्या पारचे विश्व मला तू दाखवले
पंखामध्ये बळ घेऊनी.. मी आभाळाकडे झेपावले
सारे जन्म तुमच्या पोटी घ्यावे.. हेच स्वप्न उराशी
आशिर्वाद तुमचे राहोत सदैव माझ्या पाठिशी..
प्राजुताई, मला कविता वगैरे करता येत नाहित, तेव्हा तुमच्या परवानगीशिवाय, ह्या ओळी माझ्याही बाबांसाठी, माफ कराल अशी आशा आहे कारण मला वाटते की ह्या ओळी केवळ तुमचेच बाबा नाही तर 'बाबा' ह्या नात्याबद्दल आहेत.
बिपिन.
सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा लेख मी खरंच मनापासून लिहिला आहे.
माझ्या सगळ्या मिपा परिवाराला फादर्स डे च्या आतापासूनच शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
बाबांवरचा उत्कटतेने लिहीलेला लेख आवडला. ड्रेसची आठवण आवडली.
असे कुठेतरी वाचले आहे की वडिलांनी मुलींना प्रेमाने प्रोत्साहन दिले, त्यांच्या वाढीत सक्रिय सहभाग घेतला, सांभाळून घेतले तर मुलींचा जगात वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. म्हणजे आईने ते करायची गरज नाही असा नव्हे!
प्राजुताई खरच सुंदर आहे हा लेख.....
माझ्या बाबांबद्दलच्या माझ्या भावना:--
माझ्या वडीलांमुळेच मी आज इथ पर्यन्त पोहचु शकलो आहे...आईच प्रेम असतच पण वडीलांच हे प्रेम मात्र मुलासाठी न बोलताही सबकुछ अस असत.....
लहानपणी मी व माझे बाबा बर्याच वेळी बुद्धीबळ खेळायचो ..मला हा खेळ काही आवडायचा नाही कारण,,, १ नाही तर सलग अनेक खेळ मी हारायचो..सगळी कडुन कोंडी करुन माझे वडील काही चालीतच मला गारद करुन टाकत्...मी मग भरपुर चिडायचो...त्यांना सांगायचो..एकदा तरी तुम्हाला मी हरवणारच !!!!!.....आणि मला जिंकण्याचा आनंद देण्यासाठी ते मग एखादा डाव अगदी सहजपणे हारत.
लहानपणी मला सायकल शिकवताना त्या मागे धावणार्या माझ्या बाबांनी मला अता पर्यन्त बरच काही शिकवल आहे आणि अजुनही मी त्यांच्या कडुन शिकतच आहे...
कधी प्रेमळ तर कधी कठोर होऊन त्यांनी मला नेहमी योग्य तेच कसं कराव आणि वागाव ते समजवल...
माझ्या बाबांबद्दल लिहाव तेवढ कमीच आहे...
फक्त एवढच म्हणतो... की गेले कित्येक जन्म मी भरपुर पुण्य कमवल असणार म्हणुनच या जन्मी मला असे बाबा आणि आई मिळाले.
(पितृछाया प्रेमी)
मदनबाण.....
हेच म्हणतो.
सुरज बडजात्याच्या सिनेमातील गाणे, भारतात असताना तो सिनेमा, गाणे मी बघीतले किंवा ऐकले ही नसते. एनी हाउ.. हे गाणे "ते शब्द ऐकल्यावर" डोळे जरा पाणावले होते.
प्रतिक्रिया
सुंदर..
मी पिता
मी पण...
मस्तच !
प्राजु,
सुरेख
ख-या
सुंदर....
फारच सुरेख !
खरंय..
छान!
छान लिहिले आहेस प्राजू
छान.
असेच म्हणतो
हेच म्हणतो
प्राजु
छान लिहिलं आहेस प्राजू!
अगदी खरं
`बाबापण`
प्राजु..
हृदयातून
ए प्राजु
फार सुरेख लेख..
छान
चांगला लेख.
मस्त !!!
सुंदर लेख
सुंदर.....
सहमत..
बाबा...
प्राजुताई...
आपल्या
सुरेख
सुरेखच.....
हृद्य लेख!
+१
बाप-लेकीचे प्रेमच वेगळे....
वा!