मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

सूर्य पाहिलेला माणूस-नाटक

Bhakti ·
A मी एक ठार सूर्य वेडी आहे.दूर डोंगरावर जाऊन होणारा सूर्योदय पाहणं माझ्या आयुष्यातील मोलाचे क्षण आहेत.सूर्यनमस्काराने माझ्या शरीरातील चैतन्याचे नातं त्यांच्याभोवती फिरत राहतं.सर्वत्र त्यांच्या उष्णतेची दाहकता नाही तर ऊब..स्निग्ध ऊब सृष्टी धारण करत असते.खुप लहानपणीच मी 'सूर्य पाहिलेला माणूस ' या वेग

गीतारहस्य चिंतन-२

Bhakti ·
गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.

क्रिकेटचा इसाप हरपला

जे.पी.मॉर्गन ·
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.

गीतारहस्य चिंतन-१

Bhakti ·
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका

Lessons in Chemistry!

लई भारी ·
बऱ्याच दिवसांनी एक चांगली heartwarming सिरीज बघितली. ८ भागांच्या ह्या सिरीज मध्ये ६० च्या दशकातील अमेरिकेतील काळ उत्तम उभा केला आहे. Brie Larson(Captain Marvel फेम) ने Elizabeth Zott हे केमिस्ट्री मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या पण विविध कारणांमुळे डावलले गेलेल्या आणि नंतर एक यशस्वी पण वेगळा कुकिंग शो चालवणाऱ्या कणखर स्त्रीचे पात्र साकारले आहे. सुरुवातीला तिच्या पात्रात एक टिपिकल आढ्यता जाणवते. थोडा एकसुरीपणा सुद्धा वाटू शकतो. पण हळू हळू कथेसोबत तिचा अभिनय पण उलगडू लागतो.एका चांगल्या कादंबरी चे रूपांतर असल्यामुळे कथा छान आहेच, पण सगळ्यात जास्त मला काही संवाद आणि पंच लाईन्स खूप आवडल्या.

मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला

Bhakti ·
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड! आ मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पह

एका तेलियाने(ऐसी अक्षरे-२२)

Bhakti ·
पुस्तकाचे नाव -एका तेलियाने लेखक - गिरीश कुबेर अ शेख अहमद झाकी यामिनी या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे.

अपघात टळला तो प्रवास

पराग१२२६३ ·
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

उस्ताद झाकिर हुसेन - भावपूर्ण श्रद्धांजली

मूकवाचक ·
उस्ताद झाकिर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे याचा विचार करत होतो. युट्युबवरच्या काही चित्रफितींचा क्रमबद्ध वापर करत उस्तादजींच्या अष्टपैलू तबलावादनाचा आढावा घ्यावा असे वाटले. त्या दिशेने केलेला हा प्रयत्न. एकल तबला वादनः उस्ताद झाकिर हुसेन यांचे एकल तबलावादन ऐकताना वादनाची सुरूवात ज्या पेशकार या प्रकाराने होते, त्यात दिसणारी त्यांची कल्पकत बेजोड होती.