Skip to main content

कृष्णाच्या गोष्टी-८

लेखक Bhakti यांनी बुधवार, 24/07/2024 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
*धर्मराज्य स्थापना देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते. एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 20/07/2024 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.

कृष्णाच्या गोष्टी-७

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 16/07/2024 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
*स्यमंतक मणी रुक्मिणी नंतर कृष्ण कुटुंबात मान होता तो सत्यभामेला! ती सुंदर होती पण राजकन्या नव्हती. द्वारकेतील सत्राजित नामक एका यादव गणप्रमुखाची ती मुलगी होती. एका अलौकिक कथेप्रमाणे सत्राजिताने सूर्य देवाला प्रसन्न करून स्यमंतक नावाचा एक मणी प्राप्त करून घेतला होता. तो एक विशेष प्रकारचा मणी होता जो रोज दोन तोळे सुवर्ण निर्माण करत असे.असे रत्न गणप्रमुख ऐवजी राजाच्या आगार संघप्रमुखाच्या पदरी असावे म्हणून कृष्णाने सत्राजितच जवळ त्या मणीची मागणी केली पण त्याने चक्क नकार दिला.

पवनाकांठचा धोंडी (ऐसी अक्षरे-१९)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 13/07/2024 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
1 गो.नी.दांडेकर हे शिवकालीन गडांचेच नाहीतर त्याकाळच्या भोळ्याभाबड्या पण निष्ठावान लोकांचेही अभ्यासक! असाच शिवाजीमहाराजांनी इनाम दिलेली तुंगी गडाची हवालदारकी आणि पवनाकाठची दहा एकर जमीन यांचा वारस धोंडी ढमाले! गोनीदां आपल्याला कोंडीच्या शेतातच नेतात.अगदी जसे भूमितीचा अभ्यास करून सरळ योग्य अंतरावरच्य

कृष्णाच्या गोष्टी-६

लेखक Bhakti यांनी रविवार, 07/07/2024 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
*बलराम कृष्ण हरी शिक्षण A बालपण आणि किशोर अवस्था ही नंदाघरी गोकुळात गेले.

कृष्णाच्या गोष्टी-५

लेखक Bhakti यांनी शनिवार, 29/06/2024 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण बलरामांचे वृंदावनातील अनेक पराक्रम मथुराधीश कंसाच्या कानी गेले. प्रलंबवधानंतर कंस थोडा घाबरलेला होता. त्यातच मथुरेला भेट देणाऱ्या नारदाने कंसाला सांगितले रामकृष्ण दुसरे तिसरे कोणी नसून वसुदेव देवकीचेच सातवे पुत्र आणि आठवे पुत्र आहेत आणि यादवांच्या कुलगुरूंच्या म्हणजेच गर्ग ऋषींच्या भविष्याप्रमाणे वसुदेवाचा कृष्ण हा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे. कंस वसुदेवावर भयंकर चिडला याबाबतीत काय करावे यासंबंधी निर्णय घेण्यासाठी यादव,वृष्णी आणि भोज या कुलातील मांडलिक गणप्रमुखांची एक गुप्त सभा एका मध्यरात्री त्याने बोलवली.

कृष्णाच्या गोष्टी-४

लेखक Bhakti यांनी बुधवार, 26/06/2024 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
*रासलीला अ कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

तांडव (ऐसी अक्षरे -१८)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 08/06/2024 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
तांडव-पुस्तक परिचय लेखक-महाबळेश्वर सैल अ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.

नाळ २-मराठी सिनेमा

लेखक Bhakti यांनी शनिवार, 18/05/2024 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
क समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं. त्याच चैत्याची मोठी झाल्यावर एकाच नाळाने ज

( लपविलास तू तगडा खंबा – डोम्बलडन )

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 09/05/2024 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
“सहा महिन्यापूर्वी बाबूनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला. हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच थंडी पडायला सुरुवात होईल. उत्तरेत थंडी पडली सुद्धा. वीस डिसेंबरपर्यंत मुंबईत गारवा येईलच. वाईनबाजारात निरनिराळ्या प्रकारच्या रम दिसत असतील. पण थंडी पडायला लागल्यावर वाईनबाजारात ओल्ड मन्कचा तुटवडा निर्माण होणार आणि त्या ओल्ड मन्कचा आस्वाद हवाहवासा वाटत राहणार. म्हणून उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ओल्ड मन्कची चव घेऊन घेऊन तृप्ती करून घ्यावी म्हणून थंडी संपण्यापूर्वी शेवटचा ओल्ड मॉन्कचा क्रेट मी" अपना वाईन शॉप" मधून विकत घेतो.