Skip to main content

द स्टोरीटेलर (सिनेमा)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 07/03/2025 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा..

शिक्षण आणि विटाळ पाळणे

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 23/02/2025 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात.

गीतारहस्य चिंतन -३

लेखक Bhakti यांनी शनिवार, 15/02/2025 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
#गीतारहस्य प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र "तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०) "म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात." योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे. कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार. ' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय. कर्म कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.

सूर्य पाहिलेला माणूस-नाटक

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 13/02/2025 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
A मी एक ठार सूर्य वेडी आहे.दूर डोंगरावर जाऊन होणारा सूर्योदय पाहणं माझ्या आयुष्यातील मोलाचे क्षण आहेत.सूर्यनमस्काराने माझ्या शरीरातील चैतन्याचे नातं त्यांच्याभोवती फिरत राहतं.सर्वत्र त्यांच्या उष्णतेची दाहकता नाही तर ऊब..स्निग्ध ऊब सृष्टी धारण करत असते.खुप लहानपणीच मी 'सूर्य पाहिलेला माणूस ' या वेग

गीतारहस्य चिंतन-२

लेखक Bhakti यांनी शनिवार, 08/02/2025 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.

क्रिकेटचा इसाप हरपला

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 06/02/2025 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.

गीतारहस्य चिंतन-१

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 04/02/2025 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका

Lessons in Chemistry!

लेखक लई भारी यांनी मंगळवार, 28/01/2025 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांनी एक चांगली heartwarming सिरीज बघितली. ८ भागांच्या ह्या सिरीज मध्ये ६० च्या दशकातील अमेरिकेतील काळ उत्तम उभा केला आहे. Brie Larson(Captain Marvel फेम) ने Elizabeth Zott हे केमिस्ट्री मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या पण विविध कारणांमुळे डावलले गेलेल्या आणि नंतर एक यशस्वी पण वेगळा कुकिंग शो चालवणाऱ्या कणखर स्त्रीचे पात्र साकारले आहे. सुरुवातीला तिच्या पात्रात एक टिपिकल आढ्यता जाणवते. थोडा एकसुरीपणा सुद्धा वाटू शकतो. पण हळू हळू कथेसोबत तिचा अभिनय पण उलगडू लागतो.एका चांगल्या कादंबरी चे रूपांतर असल्यामुळे कथा छान आहेच, पण सगळ्यात जास्त मला काही संवाद आणि पंच लाईन्स खूप आवडल्या.

मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला

लेखक Bhakti यांनी शनिवार, 25/01/2025 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड! आ मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पह

एका तेलियाने(ऐसी अक्षरे-२२)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 27/12/2024 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नाव -एका तेलियाने लेखक - गिरीश कुबेर अ शेख अहमद झाकी यामिनी या पुस्तकाच्या २००९ पासून २०२३ पर्यंत, सतरा आवृत्ती निघाल्या आहेत. गाथा इराणी' या पुस्तकानंतर आखाती देशांबद्‌दल एक कुतूहल निर्माण झालेच आहे.