देव्हारा...२
देव्हारा...२
"म्हणजे! हुशार, सुंदर, बोलकी. पण तू एकटीच! त्या आदेश आणि अभिजितला नको हं!" तो बजावत म्हणाला.
"का?" तिने आश्चर्याने विचारले.
"हे बघ, आमचा ग्रुप खुप शिस्तप्रिय आणि अभ्यासू आहे." तो फुशारकी मारत उत्तरला. त्याच्यापासून पिच्छा सोडवावा म्हणून तनूने वह्या आवरल्या आणि ती लायब्ररीबाहेर आली. संदिप पण तिच्या पाठोपाठ बाहेर आला. ती काही बोलली नाही याचा अर्थ त्याने होकारार्थी घेतला.>>>>
"आता तूच बघ ना, आदेश ठिक आहे. पण तो आहे त्या अभिजितचा जानी दोस्त! आणि अभिजित म्हणजे... श्रीमंत बापाचा लाडावलेला कार्टा! काहीतरी ताळतंत्र आहे का त्याला?
देव्हारा...१
देव्हारा...१
तनूने प्रोफेसरांची नजर चुकवून हळूच हातातल्या घडयाळाकडे बघितले. लेक्चर संपायला अजून पंधरा मिनीट अवकाश होता. तिने दाराकडे पाहिले. अभिजीत बाहेर पण आलेला नव्हता. बळजबरी ती लेक्चरमधे मन गुंतवू लागली. मागच्या बेंचवर बसलेल्या आदेशला तिचा अस्वस्थपणा लगेच लक्षात आला. अभिजित आज पण उशीरा येणार हे त्याला माहित होते. तो मनापासून हसला.
अभिजीत, तनिष्का,आणि आदेश या तिघांची घट्ट मैत्री होती. तिघेही मॅनेजमेंटचे विद्यार्थी! आदेश आणि तनिष्का मध्यमवर्गीय परिवारातील तर अभिजीत गर्भश्रीमंत बापाचा मुलगा! त्याची सर्व तर्हाच न्यारी होती.
मृगजळ...
अख्खा दिवस सरतो रणरणत्या उन्हात. सरत्या संध्याकाळी होणाऱ्या भेटीची वाट बघण्यात. उन्हं कलतात, साजरा संधिप्रकाश पसरतो आभाळभर. ठरल्या ठिकाणी जमू लागतात एक-एक करत सगळेच. जीवाभावाची मित्रमंडळी एकत्र आली की छान निवांत गप्पा होतात, खाणं-पिणं होतं, आठवणी जागवल्या जातात आणि कोणाच्यातरी तोंडून अभावितपणे मनातली भावना शायरीवाटे व्यक्त होते. त्याला प्रतिसाद म्हणून साजेशा ओळी समोरून येतात आणि मग रंगत जाते रात्र... मैत्रीची, आठवणींची, प्रेमाची, शायरीची...
जब रूह में उतर जाता है बेपनाह इश्क का समंदर
लोग जिंदा तो होते हैं, मगर किसी और के अंदर
दौलत नहीं, शोहरत नहीं, न वाह चाहिये
कैसे हो..?
हे बंध रेशमाचे...(मध्यरंग आणि पूर्वरंग)
नुकताच शशक स्पर्धेचा निकाल लागला आहे. त्यातील विजेत्यांचे अभिनंदन आणि साहित्य संपादकमंडळाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी आभार मानतो. या स्पर्धेसाठी मी हि एक शशक लिहिली होती. त्याच कथेचा पूर्वरंग (प्रीक्वेल) आणि मुळ कथा इथे सादर करत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
हे बंध रेशमाचे (मध्यरंग)
(शशक स्पर्धेसाठी लिहिलेली कथा)
"अरे नुसती मजा. तुला सांगतो...हि अशी...उंssच लाट यायची..."
नातू ‘आ’ वासून ऐकतोय.
“पाण्याची?”
"मग!!! इथल्यासारखं नाही...
शंख, शिंपले, खेकडे, मऊ, मऊ वाळू...नुकताच शशक स्पर्धेचा निकाल लागला आहे. त्यातील विजेत्यांचे अभिनंदन आणि साहित्य संपादकमंडळाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी आभार मानतो. या स्पर्धेसाठी मी हि एक शशक लिहिली होती. त्याच कथेचा पूर्वरंग (प्रीक्वेल) आणि मुळ कथा इथे सादर करत आहे.
स्वरांजली
पहाट आणि रात्र या मधली वेळ. कशी कुणास ठाऊक आज अश्या अवेळी जाग आली तिला. कूस बदलून पाहते ती, पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. झोपडीचं दार उघडून ती बाहेर येते. आकाशात तारे मंद चमचमत आहेत. पहाटेच्या वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा येतो. पदर गच्च आवळून घेत ती चालू लागते. कुठे जायचंय ठाऊक नाही पण ती चालू लागते. पहाटेच्या दवात भिजलेली मऊशार माती तिच्या पायाला पावलागणिक माखतेय. कसलास धुंद सुवास पसरलाय चहूकडे. त्या सुवासाने तिची आठवण जरा चाळवते. चंदनाचा सुवास. तिच्या मनात भरलाय तो वास. आठवणींच्या कपाटात ती धुंडाळतेय काहीतरी. आणि अचानक गवसते तिला ती नेमकी स्मृती.
माण णा माण, मी पायला सुलताण!
प्रसंगः- वोल्वोचा प्रवास
वेळः अर्थातच कुवेळ
घटना:- सुलताण पिक्चर बघायला लागणे
तर, मी आपला, असाच मौजमजेसाठी प्रवास करत होतो. तसं पहिल्यांदा, बरं चाललं होतं. म्हणजे बस वेळेवर सुटली होती, सीट मनासारखी मिळाली होती, रिक्लायनिंग सीट चक्क काम करत होती, वरचा एसीच्या हवेचा फवारा बंद करता येत होता. गंतव्य स्थान यायला चांगले चार तास तरी होते. छान पैकी डुलकी काढावी, म्हणून डोळे मिटले. अल्पावधीत झोप लागलीही. थोड्याच वेळात मोठ्ठ्या आवाजात पार्श्वसंगीत सुरु झाले. दचकून जागा झालो(यांच्या पार्श्वभागावर एक सणसणीत ... द्यावी अशी इच्छा झाली). समोरचा टी.व्ही. चालू झाला होता.
दांडी मारणे - एक विलक्षण कला
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.
(नेक्स्ट) गॉन गर्ल
चांगली-वाईट, सुष्ट-दुष्ट, काळ्या-पांढर्या अशा एकाच रंगातल्या व्यक्तिरेखांच्या गर्दीत अचानक कधीतरी करड्या व्यक्तिरेखा सापडतात आणि मी चौकस होते. त्या जर स्त्रिया असतील तर अपील जरा जास्तच. अॅना केरनीना, स्कार्लेट-ओ-हारा, लिजबेथ सेलँडर... यांना ननायिका म्हणतात. यांच्यात काही सद्गुण सहजपणे सापडतात म्हणून त्या नायिका. पण तेवढेच दुर्गुणदेखील असतात त्यामुळे ननायिका. अँटीहिरोइन.
पण कधीकधीमात्र अश्श्या बायका भेटतात की बस्स! धक्काच बसतो! काय चांगलं काय वाईट याची जाण यांच्यात भीषणपणे गंडलेली असते. या बायका स्वतःहून कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाहीत.
तू असतीस तर
तू असतीस तर ...
अमराठी व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा एकच प्रोब्लेम असतो , तुम्ही तिला मराठी कविता नाही समजाऊन सांगु शकत. भाषांतर करता येते , अगदीच नाही असं नाही, पण भाषांतराने कवितेचा आत्माच हरवुन जातो. हे म्हणजे अगदी खुप काही तरी सांगायचय पण व्यक्त करता येत नाहीये अशी काही अवस्था !
मिसळपाव