Skip to main content

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 22/04/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही.

भाषासु मुख्या मधुरा

लेखक शरद यांनी शनिवार, 22/04/2017 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
भाषासु मुख्या मधुरा भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ! तस्याद्धि काव्यं मधुरं तस्यादपि सुभाषितम् !! शाळेत असतांनाच संस्कृतची गोडी लागली. तसे गुण मिळवण्यापुरते व्याकरण शिकलो, नाही असे नाही; पण ते तेवढेच. खरी गोडी निर्माण झाली ती सुभाषितांमुळे. शाळेत असतांना ३००-४०० सुभाषिते सहज पाठ होती. सुट्टीत कोकणात गेल्यावर भेंड्यांच्या खेळात तेथील मंडळींनी एक मखलाशी केली. संस्कृत श्लोक फक्त रामरक्षेतील, (सगळ्यांना पाठ असलेली, आमचे जादा पाठांतर बाद!) ते हि नो दिवसा गता:! तर काय सांगत होतो, "मेघनादरिपु" धाग्यात म्हटले तसे आज एक निराळ्या प्रकारचे कोडे बघू.

ही आगळी कहाणी : एक आगळावेगळा कथासंग्रह

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 19/04/2017 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही. इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं. पुस्तकाचं रुपडं चित्ताकर्षक आहे.

देव्हारा...७

लेखक विनिता००२ यांनी बुधवार, 19/04/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"तो माझ्या घरात राहील. त्याच्या घरचे देव माझ्याच घरचे नाहीत का? तसे पण देव्हार्‍यात एकदा देवाची प्राणप्रतिष्ठा केली की ते हलवता येत नाहीत. हलवले तर त्यांचे विसर्जनच करावे लागते. आई खुप वेळा लग्नाचा विषय काढते पण माझ्या मनाच्या देव्हार्‍यात अभिची मुर्ती विराजमान आहे, ती कशी हलवू?" आदेशने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती वास्तवात आली. तनूकडुन अभिचा पत्ता घेवुन आदेश निघुन गेला. देव्हारा...७ अभिजीतने कार्डवरचे नाव वाचले आणि तो चटकन उठुन बाहेर आला. "आदेशऽ" अत्यानंदाने त्याने पुकारले. आदेश मंदपणे हसत होता. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.

देव्हारा...६

लेखक विनिता००२ यांनी मंगळवार, 18/04/2017 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
"ठीक आहोत, आपण आराम करा. आम्ही बाहेर जाऊन येतो. मग आपण बोलुयात!" "ठीक आहे." तनू उत्तरली. तिची रहायची व्यवस्था कुलभुषणने आपल्या बंगल्यावर केली होती. ती रुममधे जाऊन फ्रेश झाली. 'कुलभुषणशी काय आणि कसे बोलायचे.' याचा ती विचार करत होती. देव्हारा...६ रात्रीचे जेवण तिने कुलभुषणच्या फॅमिलीबरोबर घेतले. राजलक्ष्मीशी तिची तिथेच ओळख झाली. "उद्या आपण फॅक्टरीत जाऊया." म्हणुन कुलभुषणने विषय संपवला. सकाळी ती तयार होऊन हॉलमधे आली, तेव्हा कुलभुषणबरोबर अजुन दोन व्यक्ती तेथे हजर होत्या. "मॅडम, तुमची ओळख करुन देतो. हे अभिराम आणि हे रघुराज!

कल जो पी थी अजी ये तो उसका नशा है, तुम्हारी क़सम आज पी ही नही |२|

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 18/04/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात फक्त दोनच नशा आहेत, एक इश्क आणि दुसरी शराब. या ग़जलची खासियत अशी की शायर नशेतही आहे आणि तिच्या प्रेमातही आहे..... आणि कहर म्हणजे ती समोर आहे ! त्याला आता समजत नाहीये की आपल्याला चढलेला कैफ इश्काचाये की दारूचा. प्रेयसी नाराज होईल म्हणून तो तिला म्हणतो, की ही जी नशा आहे ती कालच्या दारूची आहे..... पण खरी नशा जी आहे ती तुझ्या प्रेमाची आहे ! त्याला दारूशी प्रतारणा करता येत नाही आणि प्रेयसीलाही समजावयाचं आहे कारण त्याची नशा दुहेरी आहे. दारुचा अंमल तर बेहोश करुन गेलायं पण तिच्या सहवासाची खुमारी त्याहून कमाल आहे. तर अशा या जबरदस्त काव्यविषयावर ही ग़जल इतकी बेफाम उतरलीये की बोलता सोय नाही.

मराठी स्त्री-गीतातील स्वप्नातीत रामायण

लेखक माहितगार यांनी रविवार, 16/04/2017 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही. पण http://ccrss.org वर असलेल्या ओवी गीतांना सहज चाळता चाळता हाती आलेले मराठी स्त्री लोकगीत रामायणाच्या या अनोख्या रूपाने लोकगीतांतलं रामायण आजही खिळवून ठेऊन पुन्हा एकदा वाचावे वाटेल असे आहे - कुठे कुठे काव्यशास्त्र विनोदाचा धाट आहे असे वाटावे, काही वेळा रामायण आहे कि राधा-कृष्णाच्या लीला असेही वाटून जाईल.

देव्हारा...५

लेखक विनिता००२ यांनी शनिवार, 15/04/2017 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनी सेक्रेटरी भारद्वाज उठुन उभे राहीले. "जंटलमन, सहायसरांची अवस्था आपण जाणताच. त्यांच्या इच्छेनुसार 'अभिजीत सहाय' यांची कंपनीचे नवे मॅनेजींग डायरेक्टर म्हणुन नियुक्ती करत आहोत. कंपनीचे सर्व निर्णय त्यांच्या परवानगीनेच घेतले जातील." भारद्वाजांच्या खुलाशानंतर तिथे शांतता पसरली. फायनान्सर्सना डुबणार्‍या कंपनीत काही इंटरेस्ट नव्हताच. सर्व हक्क अभिला दिल्यामु़ळे अभिराम आणि रघुराज जबाबदारी घेण्यातुन मोकळे झाले. देव्हारा...५ अभिने रोज अ‍ॅफिसमधे यायला सुरवात केली. पण अननुभवी अभिवर कोणी विश्वास ठेवत नव्हते. रोज संध्याकाळी तो देव्हार्‍यात दिवा लावायचा.

देव्हारा...४

लेखक विनिता००२ यांनी शुक्रवार, 14/04/2017 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या दिवशी आदेश आणि तनू नेहमीप्रमाणे क्लासरुममधे आले. पहिल्या बेंचवर बसून अभि त्यांचीच वाट पहात होता. तो रोज लेक्चर अटेंड करु लागला. वेळ वाया घालवणे त्याने बंद केले होते. त्यातला हा बदल तनूसाठी खुप सुखावह होता. त्याला पाहिले की तिचे मन प्रेमाने जास्तच गहीवरुन यायचे. सहा महीने या प्रेमालापात कसे गेले ते दोघांनाही कळले नाही. पण आदेशला त्यांनी एकटे पडु दिले नव्हते. त्याला सोडुन ते दोघे कधीच कुठे ऐकटे गेले नाहीत. दोघांना एकत्र पाहुन आदेशला खुप आनंद व्हायचा. तनूसाठी अभि परफेक्ट आहे हे त्याने जाणले होते. देव्हारा...४ दार वाजले म्हणुन आदेशने दार उघडले.

देव्हारा...३

लेखक विनिता००२ यांनी मंगळवार, 11/04/2017 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
...."सांभाळेल, सांभाळेल. तुला नको काळजी! " अभि आदेशला डोळा मारत म्हणाला. "मी कशाला काळजी करु? ती पण तुझी!" ती नाक उडवत म्हणाली. लेक्चरची वेळ झाली म्हणून तिघेही उठले. देव्हारा...३ वार्षीक परिक्षा संपली तसे सगळेजण इकडे तिकडे विखुरले. अभिजीत त्याच्या घरी निघुन गेला. आदेश आणि तनूने स्पेशल क्लास जॉइन केले. सुट्टी भुर्रकन संपली. कॉलेजच्या पहील्याच दिवशी सर्वजण हजर होते. परत रुटीन सुरु झाले. अभिजीत दरवर्षी प्रमाणे टॉपलाच होता. या वर्षी प्रोजेक्ट, प्रॅक्टीकल्स बरेच उपदव्याप करायचे होते.तनू करता प्रपोजल येत होती.