मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

पूर्ण कविता हवी आहे...

उदय ४२ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
"कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " हे कडवे असलेली इंदिरा संत यांची एक कविता आहे,कुणाला आटवतेय का ?असल्यास द्यावी.

ब्रह्मोत्सव

आर्य ·
लेखनप्रकार
ब्रह्मोत्सव रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला. तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव. तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.

बासूदांचे 'अनुभव'

भोचक ·
लेखनविषय:
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

शौर्य : नितांतसुंदर चित्रपट

छोटा डॉन ·
लेखनविषय:
परवाच एक "इंडियन आर्मी" हा बेस असलेला नितांतसुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. सर्वसाधारणपणे हे असे चित्रपट म्हणजे रक्तरंजित, बटबटीत, टाळ्या घेणारे डायलॉग, प्रखर देशभक्तीचे सिन्स याने भरलेले म्हणजे थोडक्यात पैसावसूल असतात. पण "शौर्य" हा हटके आहे, हा कुठला युद्धपट नाही तर तो आहे बॉर्डर वर लढणार्‍या सर्वासामन्य सैनीकाची मानसिकता टिपणारा एक मस्त चित्रपट आणि तरीही पैसावसूल आणि हमखास पहावा असा .... पिक्चरची सुरवात होते साधारणता मध्यरात्री चालू असलेल्या आर्मीच्या दहशतवाद्यांना हुडकन्यासाठी चालू असणार्‍या कोंबिंग ऑपरेशनपासून.

मेक्सिकन गंबो

चित्रा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इथे एका मेक्सिकन उपहारगृहात एकदा मेक्सिकन गंबो खाण्याचा योग आला. अचानक समोर आलेला हा पदार्थ आवडला, त्यामुळे जरा घरगुती पद्धतीने मूळ कृतीच्या थोडीफार जवळ जाईल इतकी पाककृती तयार केली आहे. तीच इथे देते. खरे तर गंबो म्हणजे काही वेगळे नाही, उसळ, भात आणि भाज्या एकत्र करून जे काही बनेल ते म्हणजे ही पाककृती. भाज्यांच्या प्रमाणात उपलब्धतेप्रमाणे थोडेफार बदल केले तरी हरकत नसावी. भेंडी हा यातील एक पारंपारिक घटक आहे. जे उगाचच भेंडी आवडत नाही , आवडत नाही असे म्हणतात त्यांना अजिबात न कळता भेंडी खायला घालायची असेल तर ही पा.कृ. जरूर करा! साहित्य - १.

पापड

विजुभाऊ ·
पापड ही एक साईड डीश. भाजका तळका आणि मसाला हे तीन प्रकार आपल्याला माहीत असतात हे आणखी दोन नवे प्रकार पापड खाण्याचे १) कच्चा पापड त्याला दोन्ही बाजुनी किंचीत तुपाचा हात लावुन घ्यावा. पोळी भाजतो त्याच गरम तव्यावर पापड ठेउन त्यावरुन वाटीची उलटी बाजु फिरवावी..पापड हवा तेव्हढा भाजुन घ्यावा. हा पापड एकदम सपाट भाजला जातो. २)पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा . त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरून टाकावा.तिखटपूड आणि हवा असल्यास कांदा लसूण मसाला पेरावा. यावर आता दुसरी पोळी लाटुन ठेवावी.

संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)

स्वाती राजेश ·
Taxonomy upgrade extras
सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय. १.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप साहित्यः ४ टे.स्पून बटर ३पातीचे कांदे स्लाईस करून ४५० ग्रॅम गाजर १ टे.स्पून धने पावडर ५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक १/२ कप गोड घट्ट दही चवीनुसार मीठ, मिरपूड २-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. त्यात पातीचे कांदे,गाजर घालून चांगले परतवा.झाकण ठेऊन १० मि. शिजवा, भाज्या मऊ झाल्या पाहिजेत्.धनेपूड घालून १मि.परतवा. स्टॉक घालून मीठ व मिरपूड घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर२० मि.

मटाचं मराठी पर्व

नीलकांत ·
महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे. या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं. त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे. दुवे देत आहे. महाराष्ट्र टाईम्स.कॉम मराठी पर्व मराठी - नीलकांत