लेखकपुष्कराजयांनी बुधवार, 11/06/2008 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच ठाउक नाही ,मला तरी अस वाट्त ,माणूस उद्दात्त वा निरपेक्ष अस काही देउ
शकेलच अस नाही, हरकत नाही काही तरी अपेक्षा ठेउन का होइना देत जाव्,समोरच्या
कडून अपेक्षा भंगही होइल, पण कदाचित तो पर्यंत देण्याची सवय लागलेली असेल.
लेखकसर्वसाक्षीयांनी रविवार, 08/06/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावरचा इवलासा तांबूस तपकिरी पक्षी नजरेस पडताच मी दबक्या पावलांनी अलगद त्या दिशेने सरकलो व झुडुपांमध्ये बसकण मारत लपत छपत किरण साधला. कळ दाबणार इतक्यात त्या चिमण्या जीवाला चाहुल लागली. माणूस हा प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ज्ञान त्याला उपजतच असावे.
लेखकडॉ.प्रसाद दाढेयांनी रविवार, 08/06/2008 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
पुलपप्रेमी॑नी रविवार लोकसत्ता मधील (लोकर॑ग पुरवणी) डॉ. दिनेश ठाकूर या॑नी लिहिलेला लेख जरूर वाचावा. अप्रतिम आहे. बारा जून रोजी आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची आठवी पुण्यतिथी आहे. (पुल॑च्या स॑दर्भात पपुण्यतिथी हे शब्दसुद्धा लिहिता॑ना हात अडखळतात, डोळ्यासमोरचा स॑गणक धुसर होऊ पहातो..)
खालील लि॑क पहावी.
http://www.loksatta.com/daily/20080608/lokkal.htm
लेखकपद्मश्री चित्रेयांनी शनिवार, 07/06/2008 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
कसे लागले वेड जीवाला
कुठुन जुळले रेशीमधागे
चांदरातीला चांदण्यांसवे
कोण कुणासाठी हे जागे?
कुठुन येइ असा अचानक
प्राजक्ताचा गंध सभोवती
कुणासाठी अन हसता हसता
नकळत डोळे भरुन येती?
कुणासाठी ही लागे हुरहुर
कशासाठी ये भरुन हा उर
कुणासाठी अन आनंदाच्या
क्षणीही उठते मनात काहुर
कोण आठवे फुल पाहता
कोण आठवे सुर लावता
भास कुणाचे होती आणिक
वाटेवरुनी जाता जाता
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
कोण कुणा देणारे उत्तर
तरी खरे की नाव कुणाचे
आठवता मन होइ कातर...
लेखकप्रा.डॉ.दिलीप बिरुटेयांनी शुक्रवार, 06/06/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.