मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग १: प्रस्तावना

मार्गी ·

किल्लेदार 24/12/2025 - 20:22
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. IMG_7853 IMG_20190427_113916_487

नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता. तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद!

माझे पहिले कवितेचे पुस्तक Nightingale in the Shadows गुलामांच्या भाषेतच

विवेकपटाईत ·

गवि 18/12/2025 - 11:54
अभिनंदन. पुढील वेळेसाठी एक बारीकशी सुचवणी. डबल डॅश किंवा लांबडी डॅश ही खास चॅट जिपीटी आऊटपुटची निशाणी आहे. तुम्ही स्वतः भाषांतर केले असले आणि जिपीटीचा उपयोग मर्यादित सुधारणा किंवा बदल यांसाठी केला असेल, तरीही अशा खुणांमुळे तो थेट चॅट जिपीटी कॉपी पेस्ट मजकूर असल्याचे जाणवते. अशा लांब डॅशेस काढून टाकल्या तर बरे होईल. उदा. blushed आणि endless नंतर येणारे चिन्ह. Seeing her, I softly whistled. Seeing me, she blushed—just a little. No words, just glances, And a smile tucked in her cheek. Let there be storms, Let worldly toil be endless— Still, in her eyes, Spring blossoms forever.

विवेकपटाईत 18/12/2025 - 13:06
काही आधी अनुवाद करून मग चाट जीपीटी वर टाकल्या, त्यामुळे मोठ्या लाईन्स आहे.त्या मला ही आवडल्या..बाकी अधिकांश कविता चार सहा लाईन्स असल्याने गरज पडली नाही. उदा: From Peepal to Money Plant The peepal tree left the village breeze behind. In the city flat, it became a money plant. Packaged in Verse I shape emotions, sour-sweet, bitter-hot, into neat, tempting parcels of fast-food flavour, and call them Poems.

चित्र या महिन्यात मी माझे पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. त्यामागची कथा अशी आहे— सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सौ.ची बहीण, वय 80च्या पुढे असलेली, मला म्हणाली: “विवेक, तुझ्या कविता उत्तम आहेत. त्या इंग्रजीत अनुवाद करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित कर. लागेल तर मी त्यांचे संपादन करून देईन.” माझ्या सौ.ची आतेबहीण, डॉ. उषा बंदे— आयआयएएस शिमला येथील माजी फेलो—गेल्या 50 वर्षांपासून विविध इंग्रजी वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमित लेखन करत आहेत.

पुस्तक परिचय : शाश्वत: लेखक संजीव कोटकर

विजुभाऊ ·
पुस्तक परिचय शाश्वत : लेखक संजीव कोटकर कथासंग्रह प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस चराचरातल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव गोष्टीमधे एक कथा आहे. ती कथा कुठेतरी आपल्या भावनाना स्पर्ष करणारी आहे. संजीव कोटकरांच्या शाश्वत या कथासंग्रहातील कथा या आपल्या आजुबाजूला घडणार्‍या किंवा पाहिलेल्या वाटतात. जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकवतात. या कतासंग्रहात एकुण १५ कथा आहेत.आपल्या सभोवताली घडणार्‍या.यातील पात्रे काहीवेळा सजीव तर काहीवेळा निर्जीव पण भावना असलेल्या बस्तू आहेत. कथा लिहीताना लेखक मोठे काही तत्वज्ञान सांगितल्याचा आव आणत नाही.

'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

टर्मीनेटर ·

खटपट्या 11/12/2025 - 23:54
चित्रपट पाहिला खुप छान वाटला. अक्षय खन्ना हा कलाकार म्हणून ग्रेट वाटला. आहेच. राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार.

चित्रपट प्रचंड गाजतोय. पण ह्या निमित्ताने मला एक प्रश्न पडलाय.सत्याचा अंश असलेल्या अश्या स्पाय ऑपरेशन वर चित्रपट काढुन आपण भविष्यातील स्पाय ऑपरेशन तर धोक्यात आणत नाही आहोत ना? म्हणजे समजा ह्या चित्रपटात अमुक एक भारताचा स्पाय पाकिस्ताना कसा इनफिल्ट्रेट झाला.तिथल्या कुणाकुणा कडुन कसे कसे साहाय्य मिळाले हे दाखवुन भले काल्पनिक का होईना तो मार्ग तर पुढे कायमचा बंद होऊन जाईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

कॉमी 12/12/2025 - 11:24
काल्पनिक मार्ग दिग्दर्शकाला सुचत असेल तर तो रॉ, आयएसआय ह्यांना आधी सुचला असेल ह्याची शक्यता जास्त.

In reply to by कानडाऊ योगेशु

गामा पैलवान 14/12/2025 - 15:19
कानडाऊ योगेशु, प्रत्यक्षांत हेरगिरी अशी होत नसते. खरीखुरी हेरगिरी हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. तो लंबितवाणा ( = लांबलचक ) असून तुकड्यातुकड्याने होतो. असंख्य तुकड्यांचं विश्लेषण करून नेमका निष्कर्ष साधणे हा हेरगिरीचा पाया आहे. तो जर दाखवीत बसलं तर चित्रपट भयंकर रटाळ होईल. पडद्यावर दिसतं ते अनेक असंबद्ध तुकडे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा मसालेदार प्रकारे जुळवून सादर केलेलं नाटक असतं. आ.न., -गा.पै.

कांदा लिंबू 12/12/2025 - 09:14
टर्मी भौ, तुम्ही शिफारस केलीय म्हणजे सिनेमा पाहावाच लागणार. आज संध्याकाळी बघतो, जमते का ते. बाकी, लांबलचक लिहिलंय तरी खिळवून ठेवणारं लिहिलंय हेवेसांन.

Bhakti 12/12/2025 - 10:52
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय, त्यामुळे असा चित्रपट आलाय हे समजलं.यात चक्क रणवीर असूनही मला चित्रपटाविषयी माहिती नव्हते ;) बहुतेक ओटीटीवर यायची वाट पाहणार!

सौंदाळा 15/12/2025 - 10:08
परवाच पाहिला आणि आवडला. अगदी बेहद्द आवडला असे नाही म्हणणार कारण काही घटना खूपच प्रेडीक्टेबल होत्या पण बघताना मजा आली. दुसरा भाग पण नक्की बघणार

टर्मीनेटर 15/12/2025 - 13:01
किल्लेदार । खटपट्या । राजेंद्र मेहेंदळे । कानडाऊ योगेशु । कॉमी । गामा पैलवान । कांदा लिंबू । Bhakti । प्रचेतस । सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ खटपट्या
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
+१००० तुम्हालाही राकेश बेदीचे काम आवडते असे जाणवले. एका मित्राने आग्रही शिफारस केल्याने त्याचा (राकेश बेदीचा) हा पॉडकास्ट पहिला. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बऱ्याच गोष्टी ह्यातून नव्याने समजल्या, तुम्हालाही कदाचित त्या ऐकायला आवडतील! @ राजेंद्र मेहेंदळे
"अक्षय खन्नाचा खलनायकाच्या रुपात याच वर्षात दुसरा स्ट्रोक"
येस्स... तुम्ही 'धुरंधर' बघणारच आहात, तेव्हा तुम्हालाही पहिल्यापेक्षा हा दुसरा 'स्ट्रोक' जास्त खणखणीत असल्याचे जाणवेल अशी मला खात्री आहे! @ कानडाऊ योगेशु वर गापैंनी लिहिलंय ते बरोबर आहे. ध्येयाप्रती सर्वोच्च पातळीवरची समर्पित वृत्ती, पराकोटीचा संयम आणि समोरच्याचा संपूर्ण विश्वास संपादन करेपर्यंत कुठल्याही थराला जाण्याची तयारी ह्या गोष्टी हेराकडे असतील तर 'अमुक कालावधीत गुंतवणूक डबल' वगैरे सारख्या अमिषाला, आधी अशा बोगस योजनांमुळे फसवणूक झालेल्या लोकांबद्दलच्या बातम्या ऐकून/वाचूनही वारंवार लोकं नव्याने बळी पडतात त्याप्रमाणे ह्या गोष्टीही सतत होतंच असतात/राहणार. हे कसे होऊ शकते ह्याचे काही प्रमाणात उत्तर या चित्रपटातूनही मिळते. @ कांदा लिंबू - अवश्य बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला तेही सांगा. @ भक्ती
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय,
ते गाणं नाहीये, पार्शवसंगीत म्हणता येईल... पण खूपच व्हायरल होतोय तो सीन आणि त्यावरचे किस्से 😀 @ प्रचेतस - अवश्य बघा... तुम्हालाही आवडेल! @ सौंदाळा
दुसरा भाग पण नक्की बघणार
मला आत्तापासूनच खूप वेध लागलेत त्याचे! कारण आता कथानक कसे वळण घेईल, काय काय घटना बघायला मिळतील ह्याविषयी मनात जे खूप अंदाज बांधून ठेवलेत ते खरे ठरतात का हे जाणून घ्यायचे आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

खटपट्या 15/12/2025 - 21:56
आपल्याकडे जसे शिरीष कणेकर आणि दिलीप प्रभावळ्कर एकपात्त्री प्रयोग करतात तसे राकेश बेदी हे अडीज तासाचा एकपात्रि प्रयोग करतात. युट्युब वर मसाज म्हणून टाइप केल्यास मिळेल.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 16/12/2025 - 20:51
प्रतिसादात Bhakti पाहून वाटलं,टर्मिनेटरपण बदलले.कृत्रिम प्रतिसाद देऊ लागले.पण नंतर @भक्ती पाहून बरं वाटलं, टर्मिनेटर पहिल्यासारखेच आहेत खात्री पटली ;) धुरंधरचे शीर्षकगीत ऐकलं,ओहो माझा फेवरेट हनुमानकाईंड(Hanumankind)ने रॅप केलंय..जबरी :) :)

कांदा लिंबू 16/12/2025 - 01:35
सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू आहे. पावणेदहाच्या शोची कशीबशी दोन तिकिटे मिळाली. सिनेमा पाहून येऊन आता, रात्री दीड वाजता, हे लिहीत आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा अजून एकदा सिनेमा बघायला जाणार आहे. ‌ 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

In reply to by कांदा लिंबू

खटपट्या 17/12/2025 - 01:42
दोनदा बघावासा वाटला म्हणजे प्रचंड हीट जाणार, गेला आहेच. पण ५०० करोड च्या पण वर जाइल असे वाटत आहे. बाकी खान कंपनीचे सिनेमे ८०० करोड वगैरे करतात यावर माझा विश्वास नाही. असो.

निनाद 17/12/2025 - 04:50
चित्रपटाची मांडणी जरा तुटक झाली आहे. संपादनावर अजून लक्ष द्यायला हवे होते. बाकी फोनचे योग्य मॉडेल्स दाखवणे वगैरे सांभाळले आहे. पण तेच लक्ष फ्लॅट स्क्रीन मॉनिटर्स टिव्ही वगैरे मध्ये द्यायला हवे होते. २००० च्या सुमारास त्यांचे प्लाझ्मा टिव्ही असत. ते खूप जड होते, त्याकाळात प्रोजेक्शन टीव्ही असत होते. हमझाची मोटर सायकल पण खूप नवीन मॉडेलची आहे. हे सहज टाळता आले असते. असो. कथा मस्त आहे. हाताळणी पण चांगली आहे. पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता. सगळे काही खुल्लम खुल्ला दाखवले आहे असे वाटले. पहिल्यांदा भारतीय चित्रपटाने पाकिस्तान विषयी असलेली एक ऑकवर्ड पोझिशन सोडून दिली आहे असे वाटले. एकदम रोखठोक! २६/११ ची दृष्ये परिणामकारक आहेत. शेवट अपूर्ण सोडून दिला आहे. अर्थात ही एक प्रेक्षकांना बांधून ठेवायची खेळी आहे हे नक्की. पार्श्व संगीतात जुन्या गाण्यांचा वापर खूप मस्त केला आहे. पण नवीन गाणी जरा चांगली द्या हो! आज ची गाणी गुणगुणता येत नसतील अजून वीस वर्षांनी येणार्‍या सिनेमांनी पार्श्व संगीतात कोणती गाणी वापरायची? प्लिज नवीन गाणी जरा चांगली द्या असे म्हणावेसे वाटते आहे. अक्षय खन्नाचा खलनायक जबरदस्त! राकेश बेदी ला वेगळा रोल दिला आहे.

सहमत!

In reply to by निनाद

पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता.
पूर्वीच्या जुन्या किंवा अगदी अलिकडच्या थरार पटांमध्ये शत्रूचे नाव कधीही स्पष्टपणे उच्चारले जात नसे. सरहद के पार ,पडोसी मुल्क अथवा दुश्मन देश से असे शब्दप्रयोग योजले जात होते. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता तो. पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख पहिल्यांदी बहुदा बॉर्डर चित्रपटात आला आणि त्याचा टाईम्स मध्ये रिव्यु वाचताना त्यात एक ओळ अशी होती कि "फायनली द एनिमि हॅज बीन आयडेंटीफाईड इन हिन्दी सिनेमा" त्यानंतर अगदी स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख होतो अश्या चित्रपटात. पण तिथे पण उगाच काही ना काही लव अँगल आणुन वगैरे ते न्युट्रलाईज करण्याचे काहींचे किडे असतात. माझ्यामते ह्या चित्रपटापासुन सरळ सरळ ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट मध्ये पाकिस्तान ला दाखवले आहे आणि हे बर्याच जणांना खुपते आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

फक्त पाकिस्तानच नाही तर दुबई, कतार, बांगलादेश आणि नेपाळ च ही नाव हवालाच्या संवादात घेतलं आहे. पाकिस्तानातून जो काही थोडा पैसा मिळतं होता त्यासाठी पाकिस्तानच नाव टाळत असावेत. काही चित्रपटात काहीच कारण नसताना एखाद पाकिस्तानी character पण दाखवलेल आहे.

मदनबाण 18/12/2025 - 16:24
या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच बाहेर आली. या चित्रपटामुळे आपल्या देशात राहणार्‍या पाकिस्तानी अनौरस औलादींना विशेष त्रास झाला. त्यांना ते लाल सिंग चड्ढा टाईप टुकार चित्रपटांना डोक्यावर घेऊन पाकिस्तानच्या बाजुने लेझिम खेळायची हौस असते ना! :))) वायआरफच्या भिकार स्पाय साम्राज्याला पेटती काडी लावण्याचे आणि भिकार खानावळी चे उरले सुरलेले जिहादी कपडे फाडण्याचे काम या चित्रपटाने केलेले दिसत आहे. चित्रपट बहुधा ओटीटी वर आल्यावर पाहिन, मात्र एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे या एका चित्रपटाने पाकड्यांचा बुरखा जगात अगदी टराटरा फाडला आहे. जाता जाता: चित्रपटातील शरारत गाणं बर्‍यापैकी हिट झाल्याने आता अनेक पक्षी जीव त्यावर रील्स बनवत आहेत. आयेषा खानला देखील बरीच प्रसिद्धी या गाण्याने दिली आहे, बाई उड्या मारुन मारुन नितंब अगदी लईत डोलवुन स्टेज वर नृत्य करताना पाहण्यात आल्या आहेत! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

टर्मीनेटर 18/12/2025 - 16:55
अगदी अगदी.. तुम्हाला काय वाटले, इथले (पाकिस्तान समर्थक) डावे आणि पुरोगामी ह्या चित्रपटाविषयी काहीच न बोलता गप्प बसलेत ते काय उगीच का? त्या भाडखाऊंना ना धड चित्रपटाची बाजू घेता येत्ये ना त्याचा विरोध करता येतोय... लैच अवघड जागेचे दुखणे आहे राव, 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' टाईप्स 😂

In reply to by टर्मीनेटर

कॉमी 18/12/2025 - 19:11
मला सिनेमा आवडला. ट्रेलर पाहूनच आवडला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी पाहिला. सिनेमाच राजकारण पटते का नाही हा भाग अलाहिदा. पण जे राजकारण दाखवले आहे त्यात हेतूबाबत काही आक्षेपार्ह वाटले नाही. खेरीज सिनेमा चांगला होता. केरळ फाईल्स वैगेरे सिनेमांचे ट्रेलर पाहून अत्यंत बटबटीत सिनेमे आहेत असे वाटते. धुरंधर तांत्रिक दृष्टीत अतिशय सुपर्ब आहे.

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 19/12/2025 - 13:01
एकच नंबर टर्मिभाऊ, लई मोठी कोंडी सोडवली तुम्ही. चायला एक टाईम असा गांडू होता की जरा शब्द इकडे तिकडे झाला की प्रतिसाद उडायचा. शिवाय वरून दट्ट्या की भावना कितीही तीव्र असल्या तरी शब्द संयमित ठेवायचे. आम्ही बिचारे आबे तुबे कडू भाड्या सारख्या विशेषणात वाढलेली प्रजा. इथले काही बाईलभाडे आणि त्यांचे लिहिणे बघून कुठल्या भाषेत उद्धार करावा हा प्रश्न पडायचा पण तुम्ही भारी काम केले. जशा भावना तशाच उतरवायच्या हा फंडा एक नंबर. आता मागे सरकणे नाही. एकेकाला उभाट्यानेच.......

सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

पुस्तक परिचय In service of the republic: The art and science of economic policy

केदार भिडे ·

मस्त. हा विषय माझ्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा आहे. त्याविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद.
हे सर्व एकमेकांना आयुष्यात कधीही न भेटणारे लोक हे सर्व काम सुताराला कपडे मिळावेत याकरता, त्याला पाव मिळावा याकरता याकरता अजिबात करत नसतात. शेतकरी बी पेरतो कारण त्याला धान्य विकून नंतर नवा चपलेचा जोड घ्यायचा असतो. पोलादी हत्यारे तयार करणाऱ्याला नंतर नवा सदरा घ्यायचा असतो. हे सर्वच लोक आपल्या हिताचे रक्षण करत असतात, मात्र त्यातून अनेकांचे हित साधत असतात. हे सर्व चालते कोणत्याही केंद्रीय नियोजनाशिवाय, कुणाच्या आदेशाशिवाय.
याविषयी मिल्टन फ्रीडमन साहेबांचा पुढील व्हिडिओ- पेन्सिल जरूर बघावा असा आहे. तुमच्याप्रमाणे मी पण मिल्टन फ्रीडमन साहेबांचा चाहता आहे. https://youtu.be/67tHtpac5ws?si=zy42UPPw-ekU05GQ
वर खाली होणारे विनिमय दर किती महत्वाचे आहेत याकरता संदर्भातील मिल्टन फ्रीडमन यांचा केवळ अडीच मिनिटांचा विडिओ जरूर पहा. अशाप्रकारे सार्वजनिक धोरणासंदर्भात विचार करण्यास हे पुस्तक दिशा दाखवते.
याच विषयावर मिल्टन फ्रीडमन साहेबांचा थोडा अधिक विस्तारातील व्हिडिओ पुढे देत आहे. https://www.youtube.com/watch?v=c9STBcacDIM गेल्या अनेक वर्षांपासून मला मिल्टन फ्रीडमन साहेबांचे म्हणणे अगदी १००% पटत होते. मात्र आता १००% नाही तर अर्धेच पटते. साहेब म्हणतात ते वस्तूंसंदर्भात अधिक योग्य आहे. पण ते सेवांच्या संदर्भात तितक्या प्रमाणावर लागू पडेल का याविषयी साशंक आहे. त्यांचे हे भाषण ५० वर्षांपूर्वीचे आहे. त्यावेळेस इंटरनेटवर आधारीत सेवा पुरविणे हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. पण आता आहे. वस्तू निर्यात केल्या तर त्या आपल्याला वापरायला मिळत नाहीत तसे सेवांविषयी होत नाही. दुसरे म्हणजे साहेब म्हणत आहेत ते सेन्सिबल लोकांच्या जगात अगदी पूर्णपणे योग्य ठरेल. पण समजा ट्रम्पसारखा कोणी महत्वाच्या सत्तापदावर असेल तर कागदावर भारदस्त दिसणारे हे लॉजिक पूर्ण उलटेपालटे होऊ शकते. हे प्रकर्षाने जाणविले काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नायरा ऑईलला क्लाऊड सर्व्हिस द्यायला नकार दिला तेव्हा. नायरा ऑईल रशियातून तेल विकत घेत असल्याने त्या कंपनीवर निर्बंध- इतकेच नव्हे तर त्या कंपनीशी कोणतेही व्यवहार करायला अमेरिकन कंपन्यांनाही बंदी. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने तसे केले. आज सगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर असणे सगळ्यात महत्वाचे आहे. मेकमायट्रीप सारख्या पोर्टलवरून आपण विमानाचे तिकिट बुक करतो तेव्हा आपण जिथे कुठे असू तिथून मेकमायट्रीप आणि विमान कंपन्या यांना जोडणारा एक आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरमधील दुवा असतो. तीच गोष्ट शेअर मार्केटची. तीच गोष्ट जवळपास सगळ्या प्रकारच्या व्यवसायांची. बॅक एन्डला आय.टी. इन्फ्रास्ट्रक्चर - क्लाऊड की जे काही असेल ते किती महत्वाचे आहे हे त्यावेळेस अधिक प्रकर्षाने जाणविले. तशा क्लाऊड सेवा देणार्‍या जवळपास सगळ्या कंपन्या अमेरिकन आहेत. समजा भविष्यात अमेरिकेशी संबंध आणखी बिघडले आणि नायराप्रमाणे सगळ्या भारतीय कंपन्यांशी व्यवहार करायला तात्यांनी अमेरिकन कंपन्यांना बंदी घातली तर? आता ही हायपोथेटिकल गोष्ट वाटत आहे पण तात्यांचा लहरी स्वभाव लक्षात घेता तसे होणारच नाही याची अजिबात खात्री देता येणार नाही. आज जवळपास सगळा आंतराराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये चालतो. त्याचे कारण १९७४ मध्ये रिचर्ड निक्सनने सौदीशी केलेला पेट्रो डॉलर करार. तेल सगळ्याच देशांना गरजेचे असल्याने तेल विकत घ्यायला डॉलर द्यावे लागणार असतील तर मग ते डॉलर आणायचे कुठून? तर मग इतर वस्तूंची निर्यात केली तर त्याचेही पैसे डॉलरमध्ये घेणे भाग झाले. त्यातून मग सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्येच करणे भाग झाले. ते डॉलर एका देशातील कंपनीने दुसर्‍या देशातील कंपनीला द्यायचे कसे? तर त्यासाठी परत अमेरिकेचीच स्विफ्ट यंत्रणा. आपण एका गोष्टीविषयी पूर्ण अनभिज्ञ असतो पण आपण जेव्हा परदेशात बनलेली एखादी वस्तू (समजा चीन किंवा तैवानमध्ये बनलेला लॅपटॉप) विकत घेतो तेव्हा आपल्या भारतीय बँकेतील खात्यातून पैसे लॅपटॉप विकणार्‍या कंपनीच्या खात्यात थेट जात नाहीत तर स्विफ्ट नेटवर्ककडून आपल्या (समजा) एच.डी.एफ.सी बँकेकडून त्यांचे टाय-अप असेल अशा एखाद्या अमेरिकन बँकेत (समजा बँक ऑफ अमेरिका) डॉलरमध्ये जातात, तिथून लॅपटॉप विकणार्‍याचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे टाय-अप असेल त्या अमेरिकन बँकेत (समजा वेल्स फार्गो) जातात आणि वेल्स फार्गो बँक ते पैसे लॅपटॉप विकणार्‍याच्या बँक खात्यात यूआनमध्ये देते. आता समजा तात्यांनी निर्बंध आणला- क्ष या कंपनीबरोबर कोणतेही व्यवहार करायचे नाहीत- स्विफ्ट नेटवर्कमधून ती कंपनी बाहेर. मग लागल्या बोंबा? स्टेट बँक ऑफ इंडिया मोठ्या प्रमाणावर आयात-निर्यातीसाठी अशाप्रकारे स्विफ्ट नेटवर्कचा वापर करते. नायराचे रशियन कंपन्यांना पैसे देण्याचे व्यवहार एस.बी.आयकडूनच व्हायचे. आता एस.बी.आय नायराबरोबर व्यवहार करते म्हणून एस.बी.आय ला स्विफ्ट नेटवर्कमधून बाहेर केले असते तर काय ही भिती वाटून मग एस.बी.आयने नायराचे व्यवहार प्रोसेस करायला नकार दिला. मग त्यांना ते व्यवहार सेंट्रल बँक की अन्य दुसरी कोणतीतरी स्विफ्टमध्ये फार सक्रीय नसलेली बॅंक वापरून करावे लागले. म्हणजे एकूणच काय- तर एक तर आंतरराष्ट्रीय व्यापार करा अमेरिकन चलनात, त्यासाठीचे पैसे ट्रान्स्फर करा अमेरिकन स्विफ्ट पध्दत वापरून. सगळ्या उद्योगांना लागणारे आय.टी इन्फ्रास्ट्रक्चर कोण देणार? तर अमेरिकन कंपन्या. अशावेळेस अमेरिकेत ट्रम्पसारखा कोणी माथेफिरू असेल आणि त्याचे डोके फिरले तर तो किती अडचणी निर्माण करू शकेल याची कल्पनाही करवत नाही. बाकी सगळे सोडा- समजा अगदी आय.टी इन्फ्रास्ट्रक्चरही बंद करून टाकले तर भारताची पूर्ण अर्थव्यवस्था टेकीला येऊ शकेल. नेटबँकिंग, फोन वरील सगळी अ‍ॅप्स, शेअर मार्केट पासून सगळे व्यवहार पूर्ण ठप्प होऊ शकतील. आता या पार्श्वभूमीवर मिल्टन फ्रीडमनसाहेबांचे गणित कसे बसवायचे? त्यांच्या (आणि अ‍ॅडम स्मिथपासून सगळ्या फ्री मार्केट वाल्यांच्या) म्हणण्याचा अर्थ हा की पूर्ण साखळीत असलेले सगळे घटक आपल्या फायद्यासाठी अशा पध्दतीने वागतात की पूर्ण सिस्टीम व्यवस्थित चालते. पण आपल्याला त्रास झाला तरी बेहत्तर दुसर्‍याचे नुकसान झाले पाहिजे असे म्हणणारा एखादा माथेफिरू त्या साखळीत कुठेतरी किंवा त्या साखळीतील घटकांवर प्रभाव टाकायला आला तर? साहेबांच्या काळात असे काही होईल याची कल्पनाही कदाचित त्यांनी केली नसावी त्यामुळे त्यांच्या गणितात या प्रश्नाचे उत्तर नाही. पण आता ते उत्तर शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. असो. तुमच्याप्रमाणेच मलाही या विषयांची खूप आवड आहे. श्रुती राजगोपालन ज्या जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीमध्ये मर्केटर सेंटरमध्ये आहेत तिथलेच एक प्रोफेसर डॉनल्ड बॉडरॉक्स यांचा कॅफेहायेक हा ब्लॉग पूर्वी मी नेहमी वाचायचो- हल्ली बर्‍याच महिन्यात वाचलेला नाही. कॅफे हायेक मधील हायेक हे फ्रेडरीक हायेक- लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधे एकेकाळी त्यांच्यासारखे ऑस्ट्रीयन प्रोफेसर पण होते. फ्रेडरीक हायेक, फ्रेडरीक बास्तिया, लुडविग व्हॉन मिजस वगैरेंचे एके काळी खूप वाचायचो. गेले ते दिवस आता... :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

केदार भिडे 15/12/2025 - 15:26
नमस्कार, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. प्रवासात असल्याने लिहिता आले नाही. फ्रीडमन यांचा छोटा विडिओ अन्य मोठ्या व्हिडिओचा भाग आहे आणि त्यांची अन्य व्याख्याने पाहणे निश्चित आनंद देणारे आहे. आपल्यालाही ते आवडल्याचे पाहून बरे वाटले. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी जास्तीत जास्त जोडले जाण्यातून त्यावर होणारे अवलंबवित्व हा मुद्दा महत्वाचा आहे. युरोप -इराण व्यापारातही swift चा अडथळा झाला होता आणि त्यातून instex नावाची सिस्टिम त्यांना काढावी लागली असे वाचले. त्यामुळे हे अवलंबवित्व खरेच आहे. मात्र मी उलट्या रीतीने पाहतो कि त्या परदेशी खाजगी कंपन्यांना भारतीय बाजारपेठही हवी आहे त्यामुळे एक मर्यादेपलीकडे उलथापालथ त्यांनाही हवीय असे मला वाटत नाही. (नयराचा विषय कसा मिटला मला माहित नाही). थोडा दबाव, प्रसंगी अपमान आपल्याला सहन करावा लागेल हे खरे. पण नाईलाज आहे. पहिली ४० वर्ष बंदिस्त व्यवस्था आपण राबवून पाहिली आणि त्यातून जगाला पादाक्रांत करेल असे एकही उत्पादन तयार झालेले नाही. त्यामुळे सध्या आंतराराष्ट्रीय व्यवस्थेशी जोडून घेऊन आवश्यक ज्ञान, अनुभव आपल्या लोकांनी घेणे आपल्या फायद्याचे आहे. माझ्या बास्तिया वरील लेखात तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या संगणक क्षेत्राला बंदिस्तपणाचे जे ग्रहण लागले त्याचे वर्णन एका संदर्भात दिलेले आहे ते जरूर पहा. तसेच आंतरराष्ट्रीय सोडा, आपल्या देशांतर्गत सुद्धा कितीतरी आर्थिक सुधारणा गरजेच्या आहेत त्यांचा अजून पत्ता नाही. उत्पादकता वाढ, त्यातून आर्थिक वृद्धी, आणि त्यातून समृद्धी याची जाणीव अजून लोकात नाही. सारा काही वाटपाचा खेळ अजून चालू आहे. पैशाला किलोभर समाजवादी विचार आज पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत स्मिथ, मिसेस, हायेक, फ्रीडमन यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. शिक्षणासाठी थेट अनुदान, खाजगी शहरे इ सारख्या धाडसी सुधारणा आपल्याला कधीना कधी कराव्याच लागतील. नाही तर त्या न केल्याचे परिणाम तरी भोगावे लागतील. त्याकरता लोकांमध्ये जागृती घडवून आणायचे, सरधोपट समाजवादी दृष्टीपेक्षा वेगळी दृष्टी तयार व्हायला पाहिजे त्याकरता अधिक अभ्यास, अधिक लेखन केले पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

याच धर्तीवर ----ईटलीने काही महिन्यांपुर्वी स्टारलिंक बरोबर ईंटरनेट बॅकबोन साठी बोलणी चालवली होती. पण अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने आफ्रिकेतील एका देशाची इंटरनेट सेवा खंडीत केल्याचे कळल्यावर तो करार बासनात टाकला. तस्मात कुठलयाही देशावर फार अवलंबित्व ठेवणे (किंबहुना ईंडिगो प्रकरणानंतर कुठल्याही सर्विस प्रोव्हायडरवर) धोक्याचे ठरु शकते. जाता जाता----एन पी सी आय ने जी पे आणि फोन पे बद्दल ईशारा दिलाय की देशातील ७० टक्के डिजिटल पेमेंट या दोन माध्यमातुन होत आहेत आणि ही ड्युओपोलि मोडुन काढायला हवी.

कंजूस 16/12/2025 - 04:06
लेखाचा विषय समजून घ्यायला हवा. १.आर्थिक व्यवस्था कशी राखायची हा आहे. यामध्ये आर्थिक धोरण ठरवणारा राजा किंवा सरकार धोरण ठरवतो आणि ते कसे साध्य करायचे ते अर्थशास्त्रज्ञ किंवा जाणकार करून देतो. ते जाणकार केळकर आणि शहा यांचा उल्लेख आहे. या कामासाठी कोणाला नेमायचे ते सरकारच ठरवते. २. देशाची किंवा राज्याची किंवा अगदी कुटुंबाची असो त्यासाठी पैसे कुठून येणार आणि पैसे कुठे आणि किती खर्च करायचे ते ठरवणारी व्यक्ती नेक आणि प्रामाणिक असावी लागते. अन्यथा ती फक्त स्वतःचा लाभ पाहिल .किंवा अन्य कुणाच्या लाभासाठी गुप्तपणे काम करेल. तज्ज्ञ मंडळी भरपूर असतात पण निवड करणे महत्त्वाचे.

In service of the republic: The art and science of economic policy, Penguin, 2022, Pages 500. लेखक – डॉ विजय केळकर आणि डॉ अजय शाह या वर्षाच्या सुरुवातीला मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि हल्लीच वाचून पूर्ण झालं. पुस्तकाच्या आधी लेखकांची थोडक्यात माहिती सांगतो. विजय केळकर आणि अजय शाह दोघेही सुरुवातीचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी जे नंतर अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात आले. विजय केळकर यांनी केंद्र सरकारमध्ये अर्थ मंत्रालयात विविध पदांवर काम केले आहे. श्री गिरीश कुबेर यांनी त्यांच्यावरील एक लेख लोकसत्ता दैनिकात नुकताच लिहिला होता.

स्वतःला जगवत ठेवण्याचे प्रयोग (ऐसी अक्षरे ३५)

Bhakti ·

In reply to by युयुत्सु

लढणार्‍या लोकांचं मला खुप कौतूक आहे. पुस्तकाने उत्सुकता चाळवली आहे. वाचलंच पाहिजे.
असंच म्हणतो. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

युयुत्सु 10/12/2025 - 17:13
पुस्तक पोचलं आहे. १ली १५ पानं वाचूनच झोप उडणार आहे... विशेषतः "केवळ माझ्या दोन पायामध्ये लोंबकळणारं लिंग नाही म्हणून मी सर्जन व्हायला कमी लायक, असा एक मोट्ठा समज सार्‍या वैद्यकीय जगात पसरलेला आहे" हे पान क्र० १२ वरील वाक्य वाचल्यावर आमचं आय्०आय०टी० मधलं शिक्षण फारच सुखद होतं, असं म्हणावं लागेल. आजची वैद्यकीय शिक्षणव्यवस्था इतकी सडलेली असेल तर त्या व्यवस्थेत आपल्याला योग्य उपचार देतील असे वैद्यकीय व्यावसायिक मिळायला नशीबच हवे. शिवाय त्यांच्याकडून नैतिकता आणि पारदर्शकतेची अपेक्षा कशी करावी? अत्यंत उत्तम पुस्तकाला प्रकाशात आणल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद!

1 पुस्तक -#स्वतःला_जगवत_ठेवण्याचे_प्रयोग लेखिका -#ऐश्वर्या_रेवडकर स्वतःचे अवकाश शोधणाऱ्या स्वच्छंदी मुली लग्न संस्थेतील कच्चे दुवे ,पुरुषत्वाचा दुराभिमान, पितृसत्ताक वर्चस्व, स्त्री-आदरातील सामाजिक दांभिकता या मुद्द्यांपर्यंत तटस्थपणे नक्कीच पोहोचतात.तेव्हा त्या विचारांना फेमिनिझम म्हणत आपण हेटाळतो .प

रंजनाकडून चिंतनाकडे नेणारा लेखकराजा

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 02/12/2025 - 11:44
मॉम यांच्या रेन आणि द लेटर या कथांचा पूर्वी स्वतंत्रपणे परिचय करून दिलेला होता. तसेच त्यांची विविध अवतरणे निरनिराळ्या विषयांच्या निमित्ताने विविध धाग्यांवर तुटक स्वरूपात लिहिली होती. या दीर्घ लेखाच्या निमित्ताने त्यांचा सविस्तर जीवनपट आणि आजही वाचकप्रिय असणाऱ्या त्यांच्या काही नावाजलेल्या पुस्तकांचा परिचय करून दिलेला आहे.

Bhakti 02/12/2025 - 15:34
खुप छान लेख रचना आहे.अनेक विचार करायला लावणारी वाक्ये ,त्यांचा उल्लेख उत्तम केलाय. वैद्यकीय शिक्षण घेतलेले अनेक‌ कलावंत माहिती आहेत,लेखक तसे कमी आहेत?. डॉ.अनिल अवचट यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 02/12/2025 - 16:09
डॉक्टर लेखक धन्यवाद ! इथे तुम्हाला दहा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावे मिळतील. + रशियाचे Chekov मराठी डॉक्टर्समध्ये नरेंद्र दाभोळकर, अतुल गवांदे अरुण लिमये, उदय कुलकर्णी आणि अन्य काही.

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 03/12/2025 - 11:41
वाह, खुपच महत्वपूर्ण यादी आहे. डॉक्टर लेखक कोण ? असं विचारल कारण,या जगाच्या अनेक रहस्यंभेदांपैकी म्हणजे मानवी शरीर यांचे पूर्ण रहस्य आकलन यांना झालेलं असते.आणि त्यावरच सतत अभ्यास सुरू असतो.लेखात उल्लेख केल्याप्रमाणे डॉ.मॉम हे लेखक अनेक चिंतनाअंती अज्ञेयवादी झाले.जिथवर डॉक्टर लोक लवकर पोहचत असावे असे मला वाटतं.अशा रहस्यभेदांनंतर ते समतोल नसलेल्या अनेक व्यक्तीरेखा, समाजव्यवस्था यावर फिक्शनल,नॉन फिक्शनल पुस्तक लिहितात ,ती वाचनीयच असतात. डॉक्टर लेखक आठवताना मला मी नुकतेच ऑर्डर केलेले "स्वतः जागवत ठेवण्याचे प्रयोग" हे पुस्तक आठवलं.जे सध्याच्या प्रसिद्ध मराठी लेखिका डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेले आहे.या आधीही त्यांनी त्यांच्या सामाजिक, स्त्रीवादी, विचारांवर, वैद्यकीय अनुभवांवर 'पाळीचं पॉलिटिक्स', 'विहिरीची मुलगी, बिजापूर डायरी पुस्तक लिहिले आहे. मी मात्र पहिल्यांदाच त्यांना वाचणार आहे :)

टर्मीनेटर 03/12/2025 - 14:04
ही कथा उच्चभ्रूपणा, दिखाऊ सभ्यता आणि तथाकथित नैतिकता यांचा बुरखा अलगदपणे फाडते.
ह्या एका वाक्यासाठी Rain ही कथा/कादंबरी वाचण्याची ईच्छा झाली आहे. छापील लेखन आता अजिबात वाचत नाही, तुम्ही लेखात 'जालावर' वाचल्याचा उल्लेख केला आहे त्यामूळे डिजिटल आवृत्ती वाचेन! ---
“ समाजातील ‘वर्ग’भेद हे नेहमीच अस्तित्वात असून त्यांचे अस्तित्व नाकारण्याऐवजी ते कबूल करण्यातच प्रामाणिकपणा आहे”
Cakes & Ale ह्या कादंबरीतले हे वाक्य फारच आवडले आहे! 'Acceptance' चे महत्व अजिबात न समजलेले अनेक (तथाकथित उच्चशिक्षित) लोक २१व्या शतकातही काळानुरूप न होता अजूनही असल्या कालबाह्य विषयांवर चर्वित चर्वण करताना (अगदी इथेही) आढळतात हे एकप्रकारे दुर्दैवच म्हणायचे! असो, पुढील लेखनास शुभेच्छा!

In reply to by टर्मीनेटर

हेमंतकुमार 03/12/2025 - 14:22
धन्यवाद ! रेन जरूर वाचून कळवा. त्यातील धर्मगुरूचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे लेखकाने संदिग्ध ठेवले आहे. त्यावर तुमचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल 😀 . .
Cakes & Ale ह्या कादंबरीतले हे वाक्य
हे वाक्य Cakes. . . यातील नसून A Writer’s Notebook या चिंतन-पुस्तकातील आहे. . .
कालबाह्य विषयांवर चर्वित चर्वण करताना (अगदी इथेही) आढळतात
सहमत ! 👊

In reply to by हेमंतकुमार

टर्मीनेटर 03/12/2025 - 14:37
रेन जरूर वाचून कळवा.
हो... नक्कीच!
हे वाक्य Cakes. . . यातील नसून A Writer’s Notebook या चिंतन-पुस्तकातील आहे.
ओह... ह्यासाठीच मी मोबाईल वरून प्रतिसाद देणे टाळतो 😀 स्क्रोल करताना हे वाक्य 'Cakes & Ale' मधले असावे असा माझा गैरसमज झाला त्यासाठी क्षमस्व!

हेमंतकुमार 20/12/2025 - 09:16
The Moon and Sixpence या मॉम कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट (1942) युट्युबवर पाहिला. सुंदर असून आवडलाच ! एका महान प्रतिभावंत चित्रकाराचा कलंदरपणा छान चितारला आहे. George Sanders या तत्कालीन प्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्याची त्यात मुख्य भूमिका आहे. Paul Gauguin या प्रसिद्ध फ्रेंच चित्रकाराच्या जीवनावर आधारित. https://www.youtube.com/watch?v=1HAk9N0KTK4 या कादंबरीचे वैशिष्ट्यपूर्ण शीर्षक अर्थपूर्ण असून त्यात चंद्र आणि पैशाचे नाणे ही रूपके आहेत. एखाद्या कलाकाराची कलेप्रति असलेली अतीव महत्वाकांक्षा व स्वप्न (the moon) आणि त्या उलट सामान्य माणसाप्रमाणे जगता येणारे सुरक्षित भौतिक आयुष्य ( sixpence) यांच्यातील द्वंद्व लेखकाने दाखवले आहे. यापैकी पहिली गोष्ट साकार करायची असेल तर दुसऱ्याचा त्याग करावा लागणे हे अपरिहार्य.

तुमच्यात असलेल्या लेखनाच्या शिस्तीमुळे हा लेख फार प्रगल्भ झाला आहे. इंग्रजी साहित्याशी आमचा सुतराम संबंध नाही. त्याचे आकलन होण्याची भाषा क्षमताही आमच्यात नाही. मराठीत आपण हा ठेवा आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद! लेखन हा विचारांच्या विरेचनाचा (purgation) उत्तम मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. या ठिकाणी catharsis हा शब्दप्रयोग मला अधिक संयुक्तिक वाटतो. फक्त भावविरेचनासाठी च तो का वापरला जावा? लेखन हा वैचारिक हगवणीचा प्रकार आहे असे देखील मानणारा एक विद्रोही पंथ आहेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हेमंतकुमार 21/12/2025 - 19:43
धन्यवाद !
purgation) उत्तम मार्ग आहे अशी त्यांची धारणा होती. या ठिकाणी catharsis हा
या निमित्ताने गुगलून या दोन्ही शब्दांचा छोटासा अभ्यास करून टाकला. लेखनातून भावनिक विरेचनासाठी catharsis हा शब्द अधिक योग्य आहे

In reply to by प्रकाश घाटपांडे

हेमंतकुमार 21/12/2025 - 21:42
तुमच्या प्रतिसादामुळे मी या संबंधित २ शब्दांच्या उल्लेखाबद्दल मॉम यांचे मूळ लेखन पुन्हा एकदा वाचले. ती ५ वाक्ये खाली देतो म्हणजे मॉम यांनी या दोन्ही शब्दांचा किती समर्पक वापर केला आहे ते समजेल :
“I have put a lot of myself into this narration. I could get rid of many memories by writing about them. They were harbouring inside me for too long. It was a kind of catharsis, the purging of emotions. It was most liberating”.

मारवा 21/12/2025 - 18:39
त्यातील प्रेमकथा ? Unique आहे. Unique love stories मध्ये Marquez ची love in the time of cholera. वरील कादंबरीतील प्रेमकथा आहे. Off human bondage ची वाचनीयता सुंदर आहे. Maughm ला bondage विषयी विचारलेल्या प्रश्नावर, why did you write one book that was full of candor and human warmth ? त्यावर मॉम ने दिलेले उत्तर " Because I have lived only one life.It took me thirty years of living to process the material for that one book ". वाचनीयता हा मॉम च्या सर्व लेखनाचा महत्वाचा प्लस फॅक्टरआहे.

In reply to by मारवा

हेमंतकुमार 21/12/2025 - 19:46
पूरक व माहितीपूर्ण प्रतिसाद . धन्यवाद !
Off human bondage
एक छोटीशी सुधारणा : हे शीर्षक Of human bondage असे आहे. Off व Of यामध्ये अर्थभिन्नता असल्याने गैरसमज होऊ नये म्हणून हे लिहिले.

वयाच्या विशीत जेव्हा आपण काही पुस्तके वाचतो आणि ती आवडतात तेव्हा त्यांचे लेखक आपल्या मनावर गारुड करतात आणि त्यातले काही तर कायमचा ठसा उमटवतात. वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत इंग्लिश साहित्याशी काही संबंधच आला नव्हता. नंतर मेडिकलला गेल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीचा सभासद झालो. खरं म्हणजे त्याचा उद्देश अभ्यासाच्या पुस्तकांसाठी होता. परंतु पहिल्याच दिवशी तिथे पाऊल टाकताच लक्षात आले की, अरेच्चा, इथे इंग्लिश गोष्टीची पुस्तके सुद्धा आहेत तर !

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते.

विवेकपटाईत ·

युयुत्सु 30/11/2025 - 09:16
जन्माने सर्व शूद्र असतात म्हणजे जन्माने कोणीही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य नसतो; सर्वजण सामान्य मानव म्हणून जन्म घेतात.> मग शंकराचार्यांसारखे हिंदू धर्माचार्य, हिंदू कायदा आणि संघासारखी संघटना यावर ठाम आणि कडक भूमिका का घेत नाही.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:11
संघाशी या लेखाचा काहीही संबंध नाही. ब्रिटिशांनी भारतीयांना आणि दलितांना शिक्षणापासून वंचित केले हा या लेखाचा सार आहे. बाकी देशात संविधानानुसार कायदे आहे. भूमिकेबाबत म्हणाल तर काँग्रेस, काम्रेड बहुजन वादी संस्थांना याबाबत विचारावे त्यांची भूमिका काय आहे. कारण यांनी दलितांचा उपयोग फक्त राजनीतीसाठी केला आहे दलितांसाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही. संघाचे म्हणाल तर संघ कधीच जात-पाच मानत नाही. सेवा भारती सारख्या संस्थांचे हजारो प्रकल्प आज दलित वस्तीत चालतात. त हजारो शाळा त्यात शिकणारे अधिकांश मागासवर्गीय वनवासी इत्यादी असतात. हजारो एकल शाळा ते चालवतात. दलित आणि आदिवासी राष्ट्रपती त्यांनी देशाला दिला आहे.

In reply to by युयुत्सु

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:00
या प्रश्नाचे उत्तर सविधान रचणाऱ्यांना विचारा. बाकी हा लेख ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सर्वे पर आधारित आहे.

युयुत्सु 30/11/2025 - 09:20
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अहवालांनुसार (मुख्यतः विलियम अॅडमच्या १८३५-३८ च्या बंगाल-बिहार सर्वे आणि जी. डब्ल्यू. लिटनरच्या १८८२ च्या पंजाब सर्वे) आणि धर्मपाल यांच्या "द ब्यूटीफुल ट्री" पुस्तकात (१९८३) यांचा आधार घेऊन, बंगाल आणि बिहारमध्ये सुमारे १,००,००० गुरुकुल किंवा देशी पाठशाळा अस्तित्वात होत्या (प्रत्येक गावात किमान एक, एकूण १,५०,०००+ गावांप्रमाणे) तर पंजाबमध्ये लिटनरनुसार ५,०००+ पाठशाळा होत्या, ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते. प्री-कोलोनियल काळात भारताची जनसंख्या बघता आणि प्रत्येक गावांत एक गुरुकुल असल्याने जवळपास गांवतील सर्वांना प्राथमिक शिक्षण निश्चित मिळत असेल. मग अचानक असे काय झाले की शूद्र समाज शिक्षणापासून वंचित झाला.
या पाठशाळामध्ये किती शूद्रांना शिक्षण दिले गेले याची पण आकडेवारी द्या!

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 01/12/2025 - 09:21
थापेबाजीचा कहर ज्यात शूद्र व अन्य जातींचे बहुमत (७०%+) होते कोणत्याही पाठशाळेत मुंज झाल्याशिवाय वेदाध्ययन करू दिले जात नाही. जर शूद्रांना जानव्याचा अधिकारच नव्हता (सं० "शूद्र पूर्वी कोण होते?" -बाबासाहेब आंबेडकर) तर त्यांना प्रवेश देणार्‍या या पाठशाळा कोणत्या? मला लहानपणी शाळेत असताना सस्वर वेदपठण ऐकायला खुप आवडायचे (तसे ते अजुनही आवडते). त्यामुळे मला ते शिकायची खुप इच्छा होती. त्यामुळे माझ्या वडिलांनी पुण्यात काही पाठशाळांमध्ये चवकशी केली होती. पण प्रत्येक ठिकाणी माझी मुंज झाली नाही म्हणून मला नाकारले गेले. सांगायचे तात्पर्य वेदाध्यनासाठी उपनयन संस्कार अनिवार्य होता.

In reply to by कॉमी

वाव! व्हॉट ए ग्रेट थिंकिंग! आणी आपण लोकांनी धर्म का सोडला ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत राहतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गामा पैलवान 01/12/2025 - 02:33
अमरेंद्र बाहुबली, शंकराचार्यांनी वेद ऐकणाऱ्या शूद्राच्या कानांत उकळलेले शिसे ओता वगैरे काहीही म्हंटलेलं नाही. फार काय, कुठल्याही हिंदू धर्मग्रंथात अशी बकवास आज्ञा नाही. चेंगीजखानाने ख्वाराझमीच्या कोण्या एका राजाला जिंकल्यावर त्याच्या कानांत व डोळ्यांत वितळलेली चांदी ओतली होती. याव्यतिरिक्त मला काहीही वास्तविक संदर्भ सापडला नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कॉमी 01/12/2025 - 09:04
https://www.wisdomlib.org/hinduism/book/brahma-sutras-thibaut/d/doc63776.html The Śūdras are not qualified for that reason also that Smṛti prohibits their hearing the Veda, their studying the Veda, and their understanding and performing Vedic matters. The prohibition of hearing the Veda is conveyed by the following passages: 'The ears of him who hears the Veda are to be filled with (molten) lead and lac,' and 'For a Śūdra is (like) a cemetery, therefore (the Veda) is not to be read in the vicinity of a Śūdra.' From this latter passage the prohibition of studying the Veda results at once; for how should he study Scripture in whose vicinity it is not even to be read? There is, moreover, an express prohibition (of the Śūdras studying the Veda). 'His tongue is to be slit if he pronounces it; his body is to be cut through if he preserves it.' The prohibitions of hearing and studying the Veda already imply the prohibition of the knowledge and performance of Vedic matters; there are, however, express prohibitions also, such as 'he is not to impart knowledge to the Śūdra,' and 'to the twice-born belong study, sacrifice, and the bestowal of gifts.'--From those Śūdras, however, who, like Vidura and 'the religious hunter,' acquire knowledge in consequence of the after effects of former deeds, the fruit of their knowledge cannot be withheld, since knowledge in all cases brings about its fruit. Smṛti, moreover, declares that all the four castes are qualified for acquiring the knowledge of the itihāsas and purāṇas; compare the passage, 'He is to teach the four castes' (Mahābh.).--It remains, however, a settled point that they do not possess any such qualification with regard to the Veda.

In reply to by कॉमी

गामा पैलवान 02/12/2025 - 00:59
कॉमी, इंग्रजी आमदानीत असल्या पुस्तकांची पैशापासरी पैदास व्हायची. याला कसलाही आधार नाही. गौतम ऋषींनी लिहिलेलं ( वा संकलित केलेलं ) बौधायन धर्मसूत्रात असली काहीशी आज्ञा आहे म्हणून दावा केला जातो. संदर्भ : https://archive.org/details/in.ernet.dli.2015.429882/page/n181/mode/2up मात्र ही आज्ञा भारतात कुठेही अंमलांत आणल्याचं ऐकिवात नाही. फार काय, शिसे वितळवायचं कुठलंही सर्वतोमुखी तंत्र प्राचीन हिंदूंना अवगत नव्हतं. हा इंग्रजी आमदानीत केलेला घुसडग्रंथी कारभार आहे. असाच दावा इस्लामच्या बाबतीत कुठल्याश्या हादिथीचा हवाला देऊन केला जातो. म्हणजेच ही आधुनिक काळातली फेकाफेक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु 02/12/2025 - 16:23
श्री० गा०पै० युक्तीवादाकरता श्री० कॉमी यानी दिलेला संदर्भ निरर्थक आहे असे आपण मान्य करू या. पण तुम्हाला आदि शंकराचार्यांच्या ’चर्पटपञ्जरिका’ या स्तोत्राची गोष्ट माहित असेल अशी अपेक्षा आहे. वयाच्या कोणत्याही अवस्थेत जसे जमेल तसे, काही ना काही शिकत राहील्याने मेंदूचा र्‍हास कमी होतो आणि स्मृतीभ्रंशासारखे विकार कमी व्हायची शक्यता निर्माण होते, असे आधुनिक विज्ञान सांगते (हे पण वेदात कुठेना कुठे सांगितलेले असेलच). त्यामुळे गंगेच्या घाटावर व्याकरणसूत्रांची घोकंपट्टी करणार्‍या वृद्धाला शंकराचार्यांनी उत्तेजन न देता ’भज गोविंदं’ सारखा सल्ला दिला हे काही योग्य केले नाही. वयाच्या पञ्चाहत्तरीनंतर पीएच्डीसाठी नाव नोंदवून नंतर ती पूर्ण केलेल्यांच्या बातम्या जेव्हा वाचायला मिळतात तेव्हा आणि त्यात शंकराचार्य त्रिकाल ज्ञानी असल्यामुळेया गोष्टीचे गांभीर्य जास्त वाढते. व्यक्तीच्या अंगभूत गुणांच्या विकासाला जेव्हा समाजाकडून जेव्हा चुकीच्या कल्पनांचा आधार घेऊन अडथळे निर्माण केले जातात तेव्हा तो समा्ज पूर्ण क्षमतेने विकास पावणार कसा? श्री० पटाईत यांच्याकडून यांच्याकडून या चर्चेला मुद्देसूद उत्तर मिळेल असे वाट्त नाही. ते नेहेमी प्रमाणे ’हास्यास्पद’ हे लेबल लावून हात झटकणार हे निश्चित...

In reply to by कॉमी

विवेकपटाईत 04/12/2025 - 08:22
उपनिषद गीता आणि मनुस्मृति अनुसार जन्मतः सर्वशुद्र असतात शिक्षणानंतर क्रमानुसार त्याची जात ठरते. वरील उदाहरण शास्त्र झालेली भेसळ आहे. वास्तविक प्रमाण नाही. ब्रिटिश सर्वेनुसारच मलाबाग जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण जे पूर्णपणे संस्कृत मध्ये होते 70% विद्यार्थी हे शुद्ध होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक तर चांडाल जातीचे होते. स्पष्ट आहे प्रत्यक्षात सर्वांना शिक्षणाचा अधिकार होता आणि तो दिला जात होता. आजही आर्य समाज तर प्रस्थापित गुरुकुलांमध्ये सर्व जातीचे विद्यार्थी वेदांचे शिक्षण घेतात. यादव जातीचे रामदेव बाबा सर्वांना माहीतच आहे. जन्मानुसार कुल आणि श्रेष्ठ मानणारी लोक त्या काळातील होते आजही होते. आपल्या देशातील अधिकार राजनीती दल ही याच आधारावर देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा ठेवतात.

In reply to by कॉमी

दुसरा प्रश्न : दलितांनी किंवा शूद्रांनी वेदमंत्र ऐकले अस्ते किंवा त्यांचे अध्ययन केले अस्ते तर त्यांचा काय झा*चा फायदा झाला असता? जे रोजच्या जगण्यासाठी धडपडत होते (तेव्हा जवळपास सगळेच) त्यांना मेटाफिजिकल उत्तरे मिळून काय फरक पडला असता असे मला वाटत नाही.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

कॉमी 02/12/2025 - 20:22
आज ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते वेदमंत्र नव्हेत. वेदांच्या संहितांत मेटाफिजिकल उत्तरे ही नसावीत. ती वेदांतात अर्थात उपनिषदात आहेत असे ऐकले आहे. वेदांच्या संहितेत निव्वळ देवांची कवतिके आणि यज्ञ करताना म्हणायचे मंत्र आहेत. आणि शंकराचार्यांचा रोख सुद्धा तिथेच आहे असा अंदाज आहे. शूद्रांना यज्ञ करण्यास परवानगी नसावी. खाखोशंजा.

In reply to by कॉमी

रूप कल्पून तेव्हाच्या शि़क्षणव्यवस्थेतल्या जातीय चूका काढणे मला पटतच नाही. तेव्हा एखादा ब्राह्मण म्हणाला असता मला चप्पल शिवायला शिकवा तेव्हा चांभारांनी त्याला शि़क्षण दिले असते का? मला या सगळ्या जातिउदग्माच्या थेअरीचा भयानक कंटाळा यायला लागला आहे.

आता शिक्षण सगळ्यांना उपलब्ध आहे. वेदकाळात शुद्राना शिक्षण दिले किवां नाही? समजा नाही दिले मग आता कुणाला जबाबदार धरणार.....हे असले विषय म्हणजे खाजवून खरूज काढणे आहे. बरेचजण आपापली गरळ ओकतील आणी काही XXभागवतील. काही डिफेंड करतील पण शेवटी ढाक के तीन पात... ज्या गोष्टी घडून गेल्या त्या ,UNDO,REDO करता येत नाहीत फक्त याद्वारे विष पसरवले जाते. आता सर्वांना शिक्षण उपलब्ध आहे. बरेच आगडे,पिछडे,दलित समाजाचा प्रत्येक घटक याचा फायदा घेऊन आपली पुढील पिढीचे भविष्य उज्ज्वल करत आहे. असले विषय मिपावर आणू नयेत असे मी म्हणणारा कोण पण याचा खरच काही उपयोग आहे का?यातून काही सकारात्मक निष्पन्न होणार आहे का याचा विचार करावा. तसेही ,समाजात जाती,धर्म यावरून वातावरण आगोदरच दुषित झालेले आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. ब्रिटीशांचा एजंडा दुसरा होता ,ते आपले उखळ पांढरे करून गेले . आपण मात्र आजुनही मेकाले बाबाला शिव्या घालतोय. पंच्याहत्तर वर्ष झाले बदला की शिक्षण पद्धती ,कोणी अडकाठी केलीय, पण नाही मुडदा जळत राहीला तरच डोंबाचे महत्व.... बाकी तुमचे चालू द्या.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 03/12/2025 - 11:27
असले विषय मिपावर आणू नयेत असे मी म्हणणारा कोण पण याचा खरच काही उपयोग आहे का?यातून काही सकारात्मक निष्पन्न होणार आहे का याचा विचार करावा.
आणि जात ,धर्म ,वर्ण यावरची इथलीच काय सोमिवर कुठेही चर्चा वाचली की ही केवळ जळजळ बाहेर पडतेय हे समजते.मुळात संशोधकांनी,अभ्यासकांनी यावर इतकं अभ्यासपूर्ण लिहिलंय की आपल्यासारख्या सामान्यांनी यावर अशी चर्चेची गरचज नाही.अशा चर्चा false positive वाटतात.

दलितांना शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले होते. अर्थातच मनुवाद्यांनी! मनुवाद संपवण्यासाठी नेहरू, गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, साने गुरुजी, प्रबोधनकार, पवार, ठाकरे, काँग्रेस असंख्य लोक झटले नी झटताहेत! पण संघरूपाने मनुवाद जिवंत ठेवल्या जातोय! मनुवाद्यांना जोपर्यंत मुळापासून ठेचल्या जात नाही तो पर्यंत ही विषवल्ली जिवंत राहील. दलित शिक्षणापासून वंचित राहू द्यायचे नसतील तर मनुवादाचा प्रसार करणारे ठेचले पाहिजेत!

कपिलमुनी 30/11/2025 - 23:17
शिक्षण सर्वांना होते असे व्यास वगैरे चे नाव घेऊन लिहिता मग कर्णाचे काय ? शोणाचे काय ? त्याआधी रामायणातल्या शंबूकाचे काय ? थियरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक आहे आणि अपवाद म्हणजे नियम नव्हेत.. समाजात एखादा आंतरजातीय विवाह होत असेल तर त्याकाळी याला मान्यता होती असे म्हणणे चुकीचे असते

रामचंद्र 01/12/2025 - 01:19
खरं तर मंत्रानं जर काम होतं तर यंत्राचं कामच काय? सरकारने आता सर्व अभियांत्रिकीवर आधारित उद्योगधंदे बंद करून सत्ययुगातील तंत्रज्ञानाचाच वापर करायला हवा. आधुनिक वैद्यकीय शास्त्र त्यागून मुळ्या, काढे, भस्म, चाटणाधारित आर्यवैद्यकीय चिकित्सापद्धतीचा वापर अनिवार्य केला पाहिजे. पाश्चिमात्य तंत्रज्ञानावर पूर्णपणे बहिष्कार टाकून पूर्णतः सनातन जीवनपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. हे अजून होताना दिसत नाही यासाठी विद्यमान नेतृत्वाचा निषेध करावा तितका कमीच!

In reply to by रामचंद्र

विषयच संपला. बाय द वे, गोबरसंस्कृती कशी श्रेष्ठ होती यासाठी काही पटाईत लोक रात्रंदिवस त्यावर दळन आणत असतात. प्राचीन ते सर्वश्रेष्ठच होतं, असे काही ते असतं. अशा त्या श्रेष्ठ संस्कृतीचं काम आजच्या काळात तोच विचार आद्य महापुरुष पुढे घेऊन जात आहे, अशी ती मांडणी पडद्याआडून करायची असते. आणि मग पुन्हा लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धतीने पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीकडे कसं दुर्लक्ष केलं. पूर्वीची शिक्षणपद्धती कशी सर्वसमावेशक होती वगैरे सुरु असतं. अर्थात, पूर्वीची शिक्षण पद्धती एका विशिष्ट सामाजिक आणि धार्मिक चौकटीत बांधलेली असल्यामुळे सर्वसमावेशक नव्हती, यात आता काही नवं राहिलेलं नाही बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुक्या 01/12/2025 - 05:05
कुणी कुणाला शिक्षणापासून कुणी वंचित ठेवले, किंवा शिक्षण कसे सर्वांना उपलब्ध होते ह्या १०० / २०० वर्षापुर्वीच्या बाता आजमितीला करण्यात काहीही हशील नाहीये. माझ्या किंवा माझ्या बापाच्या काळापासुन शिक्षण सर्वांना उपलब्ध आहे. फलाणा जातीचा आहे म्हणुन तुला शिक्षण घेता येणार नाही असे कुठेही घडल्याचे ऐकीवात नाही. जातीवादाची उतरंड बर्‍यापैकी मोडली आहे. त्यामुळे हा विषय कीतीही चघळला तरी त्यातुन काहीही निष्पंन्न होणार नाही.

युयुत्सु 01/12/2025 - 08:48
अवांतर हा दुवा स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकतो का हे ठरवता येत नव्हते म्हणून इथेच शेअर करतोय. Everyday Habits That Reveal a Low IQ (Backed by Psychology) https://www.youtube.com/watch?v=-vVOOB3Bglk ही मंदबुद्धीत्वाची लक्षणे (Low IQ) एखाद्या मोठ्या समूहात/संघटनेत सापडली तर तो योगायोग अजिबात मानू नये.

पुर्वीचं सगळं चान चान होतं म्हणणारे आणि मनुस्मुतीचे दहन करणारे या दोघांनाही मनोरंजन मुल्याच्या बाबतीत मी १०० पै़की ११० गुण देतो.

ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता असा प्रचार ब्रिटीशांनी आणि स्वतंत्रता प्राप्ती नंतर ब्रिटिश धार्जिणी सरकारी तंत्राने ही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करून फूट डालो राज करो हा राजनीतिक उद्देश्य ही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधता येतात आणि सत्य समोर आणता येते. त्याच्याच संदर्भ घेऊन हा लेख उकेरला आहे. सुरुवात वैदिक काळापासून करतो.

आदिमाया (ऐसी अक्षरे -३४)

Bhakti ·
पुस्तक -आदिमाया लेखक -अशोक_राणा विषय-मातृदेवता आजही जिथे स्त्रीयांववर अमानुषता करणारा समाज अस्तित्वात आहे.तो मातृसत्ताक संस्कृतीची मूळे पूर्ण विसरला आहे. तो समाज सिंधू संस्कृतीतील मातृदेवतांचे उगम वाचायला,जाणून घ्यायला उत्सुक कसा असणार? पण ही सरसकटीकरण करणारी वाक्यं न मानता ज्यांना संस्कृती, संस्कृतीची रूपांतरणे जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हे पुस्तक एकदा तरी नक्की वाचावे. पुस्तकात आर्येतर पूर्व काळातील मातृगणांची ओळख करून देली आहे.

खूप थंडी आहे यंदा

पाषाणभेद ·
खूप थंडी आहे यंदा. पांघरायला ब्लॅंकेट काढू का दुलई काढू? ब्लॅंकेट काढ. पण ब्लॅंकेट धुवायला लागते आधी. मग दुलई काढ. दुलई फार हलकी आहे वजनाला. मग ब्लॅकेट काढ. ब्लॅंकेटने काय थंडी थांबते का? मग दुलई काढ. दुलई थोडी आपरी आहे. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट अंगाला टोचते. मग दुलई काढ. दुलई कॉटनच्या कापडाची नाही नं. मग ब्लॅंकेट काढ. ब्लॅंकेट लई महागाचं आहे नं. मग दुलई काढ. जाऊद्या. आपली गोधडीच बरी आहे.