नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता.
तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद!