Skip to main content

आस्वाद

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

लेखक चित्तरंजन भट यांनी मंगळवार, 18/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात. तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.

शायरे आज़म

लेखक चित्तरंजन भट यांनी मंगळवार, 18/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. कुठे काही अडखळले तर जरूर विचारा.. शायरे आज़म कल इक अदीबो-शायर व नाक़िद मिले हमें कहने लगे की आओ ज़रा बहस ही करें करने लगे बहस की अब हिंदो-पाक में वो कौन है के शायरे-आज़म जिसे कहें मैंने कहा 'जिगर'! तो कहा डेड हो चुके! मैंने कहा के 'जोश'! कहा, क़द्र खो चुके मैंने कहा 'फ़िराक़' की अज़मत का तबसरा! बोले 'फ़िराक़' शायरे-आज़म!

मराठी आंतरजालीय साहित्यिक!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 16/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!) मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं?

ऎसा खत में लिखो

लेखक पंकज यांनी शनिवार, 15/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.
Taxonomy upgrade extras

संस्कृती..

लेखक मिसळपाव पंचायत समिती यांनी शनिवार, 15/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मंडळींचे मिसळपाववर स्वागत! ऋणनिर्देश - नीलकांत गमभनकार ओंकार जोशी =============================================== आमची आदरस्थाने - मनोगत उपक्रम मायबोली माझे शब्द मराठीगझल सुरेशभट डॉट कॉम =============================================== राम राम मंडळी, आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हे संकेतस्थळ सुरू करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपणा सर्व सभासद मंडळींचा या संकेतस्थळावर सक्रीय सहभाग आणि सहकार्य राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व!