मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

गणपती बप्प वर आय० ने बनवलेले पूर्ण गाणे

स्वरुपसुमित ·
मित्रानी तसे हे गाणे खुप आधी बनवलेले होते थोडे काम कराय चे होते पण राहुन गेले तुमचे प्रतिसाद नकी कळवा च्यानेल ला लाइक आणि सुब स्क्राइब नक्के करा https://www.youtube.com/shorts/XTTqu5viY5E

'किशोर‘स्वरातील ‘साहेबा‘चे गाणे

हेमंतकुमार ·
हिंदी चित्रपटांमधील काही गाणी अजरामर आहेत. ती कितीही जुनी झाली तरी ताजीतवानीच राहतात आणि रसिकांना कायमच भुरळ घालतात. किशोरकुमार हे चित्रसृष्टीमधील एक आघाडीचे गायक. अनेक प्रकारांमधली गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गायकांबाबत रसिकांच्या विशिष्ट आवडीनिवडी असतात. तरी पण किशोरकुमारने गायलेली कुठली ना कुठली गीते प्रत्येक गानरसिकाला आवडतातच. असेच एक गाजलेले गाणे म्हणजे सगिना चित्रपटातील साला मैं तो साहब बन गया. . . या गाण्याने गतवर्षी आपली पन्नाशी पूर्ण केलेली असल्यामुळे त्याची ही आठवण आणि त्यानिमित्ताने संबंधित मूळ चित्रपटाचा हा अल्प परिचय.

बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण

Bhakti ·
बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण १ कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

अखेर जमलं !

नूतन ·
नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे. तर झालं असं की, अलीकडेच‌ माझा‌ वाढदिवस झाला. आता या‌ वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम ‌यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो.

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)

Bhakti ·
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :) हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .

निसर्गायण (ऐसी अक्षरे -३०)

Bhakti ·
निसर्गायण लेखक- दिलीप कुलकर्णी. १ जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे. हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो.

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

विवेकपटाईत ·
जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे.

खडपाकोळी

कर्नलतपस्वी ·
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.