✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग १: प्रस्तावना

म
मार्गी यांनी
Wed, 12/24/2025 - 15:17  ·  लेख
लेख
नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता. तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद! ट्रेकिंग आणि त्याच्यासोबत आकाशदर्शन, तेही अतिशय कडक थंडीमध्ये! थोडावेळसुद्धा उघड्या ठिकाणी बाहेर जाऊन बघणं किंवा अंगणामध्ये जाऊन आकाश दर्शन करणं अतिशय कठीण होतं! पण हा सगळा अनुभव ह्यावेळेस घेता आला. (हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल. ) एका लग्नाच्या निमित्ताने पिथौरागढ़ला जाणं झालं. पुढे काही दिवस तिबेट सीमेपासून साधारण शंभर किलोमीटर अलीकडे मुन्सियारी म्हणून एक एक गाव आहे. त्या गावामध्ये थांबून ट्रेकिंग आणि आकाशदर्शन करायचं असं ठरवलं. तिथे इतकी कडक थंडी असते ह्या दिवसांमध्ये! मागच्या वेळेचा अनुभव होता की आपण अंधार पडल्यानंतर म्हणजे संध्याकाळी सहाच्या पुढे आपण मोकळ्या जागेमध्ये पाच मिनिटंसुद्धा थांबू शकत नाही! इतकी थंडी असते. अक्षरशः दोन-तीन अंश तपमान असतं. जवळच सगळा हिमालय आणि थंड प्रदेश असल्यामुळे वारे पण खूप गार असतात. त्याच्यामुळे किती वेळ प्रत्यक्ष आकाश दर्शन करता येईल ही शंका होती. तासांमध्ये करता येईल का मिनिटांमध्ये करता येईल इथपासून शंका होती. पण आकाश दर्शनसुद्धा मनासारखं करता आलं. खूप सुंदर आकाश बघता आलं! त्याला जोडून ट्रेकिंग सुद्धा करता आलं.  .  .  .  ह्या प्रवासाची सुरुवात १ डिसेंबरला झाली. मुंबई ते बरेली असा प्रवास ट्रेनने केला आणि बरेली मधून पुढे टणकपूरला बसने गेलो. उत्तर प्रदेश थोडासा बघितला. उत्तर प्रदेशातले कमालीचे धूळ असलेले रस्ते बघितले! बरेलीच्या जवळ एका ठिकाणी शेतामध्ये असलेला बिबट्यासुद्धा बघायला मिळाला होता! असा हा सगळा प्रवास झाला. टणकपूरला पुढची बस घेण्याच्या आधी रात्री एका छोट्या बस स्टॉपवर थांबावं लागलं. तेव्हापासून थंडीचा कहर सुरू झाला! आणि थंडीची तयारी किती कमी होती, ते मला लक्षात आलं. अक्षरशः एक एक मिनिट जात नव्हता आणि पुढची माझी बस जी होती ती मध्यरात्री तीनची होती. कारण पहाड़ी भागामध्ये रात्री बस कमी प्रवास करतात. पहाटे बस निघतात. टणकपूरची विलक्षण थंडी अनुभवली. मग पहाटे तीन वाजता बस निघाली. टणकपूर उत्तर प्रदेश- उत्तराखंडच्या सीमेजवळ आहे. नेपाळला अगदी लागून आणि कालीगंगा नदीजवळ आहे. पुढे चंपावत- लोहाघाटमार्गे पिथौरागढ़चा प्रवास झाला. सकाळी साडेआठला तिथे पोहोचलो. पण रात्रीचा प्रवास थरारक होता! त्या घाटाच्या रस्त्यावर बस टर्न करायलासुद्धा फार कमी जागा असतात. अतिशय विलक्षण अशा या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली.  .  .  आठ दिवस मी उत्तराखंडमध्ये होतो. त्या दिवसांमध्ये फिरता आलं आणि ट्रेकिंग करता आलं. जिथे जिथे जाऊ शकलो खूप विलक्षण वाटत होतं. सतत मी किती भाग्यवान आहे हीच जाणीव व्हावी, असा हा प्रवास होता. हा सगळा प्रवास व त्यातले अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 23 डिसेंबर 2025.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख

प्रतिक्रिया द्या
761 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

वाचतोय. फोटो आवडले. भाग्यवान

कंजूस
Wed, 12/24/2025 - 16:37 नवीन
वाचतोय. फोटो आवडले. भाग्यवान आहात, सावकाशपणे सर्व पाहात आहात.
  • Log in or register to post comments

व्वा....

किल्लेदार
Wed, 12/24/2025 - 20:22 नवीन
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर प्र. चि.

अनन्त्_यात्री
Wed, 12/24/2025 - 21:07 नवीन
पु. भा. प्र. किल्लेदारांच्या प्रतिसादातील लाल बुरांश फुले अप्रतिम!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
Fri, 01/02/2026 - 16:54 नवीन
सर्वांना धन्यवाद! @ किल्लेदार जी सुंदर फोटो! अहा हा...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा