Skip to main content

शृंगार

त्याची आठवण,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 02/07/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/04/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

तास केंव्हा सरे?*

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी बुधवार, 09/03/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला (जांभई देत): ता sss स केंsव्हाss सsरेssss? दुसरा (निःश्वास सोडून): -हाय! केंव्हा रे सरेल? वाटते लिहून-लिहून हात मोडेल! अन पेनही बहुदा झिजेल! फिजिक्स, केमिस्ट्री संपले तास, उरे अजून हा बायोलॉजीचा त्रास! पहिला: -हाय! तास केंव्हा सरे? दूसरा: खरडून-खरडून भुर्ता झाला! शिजून-शिजून बटाटा झाला! तरी का न ये दया सरांना? फूटे न पाझर तयांच्या हृदयाला? (पहिल्याला एकदम काहीतरी आठवते. तो चुटकी वाजवतो. सॅकमध्ये हात घालतो. एक पुस्तक बाहेर काढतो.) पहिला: युक्ति सुचली मजला खाशी वाचत बसतो आता मी सु. शि.^ (पहीला पुस्तक वाचण्यात गुंग होतो. सरांचे लक्ष त्याच्याकडे जाते.

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/01/2016 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

मध

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 30/12/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी गुलाबी मखमल हवीये , मखमलितला गोड मध हवाय अनानामिका ला नको देउस , जोपर्यंत तो अनामिक मी असेन उचकी लागलिय प्रिये ,मोड्लोय पुरता प्रणयी वात्सल्य हवय , हवय आता तुझ्याबिगर असतो मी जेव्हा , दीन दुबळा असतो मी तेव्हा मला तुझ्या प्रेमाची जरुरी नाही , फक्त तुझ्या प्रेमाची खोली हवी घातकी वाटतो दुरावा तुझा तुझ्याशिवाय श्वाश नाही माझा पर्वा नाही मला कुठ्येस तू , फक्त तुझ्याजवळ हवाय मी अन हवाय तुझ्या प्रेमाचा स्वाद , तू माझ्यात न मी तुझ्यात आत नाही का ओढ्नारेस तू मला , इथेच मी , तुझ परिस दे मला हो , तूच मला जगवलय हो, तुच मला सावरलय.... माझे तुटलेले तुकडे , तूच जूळवलेस तुट
काव्यरस

प्रसन्न सकाळ

लेखक जातवेद यांनी रविवार, 20/12/2015 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ होती वाचत होतो पेपर, हातामध्ये चहाचा कप ग्यालरी माझी चार फुटाची माती भरल्या मडक्यांचे जग एका मडक्यात होती तुळस रांगोळीला केलेला आळस गतलग्नाच्या बांगड्याही तशाच नुकतीच आलेली न्हाउनी उन्हात दुसर्‍या मधील अबोली तर खास खेळवीत होती ओल्या दवास थोडीशी गच्ची बाहेर झुकून रोखवीत होती अगणित श्वास हाय एक होते कोरफड तशात ना रूप सुगंध गणनाही कशात घेतसे कधिमधी आजारी असता औषध म्हणून केवळ लावावयास चौथ्यात असे गोकर्णाची वेल खच्च संपूर्ण गच्चीवर पसरलेली फुले टपोरी दर कोंबानजिक काही परडीत काही राहू दिलेली संपला चहा वाचून झाला पेपर पाण्याचा बंब सोडी गरम हवा उठतच होतो शोधीत कपडा-पंचा आतून आवाज वाजले किती

कै च्या कै कविता ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/11/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
कविता..कवि...आणि कै च्या कै कविता... कधी मुक्यानेच बोलणारी कविता, तर कधी बिअरसवे डोलणारी.. येता जाता माफी मागणारी कविता....! झुरळावर स्वार होवून जोमाने ढेकणावर चढाई करणारी कविता.. आरसे फोडत, वादळात सापडत.. सिगरेटी फुकायला लावणारी कविता...! अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन् गोमुत्राची चव शिकवणारी कविता.. आमच्यासारखे समिक्षक असताना.. सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..! गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता.. विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत, आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...! डोळ्यासमोरून अलगद फिरताना.. डोक्यावरून जाणारी कविता.. आमच्या मंद डोक्यात मंदपणे.. कै च्या

ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 10/09/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्कार्फ आडून चमकती डोळे खुणवून काही बोलताती मनी आमुच्या काही पक्षी हलकेच हळूच उडताती तरंग येतात मनी मग जोवर ती असते पुढे स्वप्न-रंजनाचा पारवा ऊंsssच आकाशी उडे ओढणि ती सँक ती ही डोकावे वॉटर बॉटली सुंदर किती रूप हे भावना मनात साठली हॉर्न मागून वाजताही किल killले तो आरसा निबरल्या आमुच्या मनी फरक न पडे फारसा!

पुन्हा पाऊस

लेखक सटक यांनी गुरुवार, 02/07/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला रे पाऊस, असे असे बरसले अधीरल्या धरतीचे, लाजू लाजू पाणी झाले ! अंगप्रत्यंगी थरार, गात्रे ओथंबू वाहाती एका रात्री असे झाले, काय सांगू तुल किती ! किलकिले डोळे होतं, वाटे थांबल्यासारखे... आळसल्या त्या सकाळी, देता आळोखे पिळोखे ! हाय! परतुनी आला, पुन्हा रत अविरत.. सुखांताने अंधारून, देई आकाश संगत ! धुंद धरा धुंद पाऊ, माग कुणालाच नाही उद्या सकाळी परंतु, वर येई नवलाई ! तरारून येता कोंब, पहा झुलतात झुले मीलनाच्या एकांताला, येती हिरवाळी फुले ! हिरवाळीत नवोढ्या, मन भटक भटक उगी रोखू पाहू नको, होई पाऊल "सटक" !
काव्यरस

पैंजणे

लेखक सटक यांनी शुक्रवार, 26/06/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कुंद काळ्या रात्रीला, वेढून येशी साजणे वीज या उमटे जिव्हारी झळकता ती पैंजणे ! उसळता बेभान वारा, क्शणिक सोडे तंडणे प्राण कानी होत गोळा छनकता ती पैंजणे ! आज सजणा धुंद झाला, तू जुईचे लाजणे थिरकला गात्री प्रणय हा विखुरता ती पैंजणे ! पुसुन नेले पावसाने, नाही..नाही.. सांगणे एक श्वासी लक्श कंठी गात आता पैंजणे !
काव्यरस