लेखकमाहितगारयांनी शुक्रवार, 28/02/2020 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"असुं"या च्या जिद्दीने
व्यवहार सिद्ध होतो
असूया घर करते
सुंदर सत्यास कडवट मानत
खुले विनाअट प्रेम पारखे होते
कल्पना आणि विचार करा..
एकपत्नी व्रताचे बंधन तोडून
राधेकडे पाहिल्या बद्दल ..
सीता रामाची
अग्नी परीक्षा घेते
रेणुका जमदग्नीचा
प्राण मागते
अहल्या गौतमास
पत्थर होण्याचा
शाप देते
एखादा टिम मेंबर
दुसर्या टिम मधून
प्रेमाने खेळता
पझेसिव्ह असुरक्षीत
खोलवर जखमा
ऐकलेत कधी?
ऑनर पनिशमेंट्स
ऑनर किलींग्स
असूयेने पछाडलेली
व्यवहार पूर्णत्वास नेऊनही
प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी
अप्राकृतिक बंधने
अटळच असावित का ?
लेखकशैलेन्द्रयांनी बुधवार, 18/09/2019 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या पैंजनाची गाज,
त्यात रेंगाळे दुपार,
विसावल्या सतारीची
जणू छेडियली तार,
तिच्या कपाळी जी बट
त्याला कुंकवाची तीट,
लाल रेशमी लडीची,
तिच्या गालाशी लगट
तिच्या पाठीची पन्हाळ
त्यात घामाचा पाझर,
तिच्या नाजूक कटीला,
शोभे नाजूकसा भार..
तिच्या बाहूंचा मांडव,
लावी मदनाला वेड,
तिची महकती काया
तिचे ओझे अवघड..
सुस्त दुपारच्या वेळी,
ती येते का सामोरी,
मन हलते हलते,
त्याला सांभाळावे कोणी?
- शैलेंद्र.
लेखकप्रसाद गोडबोलेयांनी गुरुवार, 04/04/2019 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक आंटी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
फोटोरुमच्या बाहेर, एडिटिंग्च्या टेब्लावर
जिथे एक मुलगा बसला आहे एडिटिंग करत....
करत असेल का तो खरेच एडिटिंग ?
की पहात असेल तो
हिडन कॅमेराचे लाईव्ह फीड, लपवलेल्या टॅबमागे?
आंटी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती त्यालाच बोलावते फोटो रुम मध्ये,
ते डोळे डोळ्यात भरुन घेऊन
मुलगा खाडकन जागा होतो ....
भान हरवलेली आंटी
निसरड्या रस्त्यावरुन घसरत रहाते एकेक पाऊल...
घसरतच राहते....
-"जिंदा दिल"(चा एक फॅन )
लेखकअविनाशकुलकर्णीयांनी शनिवार, 29/12/2018 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
सखे काय सांगू.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधरावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनी,कामस्वप्ने तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा.
लेखककहरयांनी मंगळवार, 17/07/2018 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज हलके वाटले तर
चांदण्या तोलून धर
बोल.. पण नयनातुनी
उघडू नको देऊ अधर
उजळुनी हे विश्व अवघे
सावरिशी का पदर
होऊ दे गलका उसासा
मोकळे कर मूक स्वर
जीव घे हासून हलके
ओठ हेच धनु नि शर
ने कुशीतून कालडोही
गुदमरूदे रात्रभर
बरस आता अंतरातुनी
हो पुरी सारी कसर
व्यापूनिया ये तमासम
गात्र गात्र नि शांत कर
चांदण्या तोलून धर