Skip to main content

पुन्हा पाऊस

लेखक सटक यांनी गुरुवार, 02/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला रे पाऊस, असे असे बरसले अधीरल्या धरतीचे, लाजू लाजू पाणी झाले ! अंगप्रत्यंगी थरार, गात्रे ओथंबू वाहाती एका रात्री असे झाले, काय सांगू तुल किती ! किलकिले डोळे होतं, वाटे थांबल्यासारखे... आळसल्या त्या सकाळी, देता आळोखे पिळोखे ! हाय! परतुनी आला, पुन्हा रत अविरत.. सुखांताने अंधारून, देई आकाश संगत ! धुंद धरा धुंद पाऊ, माग कुणालाच नाही उद्या सकाळी परंतु, वर येई नवलाई ! तरारून येता कोंब, पहा झुलतात झुले मीलनाच्या एकांताला, येती हिरवाळी फुले ! हिरवाळीत नवोढ्या, मन भटक भटक उगी रोखू पाहू नको, होई पाऊल "सटक" !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 873
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया