मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तास केंव्हा सरे?*

डॉ. एस. पी. दोरुगडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पहिला (जांभई देत): ता sss स केंsव्हाss सsरेssss? दुसरा (निःश्वास सोडून): -हाय! केंव्हा रे सरेल? वाटते लिहून-लिहून हात मोडेल! अन पेनही बहुदा झिजेल! फिजिक्स, केमिस्ट्री संपले तास, उरे अजून हा बायोलॉजीचा त्रास! पहिला: -हाय! तास केंव्हा सरे? दूसरा: खरडून-खरडून भुर्ता झाला! शिजून-शिजून बटाटा झाला! तरी का न ये दया सरांना? फूटे न पाझर तयांच्या हृदयाला? (पहिल्याला एकदम काहीतरी आठवते. तो चुटकी वाजवतो. सॅकमध्ये हात घालतो. एक पुस्तक बाहेर काढतो.) पहिला: युक्ति सुचली मजला खाशी वाचत बसतो आता मी सु. शि.^ (पहीला पुस्तक वाचण्यात गुंग होतो. सरांचे लक्ष त्याच्याकडे जाते. सर त्याच्या दिशेने येवू लागतात. दुसरा ते पाहतो. तो घाबरतो.) दुसरा (घाईघाईने): दडिव! दडिव! पुस्तक ते! (पहीला पुस्तकाऐवजी वहीच सॅकमध्ये सरकवतो.) सर (भयंकर चेहरा करून): ही काय 'असली' पुस्तके वाचण्याची जागा आहे? कॉलेज आहे की धर्मशाळा आहे? पहिला (दबक्या आवाजात): कुणा ठावे? सर (रागातच): चल निघ इथून झणी तासाला नको बसू कधी! (पहिला वर्गाबाहेर जातो. सर पुन्हा शिकवू लागतात. दुसरा हळूच पुस्तक उचलतो.) दुसरा (पुतपुटत): बरे झाले! एकटाच पुस्तक वाचतो काय? *पहा- एक काव्यप्रकार (झेंडूची फुले-केशवकुमार) ^ सुहास शिरवळकर

वाचने 974 वाचनखूण प्रतिक्रिया 0