कोडी
लेखनविषय:
काव्यरस
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी
तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी
साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला
आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला
पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी
एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"
मौनात राहण्याने नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
माया अजून उरली का काळजात थोडी?
या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते?
जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते?
मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!
वाचने
4213
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"
अमचा नमस्कार स्विकारा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
अमचा नमस्कार स्विकारा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी
तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी
जबहरा
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
सुंदर !!!
मौनात राहण्याने नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
माया अजून उरली का काळजात थोडी?
नादब्द्ध आणि अर्थवाही रचना ... सुरेख !
केवळ सुरेख!!
एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी
वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"
हे अत्युच्च!!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!"
हा वसंता कोण हे कळले नाही बुवा!!
--आ.
नेहेमीप्रमाणे उत्कॄष्ट !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
सुरेख, पण कल्पना आणखी येतील! कारण झाकोळल्या दिशा, पाठीत वार, गुंत्यात पाय याहीपलीकडे तुम्ही जाऊ शकता...
In reply to सुरेख by श्रावण मोडक
श्री मोडक यांच्याशी सहमत. शब्द सुरेख आहेतच पण अनुभवांची व्याप्ती आणि सखोलता वाढली तर कविता आणखी सशक्त होईल.
_________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला
अप्रतीम !
कस काय सुचता ब्वॉ अस? :? :?
नेहमी प्रमाणे भारीच .
सुजय
मौनात राहण्याने नुकसान फार केले
जाणून आपल्यांनी पाठीत वार केले
माया अजून उरली का काळजात थोडी?..... सत्य.
आवडली. सगळीच अर्थपूर्ण आहे.
कविता सुंदरच. वर श्रावण मोडक यांनी म्हटल्याप्रमाणे, पूर्वसुरींनी चोखाळलेल्या रुपकांपेक्षा वेगळे काही दिलेत तर, उत्तमच. पण जे आहे तेही चांगलेच आहे.
एक छान गझल करण्याची ताकद ह्या रचनेत होती. तुम्ही गझलेऐवजी नुसती कविता लिहिल्याबद्दल किंचित नाराजी!
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
आवडली.
-दिलीप बिरुटे
अजून येऊदेत! :)
चतुरंग
वाचा खुंटली