पैलतिरी..
लेखनविषय:
काव्यरस
पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..
इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी
किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी
थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..
किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा
मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा?
शितल छाया मनांस भावेल, रखरखणार्या उन्हापरी
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..
नको विचारू कधी, कुठे तू! प्रेमाने ही भर झोळी
जाऊ तरूनी संसारातून आणिक भेटू सायंकाळी
हात घेऊनी हातामध्ये, सांज आपुली करू साजिरी..
सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी..
- प्राजु
वाचने
2372
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
व्वा.
++
वा!!
छान
समयोचित
ठिक आहे.
आवडली कविता.
आवडली..नादब
या मुक्तछंदा"तल्या कवितेत आर्त भाव-भावना छान उमटल्या आहेत