आभाळ
लेखनविषय:
काव्यरस
घरकूल छोटस,
ना महालाचा हव्यास,
दोन पिलांच हास्य,
आणि तू मात्र खास,
प्रेम भरपूर आणि
रागाचा नुसता भास,
ना आकांक्षा चंद्र सूर्याची,
तुझ्या सावलीचा ध्यास,
उंच आकाशी फिरून पुन्हा
धरतीवरच घ्यावा श्वास,,
हे एवढ आभाळ तुझ्या माझ्या
स्वप्नांना पुरेस आहे
.
प्रसन्ना जीके.२३/४/२००८
वाचने
2717
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
हे मस्तच...!