Skip to main content

<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

लेखक विजुभाऊ
Published on गुरुवार, 19/11/2009
आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे! अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे ! स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे? खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे हार मानिली सार्‍यानी ; तू तसाच राहिला खड्ड्या सारेच रे पडले , माझे तुझ्या मिठीत रे; स्कूटर चा कणा पोलादी ; ऐसा मधेच मोडला चश्मा फुटला दात तुटला ; चूर्ण जबड्याच्या फटीत रे डोके फुटले ,रक्त सांडले ; रस्ता लाल जाहला मान ही कधीच मोडली , उसण भरली पाठीत रे येवढे झाले आहेच आता ; जीव नकोसा झाला .....मरणे सहजच जमेल रे, खड्ड्या तुझ्या मिठीत रे
लेखनविषय:

याद्या 2182
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

डोके फुटले ,रक्त सांडले ; रस्ता लाल जाहला
बा प रे !!! =)) =)) =)) - व्हिनायक गब्रु

*************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

चालू द्या --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!