मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पिकल्या आंब्याला

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
पिकल्या आंब्याला सिच्यूऐशन: हिरवीन आंबे विकणारी आहे. आंबे विकतांना ती गिर्‍हाईकांशी काव्यातून संवाद साधते... गद्य: आंबे घ्या आंबे, गोड गोड रसाळ आंबे आंबे घ्या हो आंबे! चाल सुरू: पिकल्या आंब्याला दाबून पाहू नका घ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ|| आंबा माझा रायवळ, नाही हापूस की पायरी रस जरा चाखून बघा, म्हणाल नमून्याची चव बरी रसासाठीचं आंबं हे आहे, दुसरीकडे जावू नका पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||१|| आंबे आहे घरच्या झाडाचे, नाही काही वाडीचे फळ आहे लयी न्यारं, कलम केलेल्या पाडाचे पानी सुटतं कैरी पाहून, तिला हात लावू नका पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||२|| यावर्षी आंबेमोहर बहरला, असा की हो फुलला कैकांनी टेहळणी केली, मी तो राखीयला आणला चाखायला केवळ, तुम्हांसाठी बरंका पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||३|| तुम्ही आंबं इथंतिथं दाबीता, हात इथंतिथं लावता पाटीत आंबं रचलेत निट, का उगा खाली हात घालता निसंतं बघायचं बघता, आन येळ घालवीता फुका पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||४|| म्हनून शेवटलं सांगते पिकल्या आंब्याला दाबून पाहू नका घ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०५/२०१०

वाचने 2179 वाचनखूण प्रतिक्रिया 3

II विकास II 14/06/2010 - 19:04
पाभेची प्रतिभा चांगली आहे. ----- ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.