Skip to main content

पाऊस

लेखक अनिरुध्द यांनी शनिवार, 12/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कवीता आधीही प्रकाशित झालेली आहे. परंतु पाऊस चालू झाला आणि ही कवीता पुन्हा टाकायचा मोह झाला. आपण आपल्या प्रतिक्रिया द्यालच ही अपेक्षा ठेवूनच हि कवीता पुन्हा टाकत आहे.) ग्रिष्माची ती अतिदाहकता जाळून टाकी प्राणीमात्रा पावसाची एक सर बरसता क्षणात येई आल्हादकता पा़ऊस आला पाऊस आला सर्वांना भिजवून गेला झाडे, वेली, पाने, फुले, गाऊ लागती आनंदी गाणे पाऊस ओला, पाऊस हिरवा स्रुष्टी गाते एक मारवा पाऊस थंडी, पाऊस धुकं स्रुष्टीला त्याचं किती कवतीकं हिरवी शेतं, हिरवी रानं डोळ्याचं फेडती पारणं डोंगरावरती हिरवी दुलई आकाशाला इंद्रधनू झिलई हिरवे डोंगर, वाहती निर्झर तारुण्याला येई पुन्हा भर नदी, नालेही भरून वाहती सागरा मिळण्या अधीर असती आला श्रावण, गेला श्रावण भादव्यातले संपले सारे सण वेद लागले जाण्याचे वेळी अवेळी बरसण्याचे पावसातले नक्षत्र हस्त पाऊस येई गाठून सूर्यास्त कधी कुठे, कधी किती वेळी अवेळी पडत जाई गेला गेला म्हणताना गर्जत तो येई पुन्हा गडगडाट अन् विजांचे तांडव भिजून जाती सारे जीव शेवटचा तो पडला पाऊस दिसे न त्याचा काही मागमूस गेला तो कायमचा आता वर्ष भराची पुन्हा प्रतिक्षा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1330
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अजून येऊ द्या....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जरा बरे लिहिलेत, तर आम्हीही मालकाचे गुलाम राहणार नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)