मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम कविता

तुझी वाट पाहत.

Deepak Pawar ·
काव्यरस
अवखळ वारा रिमझिम धारा हळूहळू सांजावता वाटतं ... तू येशील आता. पावसानं झालंय ओलंचिंब रान मातीलाही सुचलंय दरवळणारं गाणं. मन माझं हेलकावतंय विरहाच्या लाटेवर नजर लावून बसलंय तुझ्या नेहमीच्या वाटेवर. असेच एकदा आठवणींचे मेघ भरून आलेले नकळत डोळ्यातून झरुन गेलेले. तुझी वाट पाहत तिथे भिजलो होतो चिंब म्हणून कुणा दिसले नाहीत आसवांचे थेंब. नाहीतर मित्रांना हे गुपित कळलं असतं खरं सांगतो त्यांनी मला खूप-खूप छळलं असतं. आता हळूहळू होऊ लागलेय रात मंद मंद जळते आहे दिव्यामधील वात. झोपलीत पाखरं गाणं गात गात मन माझं सैरभैर तुझी वाट पाहत.

व्हॅलेंटाईन दिनी

श्रीगणेशा ·
कोणे एके काळी व्हॅलेंटाईन दिनी मोठ्या उत्सुकतेने मी आणली होती साडी होती जरी साधी ती खुश मात्र झाली प्रयत्न केला खूप तिने पण नीट नेसता नाही आली गोंधळली क्षणभर हसली ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी पण गोड आठवण प्रेमाची तिने अजूनही जपून ठेवली आता एवढ्या वर्षांनी सुचतील कशा प्रेम ओळी पण मला पाहायची असते तिच्या गालावरील सुंदर खळी त्यासाठी कविता विनोदी ऐकून म्हणे अजून नाही जमली मला वाटलं कविता तिला म्हणायचं होतं साडी (सौं साठी!)

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

पाषाणभेद ·
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२

खंडेरायानं करणी केली

पाषाणभेद ·
यळकोट यळकोट जय मल्हार बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥ व्हती मेंढरं खंडीभर चराया नेली डोंगरावर हिरवा पाला रानोमाळं भवती गार गार वारं आलं भरूनी आभाळं काळ्या ढगांच झालं भार पळात आलं धरणीवर चकमक दावली विजेनं कल्लोळ उठला त्या ठाणं चमत्कार दावला देवानं वर रोखूनी धरलं त्यानं बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥ एका दिशीची कहाणी तहान लागली मेंढरास्नी नेली देवानं गिरणेवरी प्यायला लागली पाणी नदीला आला पूर भरपूर जिकडे तिकडे हाहाकार केला छातीचा बंधार पाणी अडवती मल्हार बाणाईच्या मेंढरासा

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार ·
लेखनविषय:
वेड असो वा प्रिती वसंतात मने जुळती पण, प्रणय उचंबळून येता हा दोष कुणाचा साथी? हरखुन सळसळणारे हास्य आपुल्या गाली अलवार सांगते तेव्हा संगित नाचते ताली नवनीत क्षण सरण्यापूर्वी पाकळी पाकळी मखमली रूतलेल्या हुंकारांना अंधारात सुलगव खुशाली खुलती सुगंध कायेचे कोवळी फुले सु'मनाची स्वप्नांचे पंख पांखरुनी सजणूक दे फुलोर्‍याची * येथून सु'डंबण प्रेर्ना

तुझे गाणे

अनुस्वार ·
मी पाऊस झालो सखे तू माती होशील का? स्पर्शाने माझ्या अलगद तू सुगंध होशील ना? मी दरीत येऊन पडलो तू वारा होशील का? शीर्षासन करून मग मी जग पायाखाली घेईल ना. तू रात्र अबोली हो ना मी चंद्र सखा तुज भेटेल. तू पहाट होशील तेव्हा मी तुझ्याच कुशीत झोपेन. सुख बिंदू झेलायला तू गवताचे पाते हो ना. आयुष्याच्या धक्क्यांना मग मी अलगद सोशीत जाईल. जरी विस्कटली घडी जीवनाची तू अशीच हसरी राहशील? मी वचनाने मज बांधून घेतो हे गाणे तुझ्याच साठी गाईल.

तुझ्या घरातले अनारसे

चॅट्सवूड ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या घरातले अनारसे कधी खायला मिळतील? माझ्या घरातले लाडू आता कधीही फुटतील!! तुझ्या त्या गोड शंकरपाळ्या मला चहा बरोबर चालतील आमच्या चिवड्यांचे डबे आता रिकामेच राहतील तुझे ते चिरोटे (२) कायम लक्षात राहतील माझ्या त्या कडबोळ्या वातड होऊन जातील तुझ्या या फराळाला घरातले ही 'दात' देतील उन्हात टेरेसवर वाळवून वर्षभर पुरवून खातील...

मी एकटी

पाषाणभेद ·
काव्यरस
तांबडा का तो चंद्र नभीचा का न असे नेहमीचा चंदेरी ओळख असूनी अनोळखी प्रित लपवीत रागावली स्वारी फुले कळ्या घेवून पाने मी एकटी उभी कधीची वाट पाहूनी रात्र संपली पहाट उजाडली नभाची - पाषाणभेद २४/१०/२०२१

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद ·
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त ·
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .