मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझी वाट पाहत.

Deepak Pawar · · जे न देखे रवी...
काव्यरस
अवखळ वारा रिमझिम धारा हळूहळू सांजावता वाटतं ... तू येशील आता. पावसानं झालंय ओलंचिंब रान मातीलाही सुचलंय दरवळणारं गाणं. मन माझं हेलकावतंय विरहाच्या लाटेवर नजर लावून बसलंय तुझ्या नेहमीच्या वाटेवर. असेच एकदा आठवणींचे मेघ भरून आलेले नकळत डोळ्यातून झरुन गेलेले. तुझी वाट पाहत तिथे भिजलो होतो चिंब म्हणून कुणा दिसले नाहीत आसवांचे थेंब. नाहीतर मित्रांना हे गुपित कळलं असतं खरं सांगतो त्यांनी मला खूप-खूप छळलं असतं. आता हळूहळू होऊ लागलेय रात मंद मंद जळते आहे दिव्यामधील वात. झोपलीत पाखरं गाणं गात गात मन माझं सैरभैर तुझी वाट पाहत.

वाचने 2310 वाचनखूण प्रतिक्रिया 5

आवडली कविता.
मन माझं हेलकावतंय विरहाच्या लाटेवर नजर लावून बसलंय तुझ्या नेहमीच्या वाटेवर.
प्रेमात पडलात की वाट पाहणे आलंच.
आता हळूहळू होऊ लागलेय रात मंद मंद जळते आहे दिव्यामधील वात.
मंद मंद जळते दिव्यामधील वात हे आवडलं. खासच. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे (मंद मंद तेवत असलेला )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राघव Wed, 03/16/2022 - 16:28
मंद मंद जळते दिव्यामधील वात हे आवडलं.
सहमत. छान रचना! आवडली.