मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी गझल

वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे? मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे? करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या? वगळून आशयाला चालेल का कधी रे? नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले दगडात देव आहे वाटेल का कधी रे? खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे? टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे? व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे? विशाल...

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने

मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
गाढवाला सांगतो, गीता... असा मी बावळा दांभिकांची कैद ज्ञाना, ज्ञानवंता कोहळा धर्म नामे सर्प डसतो, मानवी वेडेपणा भूक घेते प्राण येथे, पिंड मागे कावळा भाव नाही जाणलेला वरलिया रंगा भुले वर्ण वाटे गोरटा मनरंग काळा सावळा करपलेल्या भाकरीचे पदर घेतो वाटुनी घास उदरी पोचला तो, होय मोठा सोहळा मी हरीच्या पायरीवर पीर आहे रेखिला भ्रष्ट म्हणती लोक आम्हा, कोण येथे सोवळा? घाबरावे या जगां इतका नसे कमजोर तू सांग त्यांना ठासुनी, समजू नका मी कोवळा ! वृत्त : कालगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा (इतरत्र पूर्वप्रकाशित) विशाल

हिशोब..

चुकलामाकला ·
लेखनविषय:
काव्यरस
मी जन्मांचा विचार केला ,तुझी धाव पण वर्षांपुरती कसे निभावू नाते अपुले ,परतुनी आले अर्ध्यावरती … किती विनवण्या, किती अबोले, एका छोट्या पत्रासाठी हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती… शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती … उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले , कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती...

"अर्थ"

दिपक विठ्ठल ठुबे ·
काव्यरस
शब्दांत गुंफले मी हळुवार जाणिवांना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..||धृ|| मज स्मरणात आज ही रे ती संध्या भारलेली संग लाभला तुझा अन काय माझी मोहरली जणू चैत्र वणवा विझावा वळवाच्या सरींनी भिजताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना.. ||१|| हे बंध जे जगाचे पायात घोळणारे माझी अबोल प्रीती जणू भिन्न दोन्ही किनारे दिसतो तुझाच चेहरा माझे प्रतिबिंब पाहताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..

<पतंग>

राजेश घासकडवी ·
लेखनविषय:
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

इरेला पेटला आहे पिसारा (गझल)

अजय जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
सुखाचा केवढा झाला पसारा बिलगला वेदनेचाही पहारा तुझ्या लाटेत सामावून घे ना कधीचा थांबला आहे किनारा तुझ्या वाणीत सारे भाव होते नको सांगूस की केला पुकारा तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी नसे ही बातमी आहे इशारा किती चेकाळली स्वप्ने उराशी पहा मिळताच थोडासा उबारा अजुन तुडवीत आहे पाय काटे अजुन नक्की नसे माझा निवारा शरीराची उडाली फार थरथर मनामध्ये कुठे होता शहारा? मला सांगून गेला आपलेपण तुझा तो एक ओळीचा उतारा दुरुन नुसतेच तू नाचू नको ना इरेला पेटला आहे पिसारा जगाला पाहिजे ते ते म्हणू दे 'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा

गुंफता कवन हे

वेल्लाभट ·
लेखनविषय:
नमस्कार मंडळी, एका उर्दू संकेतस्थळावरील काव्यदालनात विहरताना मला एक रोचक धागा दृष्टीस पडला होता. त्या धाग्यातील कल्पना मला आवडली, आणि ती मिपावरही आपण उतरवावी असा मनात विचार आला. त्यासंदर्भात संपादक मंडळाशी संवाद साधून त्यांच्या सहमतीने, वतीने मी ही कल्पना, हा उपक्रम आपल्या सगळ्यांसमोर मांडत आहे. गुंफता कवन हे उपक्रमाचं साधारण स्वरूप असं आहे, की एक काफ़िया घेण्यात यावा, आणि त्याला आपापल्या प्रतिभासाच्यात घालून सभासदांनी त्यांना सुचतील तसे शेर जोडत जावे आणि आकारास यावी एक सुंदर कविता; एक सुंदर ग़ज़ल. याकरिता, दोन काफ़िये दिले जात आहेत.

वारे जरासे गातील काही...

अजय जोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
वारे जरासे गातील काही येतील काही, जातील काही हृदयी तुझ्या मी येणार होतो इतक्यांत दिसले आतील काही झाकून डोळे हसलीस ओठी कळले तुझ्या मौनातील काही म्हण तू स्वतःला पाषाणहृदयी ढळलेत बघ डोळ्यातील काही घायाळ करती हृदयें हजारों नजरा तुझ्याही कातील काही संसार सागर जातील तरण्या बुडतील काही, न्हातील काही दुःखे जगाची का रंगवू मी? जगतो सुखाने त्यातील काही सोडू नये सुख, कुठल्या क्षणाचे मिळते जरी अंशातील काही किंवा / आणि वेसण कशाला घालू सुखाला? मिळते किती? अंशातील काही अंधार जितका, तितकीच आशा... उजळेल कोनाड्यातील काही घ्यावे 'अजय' सारे जे हवे ते सोडू नये पण... हातील काही - अ. अ. जोशी (२०१४)

मुळीच नाही

वेल्लाभट ·
लेखनविषय:
काव्यरस
मुळीच नाही शहाणेच सर्व जितके, तितका मुळीच नाही वेडा असून तुमच्या इतका मुळीच नाही सच्चा न मी तरीही, लुच्चा मुळीच नाही माझे न जे तयाची, इच्छा मुळीच नाही तत्वास जे न जपती, जपती कसे स्वतःला स्वतःवरीच ज्यांची, निष्ठा मुळीच नाही किती वेगळाच आहे, हा हर्ष तुझ्या डोळी परका जरी न असला, सख्खा मुळीच नाही त्या विठ्ठलास जातो भेटावयास जेंव्हा माझ्या शिवाय तेथे दुसरा मुळीच नाही पुढती कुणी कुणाच्या, मागे कुणी पडे माझ्या समोर असली चर्चा मुळीच नाही इच्छा मनात यावी, लावून वेड जावी मग कोण काय म्हणतो, पर्वा मुळीच नाही हा कोण रे समोरी, आहे अपूर्व माझ्या या आरशात माझी, प्रतिमा मुळीच नाही - अपूर्व ओक