मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"अर्थ"

दिपक विठ्ठल ठुबे · · जे न देखे रवी...
काव्यरस
शब्दांत गुंफले मी हळुवार जाणिवांना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..||धृ|| मज स्मरणात आज ही रे ती संध्या भारलेली संग लाभला तुझा अन काय माझी मोहरली जणू चैत्र वणवा विझावा वळवाच्या सरींनी भिजताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना.. ||१|| हे बंध जे जगाचे पायात घोळणारे माझी अबोल प्रीती जणू भिन्न दोन्ही किनारे दिसतो तुझाच चेहरा माझे प्रतिबिंब पाहताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना.. ||२|| मी जाणते सख्या रे तव चिंतनी मी आहे होकार मनी जपते डोळ्यात लाज आहे झणी टिपूनी घे ओठांनी विरहाच्या आसवांना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..||३|| डोळे लागले प्रिया रे वाटेकडे तुझ्या रे ये झडकरी घे लवकरी कवेत मज सख्या रे तुज पाहण्याची लालसा मिटनाऱ्या पापण्यांना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना.. ||४||

वाचने 1891 वाचनखूण प्रतिक्रिया 7

जेपी 01/12/2014 - 17:58
छान आवडल. अवांतर-नवीन प्रथेप्रमाणे मिसळपाव वर स्वागत. पुढील कवितेच्या प्रतिक्षेत. :-)

In reply to by जेपी

दिपक विठ्ठल ठुबे 01/12/2014 - 18:06
मिसळपाव वर पहिलाच दिवस माझा. वाचता वाचता वाटले आपणही लिहुयात. नवीन मित्र बनवूयात.. शीघ्र प्रतिक्रियेबद्दल आभार..

स्वप्नज 01/12/2014 - 20:41
चांगलीय. आवडली.

शब्दानुज 02/12/2014 - 17:59
शेवटी म्हणालात की वाटेकडे डोळे लागले .....पुन्हा म्हणालात मिटलेल्या पापण्यांनी..... असे कसे... असो विनोद अलहिदा.. टिपुन घे अोठांनी विरहाच्या आसवांना.....व्वा