एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू
वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू
वाटही पाहून झाली काळ तो सरला किती
ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू
झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी
का कधी शंका न आली मारली मज थाप तू
प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही
जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू
जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे
मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू ..
.
काव्यरस
मिसळपाव
छायाचित्र जालावरून साभार
भिंतीपल्याड जग असतं, निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
पुढे जायचा वसा कधी टाकू नये
ठेच लागली जराशी तर लंगडावं की
आहे त्यातच समाधानी रहावं, पण
इच्छित साध्य करण्या थोडं झगडावं की
घेऊ द्यावा मनालाही निर्णय त्याचा
मनाला जे आवडतं ते, निवडावं की
सदासर्वदा चांगुलपणा अळणी होतो
अधनं मधनं जरा जरासं बिघडावं की
निसटून जातो काळ हातून तरीसुद्धा
जमेल तितकं आपण घट्ट पकडावं की
भिंतीपल्याड जग असतं निरखावं की
कड्या काढून दार सताड उघडावं की
- अपूर्व ओक