Skip to main content

मराठी गझल

मरणे कठीण झाले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 30/04/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला

नाटकी बोलतात साले!

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/04/2013 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;

एवढासा

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 23/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
भानावरी आज आलो जरासा माझाच मी भासलो एवढासा समजावुनी या मनाला पुन्हा मी दिधला नव्या कल्पनेला दिलासा रडू कधीचे स्मरून हसलो आणि टाकला भावनेने उसासा जशी रात्र आणि दिवस हा जसा कधी मी नकोसा कधी मी हवासा नको दूर शोधू सुखाला अपूर्व खेळच मुळी हा असे एवढासा २४-४-१३ १८:०१
काव्यरस

फिर्याद

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 22/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली ही पुन्हा मला आज, तुझी याद आली घनांचे पुरेपूर बरसून झाले आता कोण आसवांना, अवेळी साद घाली तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे वाटले जगास माझी, चाल सुखात झाली ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली
काव्यरस

त्यांचाच जीव घे तू ..

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 21/04/2013 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांचाच जीव घे तू ..... हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता मातीत राबताना इतके कळून आले फुकटात ठोस जखमा!

<नाव सुचले नाही>

लेखक चाणक्य यांनी मंगळवार, 02/04/2013 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता
काव्यरस

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 25/03/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला

कदाचित

लेखक जयवी यांनी शनिवार, 16/03/2013 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
सुखासीन आयुष्य अळणी कदाचित चवीला व्यथाही जरूरी कदाचित म्हणावे तशी ती न जगली कधीही जराही असोशी नसावी कदाचित पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी तुझी भेट झाली असावी कदाचित जरा लांबलेलीच ती रात्र होती दिशाहीन झाली असावी कदाचित नको आणखी कोणताही उतारा नशा वेदनांची पुरेशी कदाचित उभा जन्म गेला करूनी गुलामी हिशेबात अजुनी उधारी कदाचित पिते ताक फुंकून फुंकून अजुनी कुणी पोळलेली असावी कदाचित सुखालाच केले म्हणे जायबंदी बरळणे असावे खरेही कदाचित जयश्री अंबासकर
काव्यरस

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

लेखक जयवी यांनी मंगळवार, 19/02/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही मी जगत राहिले पुन्हा पुन्हा ऊन्मळले नाही आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही जयश्री अंबासकर
काव्यरस

समजत नाही...

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 14/02/2013 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://www.misalpav.com/node/23918 क्रांतीतैची परवानगी घेउन हा प्रयत्न सादर करत आहे,मला गझलच काय कविता सुद्धा करता येत नाही,तरीसुद्धा पण हा एक प्रयत्न , मुड बदलाचा.
काव्यरस