मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कालगंगा

बोली बोली बायका बोली

शिव कन्या ·
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...

डिजीटल डिजीटल

शिव कन्या ·
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार ·
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

सत्वर

शिव कन्या ·
सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा हे अंतर आता पाश म्हणू कि नाश जीवाचा करिल ऐसा तुझ्या रुपाचा तीर्थघटाचा जन्मजान्हवी, श्वास मिटावा नकोच आता वियोग असा कि दो तीरांचे वा हिमालयाचे बंध तोडूनी पाश टाकूनी माझे उरले संचित आता तुझ्या रुपाशी मिळून जावे जिथून आले हासत खेळत तिथेच माझे असणे नसणे... इतकेच होवो पुण्यसलीले, तुझ्या तटाशी भंजन व्हावे भस्मचिता अन् बंधमोक्षही उरू नये ते काही काही.... सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा.... शिवकन्या

आत्मताडनाची कविता.....

शिव कन्या ·
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या ·
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

काळाची उबळ

माहितगार ·
लेखनविषय:
खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत ! खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, जेव्हा माणूस विचार करावयास शिकला तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल. सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज गुन्हेगारी आभाळाला टेकली राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली महागाईचा पारावर गेला प्रदुषणाने कळस केला प्रगती कशी प्रतिगामी झाली प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले स्

चारू-वाक १

माहितगार ·
लेखनविषय:
निद्रेपरी ना निद्रा, जागेपणी ना जाग मनास अशांत जुंपणे, कोण हा अभाग \\१\\ शक्यतेचा थांबवून शोध, मनास नुसती गवसणी मिळेल कोणसी माया, ना केलीस जरी मागणी \\२\\ ना करिसी, परी आपले बरे करिसी शक्य तरी शांती सूख पाविसी \\३\\ चाराचे होता एक गूण, पाहसी डोळ्यात डोळे दोन हरवले जरा पाहुणेपण, भेदास सार्‍या हरवून \\४\\ मधूर ते मिष्ठान्न , लोभ घेता मेळवून क्षोभ टाकावा झाकून, होतसे शांत चित्त मन \\५\\ नको करूस हाव, परी हवी संपन्नतेसी धावे ज्ञान-विज्ञान घेऊन पाव, देशो देशी जावे \\६\\ चारू-वाक २ नावारूपास यावे, आनंदे जगावे, साजेसे सजवावे, सुखी समाधानी व्हावे \\७\\ जनसागरी कोठे भेद, मेळवावे एकात

पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

माहितगार ·
लेखनविषय:
तरूस लगडली सुवासिक आम्रफळे परी कोयी अन बीया मोजतो हा बळे पाण्यात मासे उसळतात रेतीच्या खोप्यास हसतात तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे जळात उतरू कसा प्रश्न हा पडे आर्जवी पाणिते अवीट परी कृष्णास दिसे का मीठ खेळती कधी लहर कधी लाट प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे