Skip to main content

काहीच्या काही कविता

(ती पहा पडली गझल)

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 16/05/2017 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी आम्हालाही वाटतं राव... विडंबन जत्रेत सामील व्हावं असं. चला. प्रेरणा ती पहा पडली गझल साबू सटकल्यासारखी मनाची अंघोळही लवकर उरकल्यासारखी शॉवराचे थेंब विरले काय आणि मी लिहू शब्द शोधी भावना पंचा हुडकल्यासारखी शृंखला विडंबनांची गाजते बोर्डावरी भर मीही घालतो दाणे बुचकल्यासारखी हो, जरा साशंक होतो नळ फिरवतानाच मी धारही ती अडखळे श्रीमुख विचकल्यासारखी हाय तो पडला नवीन साबू संडासामधे 'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी -टुबुकजित

'आयटी'तल्या मोरूची कवने

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 07/05/2017 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
गगनचुंबी चकचकीत इमारतीतल्या आरस्पानी स्वागतिकेच्या डोक्यामागे तेजोवलयासारख्या लकाकणार्‍या भल्यामोठ्या टी व्ही संचावर हसर्‍या गण्याचा फोटू पाहून मोरू क्षणभर थबकला ... जाड भिंगाच्या चष्म्यामागचे बोलके डोळे चेहर्‍यावर स्पष्ट दिसणारे बुद्धीचे तेज नखशिखांत उंची वस्त्रप्रावरणे ल्यालेल्या जेमेतेम चाळीशीत कैलासवासी झालेल्या गण्याच्या फोटूमागचा शोकसंदेश वाचला अन मोरूच्या पायातले त्राणच गेले ... अमुकचा मुलगा सोळा तास अभ्यास करतो आपला सगळा आनंदच आहे कामचोर कारकुंड्या तीर्थरूपांच्या आवाजातला उपहास कितीही काम केले तरी त्याने कोणी मरतो का? काय धाड भरली आहे तुला? मॅनेजरच्या आवाजातली चीड सरकारी नोकरीवाला शे

डिअरपिअर...मॅकबेथले... काळाची उधई गिळी टाकई!

लेखक माहितगार यांनी रविवार, 23/04/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २) अरे डिअरपिअर कशास बघतोस स्वप्नात जुई...

( वरपरीक्षा )

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 31/03/2017 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने !

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 04/02/2017 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने । राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने, काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने । कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो, छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने । भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ? रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने । तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा, टेक-होम झाला कमी का?

कधीतरी.....

लेखक पराग देशमुख यांनी रविवार, 29/01/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

लेखक पराग देशमुख यांनी शुक्रवार, 27/01/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा

अमिट लक्ष्मणरेखा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 14/12/2016 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
वासनामयी डोळ्यांनी पाहिले तिच्याकडे मी. नवयौवना कोमलांगी नोट नवी कोरी दोन हजाराची. विरहाच्या अग्नीत तडफडू लागलो तरीही विवश होतो मी अलंघनीय होती सुट्ट्या पैश्यांची ती अमिट लक्ष्मणरेखा.

(काळी असे कुणाची)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 19/11/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

वादळ

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शुक्रवार, 21/10/2016 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!