कधीकधी आम्हालाही वाटतं राव... विडंबन जत्रेत सामील व्हावं असं.
चला. प्रेरणा
ती पहा पडली गझल साबू सटकल्यासारखी
मनाची अंघोळही लवकर उरकल्यासारखी
शॉवराचे थेंब विरले काय आणि मी लिहू
शब्द शोधी भावना पंचा हुडकल्यासारखी
शृंखला विडंबनांची गाजते बोर्डावरी
भर मीही घालतो दाणे बुचकल्यासारखी
हो, जरा साशंक होतो नळ फिरवतानाच मी
धारही ती अडखळे श्रीमुख विचकल्यासारखी
हाय तो पडला नवीन साबू संडासामधे
'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी
-टुबुकजित
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2463
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे अजुन एकाला गजल झाली की....
नाही; तो पडला ना ;))
In reply to अरे अजुन एकाला गजल झाली की.... by ज्ञानोबाचे पैजार
जब्रा रचना..! आवडली.
(No subject)
हा हा!
हा हा हा ! मस्त!
शब्द शोधी भावना पंचा