मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने !

संजय क्षीरसागर · · जे न देखे रवी...
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने । राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने, काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने । कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो, छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने । भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ? रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने । तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा, टेक-होम झाला कमी का? व्हिलनी नव्या लोनाने । भाडेकरी मी शोधतो पण, रेंट पाडूनी मागती, मुजोर कामवालीचाही रेट, वाढतो नव्या दराने । मोल उसंतीला ना उरले, बिल्डराने पुन्हा काढली , नदीकाठची स्कीम देखणी, नव्या मुहूर्ती, नव्या दराने । आभार्स !

वाचने 5257 वाचनखूण प्रतिक्रिया 13

लीना कनाटा 06/02/2017 - 09:07
इएमायमुळे सुबत्ता गेली | सुबत्तेविना स्वास्थ गेले | स्वास्थविना प्रगती गेली | प्रगतीविना वित्त गेले | वित्ताविना इएमाय ग्रस्त खचले | इतके अनर्थ इएमायने केले! इति इएमाय पुराणाम संक्षीप्त

शब्दबम्बाळ 06/02/2017 - 10:08
राबतो दिन रात्र तरीही भार हा कमी होईना शोधतो कमवायला जोड-धंदे मी, पुन्हा नव्याने! घर छोटे कर्ज मोठे, संपेल का विवंचना, बांधले आयुष्य माझे दावणीला, भरल्या मनाने...

In reply to by शब्दबम्बाळ

मीटरमधे बहुदा असं बसेल राबतो रात्रंदिनी तरी भार कमी काय होईना, शोधितो मी जोड-धंदा फावल्यावेळी, नव्या दमाने! सुपरबिल्टप एरिया अन अप्पर लिमीटच्या लोनने, बांधले मी दावणीला मालाच की, पुन्हा नव्याने |