मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्य

(कूणास ठाऊक ?)

टवाळ कार्टा ·
पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

(शाक दाट वाटान्याची)

रातराणी ·
पैजारबुवा, नीमोतै आणि सध्या अद्रुश्य झालेले/ल्या दमामि येऊन षटकार ठोकून जायच्या आधी दोन रन काढून ठेवते. प्रेरणा द्यायचा कंटाळा आला आहे. घेतो खीर ओरपून ही किमया गोडाची बेल्ट जरा सैलावून चिंता करतो घेराची पुरीआड दडती भजी भय घालती केलरी डोळे वटारता बायको देऊ मोत्यांच्या सरी येता ताटात पुलाव शोधू काजूचे काप कसा टाकू शिल्लक नको माथी पाप डायट मारती माथी इथे सारेच पापड* जो मारतो मिटक्या त्याला म्हणती खादाड कशी सरता सरेना शाक दाट वाटान्याची गच्च भरल्या पोटाला ओढ भारी मठ्ठ्याची *पापड : बारीक या अर्थाने.

तास केंव्हा सरे?*

डॉ. एस. पी. दोरुगडे ·
पहिला (जांभई देत): ता sss स केंsव्हाss सsरेssss? दुसरा (निःश्वास सोडून): -हाय! केंव्हा रे सरेल? वाटते लिहून-लिहून हात मोडेल! अन पेनही बहुदा झिजेल! फिजिक्स, केमिस्ट्री संपले तास, उरे अजून हा बायोलॉजीचा त्रास! पहिला: -हाय! तास केंव्हा सरे? दूसरा: खरडून-खरडून भुर्ता झाला! शिजून-शिजून बटाटा झाला! तरी का न ये दया सरांना? फूटे न पाझर तयांच्या हृदयाला? (पहिल्याला एकदम काहीतरी आठवते. तो चुटकी वाजवतो. सॅकमध्ये हात घालतो. एक पुस्तक बाहेर काढतो.) पहिला: युक्ति सुचली मजला खाशी वाचत बसतो आता मी सु. शि.^ (पहीला पुस्तक वाचण्यात गुंग होतो. सरांचे लक्ष त्याच्याकडे जाते.

< अश्शी सासू असती तर >

अन्नू ·
अश्शी सासू असती तर, आंम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात बायकोला, असं उठसूट सासुरवाडीला घेऊन गेलो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अश्शी सासू असती तर आळी सगळी गाजवली असती, मिजास मोठी केली असती, राजा बनून हिंडलो असतो मेव्हणीही म्हणली नसती मेल्या बाजु सर अश्शी सासू असती तर घरातल्या कार्ट्यांजवळ तिला सोडून गेलो असतो आंम्हीसुद्धा नवरा-बायको मग सतत जवळ दिसलो असतो मळ्यातल्या शिदुबाने दिले असते अनेक वर अश्शी सासू असती तर सासुरवाडीतल्या मेव्हण्यांनी ठोकला असता सलाम दहा ते दहा रोज मस्त केला असता आराम सासर्‍यांनी माझं ऐकून वेळेअगोदर भरले असते लार्ज पेग अश्शी सासू असती तर मिपाबंधुंनी रम डिलेवरी केली असती म

अशी बायको असती तर

हरिदास ·
अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो भर तारुण्यात कफनी घालून, रानावनात निघालो नसतो तिची नसती आली कुणालाच सर अशी बायको असती तर पेशवाई गाजवली असती, मिजास मोठीकेली असती, राजबिंडा बनून मिरावलो असतो पर्वतीवर छोटस आमच असत घर अशी बायको असती तर सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर अशी बायको असती तर तुळशीबागेतल्या फेरीवाल्यांनी केला असता सलाम एक ते चार रोज मस्त केला असता आराम दुकानदारानी माझ ऐकून वेळेअगोदर उघडले असते शटर अशी बायको असती तर चितळेबंधुनी होम डिलिव्हरी केली असती माझ्यास

टाकटोकावली

नाखु ·
अगतगडमतर्रर्रमताशा ढोलबडवीभाऊबत्ताशास्वारीमर्जीखाशा वाटास्त्वर्खिरापती बेल्भंडारासूचक्मौन पोकळवासाभीकडोहाळे भाळीफुपाटी रेखीजाण्यतेराखीचिल्लरगौण नवनीतीशिंकाळे सल्लजाकुचंबीतनिसर्गबंधीत चिंताभीषण्कळीकांची हायखाउदेनिसर्गकुंठा दूरांदाजीकचराकोंडीजलपर्णी शांत्पहाराखुशीतगाजर नजरर्घड्याळीहितवरकर्णी निवडणुकीचा ‘संकल्प’

रात्रीस भेळ चाले

मूखदूर्बळ ·
रात्रीस भेळ चाले ही मूठ कुरमुर्‍याची संपेल ना कधीही ही भेळ पण्डीतान्ची हा कन्द (बटाटा) ना दग्दभू, मिठा-तिखा (रस) वाहतो हा मिश्रणात रगड्याच्या अभिशाप भोगतो (डास) हा पुरीस होई साक्षी हा दूत चिलटान्चा खाण्यास पाणीपुरी ही असते खरी चटक जे सत्य भासती ते नसते खरे टोपात पुसतात बुडवूनी ते बोट धोतराला या साजिर्‍या भैयाला का गाठावे खिण्डीत मिटतील सर्व शंका (पाहून ) न्हाऊन या मिठीत (मिठी नदी :फिदी:) परतेल का तरीही आजार हा क्षणाचा चु भू द्या घ्या मूळ गीत रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा चंद्र ना स्वयंभू, रवी-तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्

'मी' च !

विशाल कुलकर्णी ·
कविवर्य विंदा करंदीकर यांची क्षमा मागून त्यांच्या ' मी ' या कवितेचे विडंबन .. मी'च ! कधी येत अस्वस्थता अंतरीची कधी वाढता वाढता व्योम व्यापी कधी धावतो बार गाठावयाला कधी मद्य प्याला स्वहस्तेच चापी कधी याचितो रम कधी स्वप्नी व्हिस्की कधी धावतो जीन टाकून थोडी कधी प्राशितो जॅक डॅनियल भारी कधी गावठी हातभट्टीच मागे कधी दिनवाणा 'निरा'मय होई कधी क्षुब्ध, आतुर , आत्मविलासी कधी गर्जतो वोडकेच्या बळाने; कधी कापतो बोलता पालकांशी ! कधी चाखणा रिक्त थाळ्यांत शोधी; कधी पाहतो शुभ्र लवणात सारे; कधी मोजीतो टेबलाला स्वहस्ते अनुकूल होती मित्र-दोस्त सारे सरेना अंधकार डोळ्यासमोरी मिळेना अंत्यपुच्छ धुम्रपट्टीकेचे;

तुझ्या कळा माझ्या कळा

मूखदूर्बळ ·
(हास्पीटलातल्या दोन पेशण्टा चा स.न्वाद/ मनोगत ) तुझ्या कळा माझ्या कळा गुंफू कळान्च्या माळा ताई (सिस्टर ना ती) आणखि कोणाला मज रे दादा (वॉर्डबॉय) नाठाळा तु़ज बी पी (ब्लड प्रेशर) मज अ‍ॅलर्जी आणिक डायबीटीस दोघाना वेध लागले घरच्याना 'निरोप' मिळेल का आम्हाला तुजे ई सी जी माझे सी ई टी रीपोर्ट येइल कधी नॉर्मला नाहीच आला तर घोटाळा सान्गा तिकडच्या आर एम ओ ला तुला ग्लुको़ज डीस्परीन मला बॉटल नळ्यान्चा वेटोळा आणिक रेचक दोघाना नाही चालला तर एनीमा आला इथे खुप कण्टाळा लेकी-मूले नेतील का घरा दीस अखेरचे काढायला नातवान्बरोबर खेळायला (चु भू द्या घ्या ) मूळ गाणे "तुझ्या गळां, माझ्या गळां गुंफू मोत्यांच्