Skip to main content

हास्य

गारवा - विडंबन

लेखक OBAMA80 यांनी शुक्रवार, 02/03/2018 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रोफेशनल आयुष्याची सुरूवात ज्या डोंबिवलीमध्ये राहून झाली तेथून सकाळची जलद लोकल पकडणे हे एक मोठ दिव्यच. त्या दिव्य अनुभवावरूनच खालील विडंबनाची कल्पना सुचली. मूळ कवी सौमित्र व गायक मिलींद इंगळे यांची माफी मागून सादर करतो....गारवा चे विडंबन. मूळ कविता - गद्य भाग- ऊन जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं भर उन्हात पाउस घेउन......
काव्यरस

(भिती तुझ्याउरी पण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 17/01/2018 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही. या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा? धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती. या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा? फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला . मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा? सोडून नेक वाट,चळते बुद्धी​ जराशी. मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा? जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे. नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा! आता मौनवदनी, सोडून देतं आहे. विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा! मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे. हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा. थांबवू कसातरी मग मी?

प्रिय वेगवान गोलंदाजास -

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 23/12/2017 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वेगवान गोलंदाजास - हॉल लिलीचा वंश सांगसि, मुखी मार्शलची गाथा होल्डिंग गार्नरच्या पाईका तुजला काय जाहले आता? आठव वकार, आठव डोनाल्ड पुनःश्च अक्रम आठवूदे पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे|| कोण कोठला फलंदाज, अंगभर चिलखतसे लावितो शिरस्त्राण घालून उन्मादे पाय पुढे टाकितो | सुसाटणारा चेंडू तुझा पाय तयाचे जखडू दे पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे|| बॅटीच्या सोट्याच्या जीवे करतो बॅट्समन माज पण हत्तीवरही हल्ला चढवी तोच खरा वनराज | बाऊन्सरच्या मार्‍याने बॅट्समन पुन्हा एकदा विव्हळू दे पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे|| प्रेक्षक असतिल त्यां बाजूनी - षटकार त्यांना

( काल रातीला सपान पडलं )

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 11/12/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. ) गेल्या काही दिवसांत मी काही कवींचे व त्यांच्या कवितांचे विडंबन केले. खरे तर एखाद्या कवीचे काव्य दुसऱ्या कोणाला नवनिर्मितीसाठी / विडंबनसाठी प्रोत्साहित करत असेल तर त्याचे श्रेय मूळ कविलाच जाते. त्यामुळे मूळ कवीचे श्रेष्ठत्व आणखीनच वाढते. मूळ कवीने विडंबन हे त्यांच्या कवितेचा अनादर आहे असे मुळीच समजू नये.

नवा कवी

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 06/12/2017 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा ने सर्व साहित्यिकांसाठी खुला मंच उभा करून या युगातील एक महत्कार्य केले आहे. खुला मंच, फुकटात प्रकाशन आणि फुकटात श्रोते. हे म्हणजे नवकवींच्या हाती लेखणी दिल्यासारखेच झाले. आम्ही या सर्व नवकवींचे खंदे समर्थक आहोत.

(धुतले...)

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 02/12/2017 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले पारावरती विसावलो अन तिथेच चुकले खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

आता फक्त घासफूस ...

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 22/11/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी. केल्या रित्या बाटल्या चकण्यांच्या ताटल्या पडे बिअरचाच पाऊस पण आता... आता फक्त घास फुस चापिल्या बोट्या फोडिल्या नळ्या ढेरी तुडुंब करी मन खुश पण आता... आता फक्त घास फुस दिन ते गेले वय ही झाले झाली शरीराची नासधूस अन आता ... आता फक्त घास फुस
काव्यरस

असतेस घरी तू जेव्हा...(विडंबन काव्य)

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 14/11/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे व सलील कुलकर्णी यांची प्रथम माफी मागून सादर करतो आहे त्यांच्या "नसतेस घरी तू जेव्हा" चे विडंबन...... असतेस घरी तू जेव्हा **************** असतेस घरी तू जेव्हां जीव घाबरा घुबरा होतो जगण्याची विरते आशा संसार नकोसा होतो असतेस घरी तू जेव्हां ...../1/ नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ग होतो घराची तावदाने फुटती अन भितींना कंपही सुटतो असतेस घरी तू जेव्हां ...../2/ येतात मुले दाराशी, हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकून भैय्या मग कपड्यांवाचून जातो असतेस घरी तू जेव्हां ...../3/ तुज घाबरून घालविलेल्या मज स्मरती लाखो वेळा तव पैशांने घर हे चालते म्हणूनच तुला ग झेलतो असतेस घरी तू जेव्हां ...../4/ त
काव्यरस

!! बालदीन !!

लेखक नाखु यांनी मंगळवार, 14/11/2017 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
!!बालदीन !! असूया वाटते​ बघुनीया माथी केशसंभार कसा आनंद घेऊ या तरूण मुलांसवे लोपलेल्या केशकुंतलांच्या परागंदा मुळापासून मिळते तुम्हा सुख नित काका अंकल संबोधून किंचित केशकर्तनाचा कृष्ण दिवस आज मस्तक वाळवंटी म्हणती त्यास खालदिन छप्पर असता भाळी,मान वळे तारूण्याची नजर देतसे दाद, नित देव कोंबड्यांची शिलकीच्या तबल्यासम बालतळावर स्कॉलरपणाची सुरेख नक्षी काढू अनुभवांचे मीपण करूनी दिवसाही तारे तोडू उद्याचे आदर्श नागरिक आजच (हि) घडवू -झुल्पांकित (संतप्त खात्री कैवार पसार ) २२ जून २०१७

पावसामुळे काय काय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 08/10/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
पावसामुळे काय काय तुझी झाली ओली अर्धी साडी अन माझाही भिजला पुर्ण खांदा एकाच छत्रीमुळे झाला वांधा वरतून दणका जोरदार पावसाचा साथीला गोल गोल टपोर्या गारा भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा आणीक खोल फसला माझा चिखलात पाय धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला प्रश्न: अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा. १) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा. २) पावसामुळे कसे परिणाम झाले?
काव्यरस