Skip to main content

गंधभारल्या रात्री होत्या...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 21/04/2017 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नपरीच्या वाटेवरती,तारांगण अंथरले होते... गंधभारल्या रात्री होत्या,दिवस जणू मंतरले होते! केस मोकळे..त्यावर गजरा,छत्तिस नखरे,कातिल नजरा... फक्त एवढे कळले..नंतर,रोम-रोम मोहरले होते! विरघळलेली मिठी सैलसर,पुन्हा एकदा अवघडताना... लाज-लाजुनी अलगद कोणी,चंद्र-किरण पांघरले होते! मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! निरोप घेतानाही क्षणभर,पाय तिचा अडखळला तेव्हा... पुन्हा वेचण्यासाठी चुंबन,ओठ तिचे थर-थरले होते! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4811
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

शॉरी :D उत्तम रचना होती म्हणून जरा आचरटपणा केला आहे ;)

मस्त !!! अजून वाढवता येईल का ???

खूप आवडली

मला एकदा म्हणे..कसे रे,सुचते इतके तुला निरंतर? तिच्या निरागस प्रश्नावरही,शेर गुलाबी स्मरले होते! बहोत खूब !

आगाऊ म्हाद्या,संजयजी धन्यवाद!

सुंदर रचना!

पैसा,अनुप,वेल्लाभट,पाषाणभेद सर्वांचे खूप धन्यवाद!