मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

सत्यजित... · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
साचला का एवढा अंधार आहे? काजव्यांचा तेवढा आधार आहे! जागल्या होत्या मशाली काल येथे आज इथला सूर्यही बेजार आहे! एकही ठिणगी कशी येथे पडेना? कोण इथला आंधळा सरदार आहे? फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही श्वास माझाही जरा उबदार आहे! सारखा हिंदोळतो हा प्राण माझा त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे! —सत्यजित

वाचन 3003 वाचनखूण प्रतिक्रिया 9

पडली का घशाला कोरड आहे?
चखण्याचा तेवढा आधार आहे

प्यायली होती विदेशी काल येथे
आज देशीही का महाग आहे?

एकही बार कसा सापडेना
हा कोणता जणू महामार्ग आहे?

फूंकतो आहे कधीचा धूर मीही
खिशात माझीया गायछाप आहे!

सारखा हिंदाळतो हा प्राण माझा
त्या सूलाची वाईनही चवदार आहे!

~~~~मद्यजित (पैजारबुवा)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सारखा हिंदाळतो हा प्राण माझा त्या सूलाची वाईनही चवदार आहे! ~~~~मद्यजित (पैजारबुवा)››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सत्यजित... Sun, 04/09/2017 - 18:39
चांगभलं...! पुढच्या वेळी काफिया इ. सांभाळला तर मजा येईल विडंबनाची! तसा 'या' विषयात जरा तोल गेला ते ठिकै!