Skip to main content

अता ही भेट टळणे शक्य आहे ..

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 24/04/2017 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अता ही भेट टळणे शक्य आहे (तुझे मजला वगळणे शक्य आहे) जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे नको इतकी मुजोरी आरशावर तुझेही रुप ढळणे शक्य आहे असे येऊ नये वेळीअवेळी (कुणी काही बरळणे शक्य आहे) जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे तुला पाहून येथे एकटीला फुलांचे बावचळणे शक्य आहे डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

वाचने 2799
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

>>>जरासा जोर लावावास अजुनी पहा माझे निखळणे शक्य आहे>>>क्या बात है! >>>जरा जपूनीच ये ग्रीष्मात इथल्या तुझी काया वितळणे शक्य आहे>>>बढीया!