त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!
साचला का एवढा अंधार आहे?
काजव्यांचा तेवढा आधार आहे!
जागल्या होत्या मशाली काल येथे
आज इथला सूर्यही बेजार आहे!
एकही ठिणगी कशी येथे पडेना?
कोण इथला आंधळा सरदार आहे?
फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही
श्वास माझाही जरा उबदार आहे!
सारखा हिंदोळतो हा प्राण माझा
त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे!
—सत्यजित
कविता आवडल्याने लगेच हात शिवशिवायला लागले
अगागागागागागागा
@सारखा हिंदाळतो हा प्राण माझा
चीअर्स!
(No subject)
पैजारबुवा रॉक्स !! ☺
पैजारबुवा रॉक्स !! ☺
गझल आवडली.
धन्यवाद!