Skip to main content

ती एकदाच दिसली...

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 24/04/2017 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
ती एकदाच दिसली अन् छंद होत गेला दिनदर्शिका-फुल्यांचा धरबंद होत गेला! होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! शर खोल-खोल रुतला नजरेतला तिच्या अन् एकेक मंद ठोका मग बंद होत गेला! केसांत मोकळ्या त्या मन गुंतवीत गेलो कमळात बंद भुंगा स्वच्छंद होत गेला! टिपतो सुगंध वारा..उबदार ओंजळींनी बागेतल्या कळ्यांचा गुलकंद होत गेला! ती गुणगुणत असावी बहुतेक शेर माझे प्रत्येक शब्द माझा मकरंद होत गेला! केंव्हातरी अचानक येतो सुगंध अजुनी हा कायदा ऋतूंचा,बेबंद होत गेला! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3862
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

वाह!!! अतिशय सुंदर. खूप आवडली. मला आवडलेल्या यातल्या ओळी quote करण्याचा मोह होत होता पण अशाने ही पूर्ण कविताच quote करावी लागली असती :)

"एकेक मंद ठोका मग बंद होत गेला!" ...मनात रु॑जी घालत राहिली !

होती कथा विराणी,झाली गझल रुमानी बहुधा पुन्हा व्यथेला,आनंद होत गेला! वा, छा गये