[शतशब्दकथा स्पर्धा] देवकी
' हे बघ बाजारात भाजीवालीच्या दुकानात होतं ' बायको उत्साहाने बोलली.
मुरलीधर श्रीकृष्णाचं चित्र असणारं पोस्टर होतं ते . दोन चार ठिकाणी फाटलेलंही होतं.
भिंतीवर गणपती , लक्ष्मी , हनुमान होतेच. त्याच रांगेत हेही चिकटलं . मुंबईमधील भाड्याच्या घरात पितळी देव आणि देवघर ही मिजास कशी चालणार ?
कालच युरिन टेस्ट पोझिटिव्ह आलेली !
दुसर्या दिवशी सर्व देवताना साधा नमस्कार केला आणि श्रीकृष्णापुढे मात्र डोके आपटून बोलली ..
' ये रे माझ्या बाळा ! '