तो
शिखर नजरेच्या टप्प्यात...रस्तासुध्धा माहित झालेला...प्रतिस्पर्ध्याला खिजवूनच शिखर सर करणार...गेला महिना मीच गाजवलेला...आजसुध्धा सगळे उन्मादात...त्याला बाजूला मीच करणार...अरे अरे हे काय...माझ्यावर दादागिरी...बघू किती दम आहे...स्साला परत माझ्याशी पंगा...याच्याकडे बघतोच परत तूर्तास त्याच्या पार्टनरला कोपच्यात घेऊ...हाहाहा...बघ तुझे साथीदार कसे नांगी टाकत आहेत...आता तुझी पाळी...थाड...थाड...थाड...आपल्यातले कोणीही जागचे हलले सुध्धा नाही...पार भंजाळलोय...आकाशातल्या बापाची वेळेवर मदत आली...आता या वादळात कसला टिकतोय तो...आम्ही चिरडणारच त्याला...थाड...थाड...थाड...
एक सूर्य कोवळी किरणे सोडून पुर्ण तेजाने तळपण्याची सुरुवात होती ती...उग्गीच नाही आम्ही त्याला देव म्हणत
प्रतिक्रिया
5 Aug 2015 - 12:01 pm | पगला गजोधर
तो / ती / ते
5 Aug 2015 - 12:18 pm | अत्रुप्त आत्मा
-१
पॉइंटआऊट व्हावं ,असं काहिही नाहिये यात..
5 Aug 2015 - 12:21 pm | टवाळ कार्टा
दू दू दू
5 Aug 2015 - 12:23 pm | मृत्युन्जय
+१
5 Aug 2015 - 1:05 pm | gogglya
अजाबात कळले नाही...
6 Aug 2015 - 9:43 am | टवाळ कार्टा
sharjah desert storm
:(
6 Aug 2015 - 6:26 pm | सूड
ओह्ह ओके, पण नक्की काय झालं?
6 Aug 2015 - 11:12 am | जडभरत
मलापण नाय कळलं :(
6 Aug 2015 - 11:37 am | टवाळ कार्टा
"sharjah desert storm" हे वाचूनपण नै समजले?
6 Aug 2015 - 11:41 am | जडभरत
+१
6 Aug 2015 - 10:31 am | मुक्त विहारि
+१
6 Aug 2015 - 11:33 am | प्रचेतस
+१
मस्तच.
6 Aug 2015 - 2:13 pm | खटपट्या
+१
6 Aug 2015 - 6:13 pm | सटक
सही!
6 Aug 2015 - 6:20 pm | प्यारे१
पोचत नाहीये कथा. स्वारी शक्तिमान.
6 Aug 2015 - 8:29 pm | टवाळ कार्टा
चायला शारजा मधले सचिनने केलेले १४३ कोणी बघितले नै काय
6 Aug 2015 - 9:14 pm | प्यारे१
अरे ते कथेमधून पोचत नाय ना पण !
तुझ्या साठी आणखी एक स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मि मंडळापुढे ठेवत आहे. ;)
आएगा तेरा भी नंबर आएगा!
6 Aug 2015 - 9:31 pm | टवाळ कार्टा
इतकी क्रिप्टीक झालीये?
6 Aug 2015 - 8:43 pm | राघवेंद्र
+१
6 Aug 2015 - 9:39 pm | पैसा
उलगडून सांगावं लागलं ना रे सगळंच! आणि सचिन तेंडुलकरच्या खेळीबद्दल असेल तर ही कथा नाही म्हणता येणार.
6 Aug 2015 - 10:08 pm | टवाळ कार्टा
कथा का नै....गोष्ट अर्धवट सोडून क्रमशः असलेल्या शशक आहेतच की
6 Aug 2015 - 10:03 pm | उगा काहितरीच
टकाच्या लेवलचे नाय !
6 Aug 2015 - 10:09 pm | टवाळ कार्टा
मी मिपाच्या लेवलचा नाय ओ....वरुनपण आणि खालूनपण ;)
6 Aug 2015 - 10:08 pm | ऋतुराज चित्रे
देवा रे ! कथेवरुन वाटत नाही सचिन इतका भिकार खेळला असेल.
6 Aug 2015 - 10:10 pm | टवाळ कार्टा
चायला नीट वाचा की... कॅस्प्रोविच आहे तो
7 Aug 2015 - 7:51 pm | पद्मावति
+१
9 Aug 2015 - 11:25 am | तीरूपुत्र
+१ कथा दोनदा वाचली तेव्हा कळली.सचिन ला सलाम......