पाककृती
मटार -कांदे परांठा
हिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते. गेल्या रविवारी भाजी स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला.
गाजर हलवा आणि सुदर्शन क्रिया..
गाजर हलवा ... फ्री फ्री फ्री ... !!!
अर्रर्रर.. फारच पांचट पीजे होता सॉरी सॉरी..
कुळीथः विविध पाककृती
कुळीथ यालाच हुलगा असेही म्हणतात. कोकणात भातकापणीनंतर कुळथाची लागवड केली जाते, त्याबरोबर कडवे, पावटे, लाल चवळी, पांढरी चवळी ही कडधान्येही लावली जातात. पण मुख्य पीक मात्र कुळीथ. बय्राच भागात कुळीथ हे माणसांचे अन्न समजले जात नाही. पण कोकणात लावली जाणारी ही पातळ सालीची कुळथाची जात माणसांना खाण्यासाठीच वापरली जाते. लागवडीपासून सुमारे ९० दिवसांत कुळीथ तयार होतो. कुळीथ उष्ण असून आरोग्यदायी आहे.
मदत हवी आहे - बाळासाठी पाककृती
नमस्कार मंडळी,
सहा महिने ते एक वर्षे वय असणार्या बाळासाठी बनवण्यासारख्या पोषक आणि घरघुती पदार्थांच्या पाककृती हव्या आहेत.
जाणकार मिपाकर सहाय्य करतील अशी आशा आहे.
ह्यापूर्वी जर ह्या विषयावर जर चर्चा झाली असेल तर त्याचा संदर्भ मिळाला तरीही चालेल.
धन्यवाद.
कलेजी
साहित्यः
पाव किलो कलेजी
२ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२ चमचे आल-लसुण पेस्ट
अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल)
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
२ मोठे चमचे तेल
थोडीशी कोथिंबीर चिरून
चवीनुसार मिठ
कोथिंबिर वडी
बाजारात कोथिंबिरीचे ढीग जागोजागी दिसू लागले की कोथिंबिर वड्यांचा बेत हमखास होतो. जपानमध्ये ती दृष्टीसही पडायची नाही. तर जर्मनीत कधीमधी मिळायची, पण हल्ली आमच्या गावात भारतीय, तुर्की, श्रीलंकन दुकानातून चांगली कोथिंबिर मिळते. त्यामुळे हवी तेव्हा कोथिंबिरवडी करता येते. ह्या दिवाळीला खूप वर्षांनी भाऊ भेटणार होता आणि त्याच्या गावात फार कोथिंबिर मिळत नसल्याने त्याच्यासाठी ह्या वड्या केल्या.
बेसन पोळा / पिझ्झा काहीही ......
राम्राम मिपाकर्स , सध्या पावसाळा परत सुरु झालाय ;)
आमच्याकडे शिळ्या पोळ्या उरल्या की नेहमीच त्याचा तिखट चुरा नाही तर तुप गुळ घालुन गोड मलिदा बनवतात.
पण काल धो - धो पाउस कैतरी चमचमीत करावे असे राहुन राहुन वाटत होते पण भजी / वडे तेलकट पदार्थ नकोसे वाट्त होते. काय क्रावे बरे ? असा विचार करता करता आहे त्या साहित्यात ही रेसेपी सुचली न प्रयत्न
मेदुवडे
मेदुवडे एअर फ्रायर मध्ये प्रायोगिक तत्त्वावर केले, पण अजून चांगले कसे होतील ह्यावर प्रयोग चालू होते. मेदुवडा मेकर ह्या नावाखाली शोधत असता गुगलबाबाने डोनटमेकर आणि डोनट मोल्ड दाखवले. म्हणून मग डोनट मोल्डचा वापर करून वडे केले. ते बरे झाले, पण चांगले नाही. म्हणून मग परत दुसर्या मोल्ड मध्ये करून पाहिले. ते छान झाले.
लाल भोपळ्याची बाकर भाजी
पानगळीचा ऋतु आला, लाल भोपळा मिळाला आणि लगेच ही अत्यंत आवडणारी भाजी करण्यात आली. विदर्भात लग्नकार्यात, सणावाराला ही भाजी केली जाते. या भाजीचेही बरेच व्हेरिएशन्स आहेत. जर घरात काही धार्मिक कार्याच्या दिवशी केली, तर फक्त लसूण यातून वगळला जातो, बाकी वेळा लसूण घालून केली जाते. लाल भोपळा अजिबात न आवडणाऱ्या व्यक्तींनाही ही भाजी हमखास आवडते असा अनुभव आहे. तेव्हा अवश्य करून बघा.
अंजीर बर्फी
साहित्यः
सुकामेवा = १ कप
सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन)
खजुर = ७-८
तुप = ३ चमचे
वेलची पावडर = १ छोटा चमचा
जायफळ पावडर = १ छोटा चमचा
कृती:
१. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा.
पेढे
आमच्या देशात पेढे, चितळ्यांची बाकरवडी असले काही पदार्थ मिळत नाहीत मग असे काही खायचे असेल तर दोन पर्याय उरतात एक म्हणजे मायभूत गेले की खाऊन, बांधून घ्या नाहीतर इथे घरी करा.
लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्याला पेढे करायचे म्हणजे खवा घरी करण्यापासून तयारी, मग काहीतरी आयडिया लढवता येते का पाहिले आणि जादूची कांडी फिरून अवघ्या ५ मिनिटात पेढे फक्त वळायचे बाकी राहिले.
रसमाधुरी
नमस्कार मिपाकरांनो !!
तुम्हा सर्वांना दिपावलीच्या अनेक-अनेक शुभेच्छा!! ही दिवाळी आपल्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान, यश, भरभराट घेऊन येवो हिच मंगलमयी शुभेच्छा!!
दिवाळीनिमित्त एक छानशी गोड पाककृती घेऊन आलेय, चला तर साहित्य बघुया :)
साहित्यः
स्टफ्ड खजूर चॉकलेट्स
नमस्कार मंडळी,
सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. हि दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सुख-समृद्धीची, उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो.
तर मंडळी दिवाळी किंवा कुठल्याही आनंदाच्या क्षणी खालील झटपट चॉकलेट्स बनवा आणि आपल्या प्रियजनांसोबत त्यांचा आनंद लूटा, भेट द्या. फार कमी साहित्य वापरुन हि यम्मी चॉकलेट्स बनतात.
कांदे पोहे
घरापसुन लांब राहायला लागल कि आयत मिळणार जेवण आपोआप बंद होत आणि मग मेस किंवा कधी परवडेल तसे हॉटेल हा दिनक्रम मागे लागतो. काही दिवसांनी या सगळ्याचाही कंटाळा येऊ लागतो आणि शेवटी, बास झाल! आता आपण स्वतः जेवण बनवायचं हा विचार डोक्यात येतो. पण लागणार सामान आणि कष्ट बघून मग बरेच दिवस तो नुसता डोक्यातच राहतो!
आवळ्याचे भरीत
दिवाळी आली की बाजारात आवळे दिसायला लागतात आणि ते दिसले की आम्ही खूष कारण आवळ्याचे भरीत, लोणचे हे आई घरी करायला सुरुवात करायची.
फोटो आंतरजालावरुन साभार
आवळ्याचे भरीत म्हणजे तसा थोडा वेगळा पदार्थ पण एकदा चव घेतली की ते कायमचं आवडीचं तोंडीलावणं होत.
ताकाचा मसाला
सध्या उन्हाचा पारा चांगलाच वर चढू लागलाय. अशावेळी थंडपेये हवीशी वाटतात. पण त्यापेक्षा ज्युस, सरबते, आणि ताक हे सगळ्यात उत्तम पेय आहे. ताक नुसते पिण्यापेक्षा त्यात हा घरगुती मसाला घातला तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतील.
साहित्यः दोन वाट्या धने, दोन वाट्या जीरे, पाव वाटी ओवा, एक चमचा हिंग पावडर, एक चमचा सुंठ पावडर, एक चमचा शेंदेलोण, एक चमचा पादेलोण.
- ‹ previous
- 27 of 122
- next ›