स्टफ्ड खजूर चॉकलेट्स

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
9 Nov 2015 - 2:20 pm

नमस्कार मंडळी,

सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. हि दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सुख-समृद्धीची, उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो.

तर मंडळी दिवाळी किंवा कुठल्याही आनंदाच्या क्षणी खालील झटपट चॉकलेट्स बनवा आणि आपल्या प्रियजनांसोबत त्यांचा आनंद लूटा, भेट द्या. फार कमी साहित्य वापरुन हि यम्मी चॉकलेट्स बनतात.

वेल खालील साहित्याचं प्रमाण हे ४०-४५ खजूर ह्या प्रमाणात घेतलेत. तुम्ही ते तुमच्या अंदाजाने कमी/जास्त करू शकता.

Dates 1

साहित्यः
१. खजूर - ४५
२. व्हाईट चॉकलेट कंपाउंड - पाव कि.
३. स्टफिंग साठि - बदामाचे काप, मनुका, काजू किंवा तूम्हाला आवडतील ते ड्राय नट्स
४. टॉपींग साठी - तीळ, डेसीकेटेड कोकोनट, पिस्ता पावडर

कॄती:
१. खजूराच्या आतील बीया काढून नट्स स्टफ करुन घ्या. सर्व खजूर भरुन झाले कि खजूर फ्रिज मधे थोड्या वेळ सेट होण्यासाठि ठेवा

Dates 2 dates 3

२. खजूर सेट होत आहेत तोपर्यंत तीळ आणि डेसीकेटेड कोकोनट ड्राय रोस्ट करुन गार होण्यास ठेवा

dates 4 dates 5

३. गार झालं कि वेगवेगळ्या बाउल मधे काढुन टॉपींग रेडी ठेवा. मी टॉपींग साठि अनुक्रमे भाजलेले खोबरं, तीळ, पिस्ता पावडर आणि चौथ्या बाउल मधे ह्या तिघांचं मिश्रण घेतलयं

dates 6 dates 7

४. ट्रे मधे बटर किंवा बार्चमेंट पेपर पसरवून ठेवा. हि सगळी तयारी झाली कि व्हाईट चॉकलेट बारीक चीरुन किंवा किसून ड्बल बॉयलर किंवा मायक्रोव्हेव मधे मेल्ट करुन घ्या

dates 7 dates 8

५. आता पुढील स्टेप्स ह्या झटपट करायच्या आहेत (चॉकलेट सेट होण्याच्या आत). सेट झालेले खजूर चॉकलेट मधे डिप करुन दोन फोर्क च्या सहायाने ट्रे मधे ठेवा. वरुन आवडत असलेल्या टॉपींग नी कोट करा. फोर्क नी उचलल्यावर अतिरि़क्त चॉकलेट ड्रॉप होईल

dates 9

६. सर्व चॉकलेट कोट झाले की फ्रिज मधे सेट होण्यास ठेवून द्या. पुर्ण सेट झाले की चॉकलेट्स आपोआप सुटतील

dates 10

७. आकर्षक वेष्टनात, डब्यात किंवा गिफ्ट बॉक्स मधे भरुन प्रिय व्यक्तीस दिवाळी भेट द्या. हि खास भेट सगळ्या मिपाकरांस...

dates 11

टीपा:

१. कट टू कट परीस्थीती फार थोड्या वेळा येते. म्हणजे सगळे खजूर पण कोट झालेत आणि चॉकलेट सॉस पण उरला नाहिये. पण जर उरलाच (ज्याची दाट शक्यता असते) तर एका बटर पेपर वर उरलेलं चॉकलेट घाला. वरुन शील्लक राहीलेली टॉपींग एक एक करुन घाला. हलक्या हाताने प्रेस करुन फ्रिज मधे सेट होण्यास ठेवा. सेट झालं की हव्या त्या आकारात कापून चॉकलेट बार किंवा वड्यांचा लुफ्त घ्या.

Dates 12

२. चॉकलेट डब्यात घालून देणार असाल तर तळाशी आणि गोलाकार बटर पेपर घाला जेणेकरुन चॉकलेट्स डब्याला चिकटणार नाहित.

dates 13

३. खजूर कोट करताना पाणी उकळलेलं भांड खालीच ठेवा जेणेकरुन चॉकलेट सतत लिक्वीड फॉर्म मधेच राहील.

४. व्हाईट चॉकलेट एवजी आवडत असल्यास डार्क चॉकलेट कंपाउंडहि वापरु शकता. फार पेशन्स असतील तर खजूर अर्ध्या व्हाईट आणि अर्ध्या डार्क चॉकलेटनी कोट करु शकता. पण प्रेझेंटेशनच्या दृष्टीने हे असं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बो छान दिसतं. म्हणूनच तीळ आणि खोबरं पण हलकं लालसर भाजून घेतलय.

हॅप्पी दिवाली टू ऑल ऑफ यू!!!

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

9 Nov 2015 - 2:34 pm | पद्मावति

आहा, मस्तं पाककृती. सादरीकरणही सुपर्ब.

पियुशा's picture

9 Nov 2015 - 2:43 pm | पियुशा

यम्मी.....

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2015 - 2:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

हा अत्याचारि मनुष्य दिवाळीत पण सोडत नाही. कसले कातिल दिसतात खजूर.

फराळाच्या पदार्थांवर मुखशुद्धी म्हणुन हरकत नाही.

अशाच प्रकारचे खजूर पान पण खाल्याचे आठवते आहे.

पैजारबुवा,

नेहमीचा चॉकलेट्स पेक्षा वेगळा आणि पौष्टीक प्रकार..
नक्की करुन बघेन. :)

पुढच्या वेळी बनवून आणावे अन्यथा लकडीपुलावरुन माघारी पाठवण्यात येईल. ;)

सानिकास्वप्निल's picture

9 Nov 2015 - 3:50 pm | सानिकास्वप्निल

वाह! वाह! झक्कास दिसतायेत स्टफ्ड खजूर चॉकलेट्स, फोटो अगदी जानलेवा :)
मोरोक्कन स्टफ्ड डेट्सची आठवण झाली पाकृ बघून.
छानच आहे पाकृ, खूप आवडली.

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2015 - 4:01 pm | स्वाती दिनेश

यम्मी यम्मी चॉकलेट्स.. मस्त दिसत आहेत.
हॅपी दिवाली!
स्वाती

प्रचेतस's picture

9 Nov 2015 - 4:57 pm | प्रचेतस

अफाट कलाकृति. ऐन दिवाळीत त्रास.

मुक्त विहारि's picture

9 Nov 2015 - 5:04 pm | मुक्त विहारि

बादवे,

आता डोंबोलीला येतांना ही चॉकलेटस आणलीस तरच नंदीला पार्टी.

(स्वगतः दीपक ह्यांच्या बरोबर डोंबोली कट्टा फिक्स झाला आहे आणि ते येतांना ही चॉकलेट्स नक्की आणतील अशी खात्री पण करून घेतली आहे.सर्व सभासदांनी नोंद घेतली असेलच.)

सुबोध खरे's picture

9 Nov 2015 - 6:33 pm | सुबोध खरे

मी पण येणार

सुबोध खरे's picture

9 Nov 2015 - 6:33 pm | सुबोध खरे

मी पण येणार

आता डोंबोली परिसर म्हणजे,

डोंबोलीली केंद्रस्थानी धरून आणि डोंबोली ते कुलाबा ही त्रिज्या पकडून, ह्या वर्तुळात येणारी कांदिवली,बोरिवली,ठाणे, बदलापूर, इत्यादी लहान-सहान गावे.

दिपक.कुवेत's picture

11 Nov 2015 - 11:46 am | दिपक.कुवेत

तुमच्यासाठि काय पण!! (मनातः नंदि पॅलेसच्या पार्टिसाठि कायपण!!)

अगदी आत्ताच असा खजूर खात होते आणि ही पाकृ बघितली.छान सोपी.

हो हो हे नक्की जमेल मला ! इथे या पदार्थाला लागणारं साहित्य मिळेल बहुतेक!
मस्त चॉकलेट्स दीपक !!!!

स्मिता_१३'s picture

9 Nov 2015 - 5:46 pm | स्मिता_१३

सुंदर आणि पौष्टीक

उगा काहितरीच's picture

9 Nov 2015 - 5:48 pm | उगा काहितरीच

चव झक्कास असणार , शिवाय करायलाही सोपी आहे . गावाकडे मिळतील अशा चॉकलेटचे नाव सांगू शकेल का कुणी ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2015 - 6:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्लर्पsssssssssssssssss

रेवती's picture

9 Nov 2015 - 6:35 pm | रेवती

भारी!

मधुरा देशपांडे's picture

9 Nov 2015 - 7:58 pm | मधुरा देशपांडे

काय देखणा फोटो आहे. मस्तच.
बादवे, कुवेतमध्ये फटाके जर्मनीतुन येतात की काय असे नाव बघुन वाटले. :)

दिपक.कुवेत's picture

11 Nov 2015 - 11:47 am | दिपक.कुवेत

धन्यावाद सांगीतल्याबद्द्ल.

चतुरंग's picture

9 Nov 2015 - 10:42 pm | चतुरंग

एकदम हैट्ट पाकृ! चाकलेट मला आवडतेच खजूरही आवडतातच त्यामुळे काँबो आवडायला हरकत नस्से!
शिवाय हा प्रकार मलाही करुन बघता येईल असा वाट्टोय! :)

(मिपापेगिरास्टफ्डखजूरमेंअटका)रंगा

स्रुजा's picture

9 Nov 2015 - 10:59 pm | स्रुजा

क्या बात क्या बात !! कल्पक पाकृ आणि लाजवाब सादरीकरण .. घरात अनायासे सगळं सामान आहे, करुन नक्की नक्की बघणार.

सस्नेह's picture

10 Nov 2015 - 10:14 am | सस्नेह

खल्लास सादरीकरण आणि कातील फोटो !
खास कुवेती वाण दिसतंय.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2015 - 10:28 am | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/respect/respect-064.gifhttp://freesmileyface.net/smiley/respect/respect-064.gifhttp://freesmileyface.net/smiley/respect/respect-064.gif

दिपक.कुवेत's picture

11 Nov 2015 - 11:48 am | दिपक.कुवेत

सर्वांना दिवाळीच्या गोग्गोड शुभेच्छा!

पैसा's picture

11 Nov 2015 - 11:57 am | पैसा

नवरात्रात करायला घेतले होतेस का रे! ;)

दिपक.कुवेत's picture

11 Nov 2015 - 12:02 pm | दिपक.कुवेत

कळतात बरं ही बोलणी!!!