कलेजी

जागु's picture
जागु in पाककृती
2 Dec 2015 - 3:03 pm

साहित्यः
पाव किलो कलेजी
२ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
२ चमचे आल-लसुण पेस्ट
अर्धा लिंबाचा रस (नसला तरी चालेल)
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम मसाला
२ मोठे चमचे तेल
थोडीशी कोथिंबीर चिरून
चवीनुसार मिठ

पाककृती :
प्रथम कलेजी कापून स्वच्छ धुवून घ्यावी. त्याला आल-लसुण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून ठेवावा. भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा बदामी रंग येईपर्यंत तळावा. त्यात हिंग, हळद, मसाला घालून कलेजी परतवावी. आता भांड्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेऊन वाफेवर मिडीयम गॅसवर कलेजी शिजू द्यावी. मधून मधून परतावी. शिजल्यावर मिठ व गरम मसाला व कोथिंबीर घालून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी व परतवून गॅस बंद करावा. झाली कलेजी तय्यार.

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

2 Dec 2015 - 5:51 pm | मांत्रिक

एक्दम झकास दिसतेय पाकृ!!!

रॉजरमूर's picture

2 Dec 2015 - 6:47 pm | रॉजरमूर

कलेजि खल्लास फोटो.

बाय द वे कलेजी कोणती घ्यावी ?
चिकनची की बोकडाची ?

गौरी लेले's picture

2 Dec 2015 - 6:53 pm | गौरी लेले

आहा !

तोंडाला पाणी सुटले हे फोटो पाहुन .

मस्तच पाककृती जागु !

विशाल कुलकर्णी's picture

2 Dec 2015 - 7:22 pm | विशाल कुलकर्णी

ज्जे ब्बात ! लै दिसांनी दिसलीस गो माय !

कविता१९७८'s picture

3 Dec 2015 - 7:28 am | कविता१९७८

मस्तच

तुषार काळभोर's picture

3 Dec 2015 - 8:59 am | तुषार काळभोर

पन आमाला कलेजी आवडत नाय. बोनलेस चिकन/मटन पीस वापरले तर कसं?

दिपक.कुवेत's picture

3 Dec 2015 - 12:41 pm | दिपक.कुवेत

नॉनव्हेज (कधीमधी) खात असलो तरी अजून "कलेजी" खायचं "काळीज" झालेलं नाहिये. सो आपला पास...

सग्ळ्यांना मनापासून धन्यवाद.

शक्यतो चिकनची कलेजी घ्यावी थोडी हलकी असते.

अन्नू's picture

22 Jan 2016 - 11:22 am | अन्नू

हाँ, सही पकडे है!

अभय म्हात्रे's picture

21 Jan 2016 - 1:52 pm | अभय म्हात्रे

कलेजी आधि डिप फ्राय करुन मग वरिल प्रमाणे पाक क्रुति केल्यास आणखि छाण लगते.

अरिंजय's picture

21 Jan 2016 - 8:30 pm | अरिंजय

तोंडाला पाणी सुटले.