पाककृती
रानडुक्कर/हरण इत्यादींची देशी शाकुती रेसिपी हवी आहे
कुणाकडे रानडुक्कर, हरण, साळ, ससा इत्यादी जंगली जनावरांच्या शाकुती (किंवा इतर पाककृती) च्या रेसिपी आहेत का ? सशाचे मास चिकन, मटण च्या तुलनेत फार ड्राय असल्याने सशाचे मटण ची रेसिपी सपशेल फेल झाली. ह्यानिमित्ताने लक्षांत आले कि जंगली जनावरांच्या मासाच्या पाककृतीच्या रेसिपी अनेकदा थोड्या वेगळया असतात. कुणाला ठाऊक असेल/अनुभव असेल तर नक्की सांगावे.
धन्यवाद!
चीज शंकरपाळे
साहित्य :
मैदा :दोन वाटी
चीज किसलेले :एक वाटी
जिरे जाडसर पुड :एक चमचा
मीठ : चविनुसार
तेल :दोन चमचे
खायचा सोडा : चिमुटभर
पातळ पोह्यांचा चिवडा
साहित्य:
पातळ पोहे १/२ किलो
शेंगदाणे भाजलेल (हवे तेवढे)
पंढरपुरी डाळ :एक वाटी
खोबरे काप :आवडीनुसार (वाटीभर पुरे)
काजु पाकळ्या :आवडीनुसार
कढिपत्ता :एक वाटी
मिरचीचे तुकडे :चविनुसार
तिळ :चार चमचे
मीठ, पिठीसाखर
फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद
हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)
भटुरे नाव ऐकल्यावर मैद्याचे छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात. या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात. (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते).
गर्यांच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!
मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गर्यांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गर्यांचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात.
साहित्यः
घोसाळ्याची (पारोश्यांची) भजी
या मोसमात मुबलक प्रमाणात ही भाजी बाजारात दिसते. याची चिंचगुळाची भाजी, दह्यातले भरीत होतेच, पण भजी म्हणजे अहाहा!!!!
साहित्यः
खव्याचे काय करू?
माझ्याकडे गाजर हलवा करायला आणलेला खवा शिल्लक आहे, तरी झटपट करता येतील अशा रेसिपी सूचवाव्यात अशी विनंती.
वांग्याची घोटलेली भाजी
मागच्या आठवड्यात सांगलीला जाणे झाले.तर तिथली हिरवी वांगी घ्यायचीच होती.भिलवडीच्या बाजारात मिळाली वांगी. त्यापुर्वी मागच्या दोन तीन दा जावून ही वांगी दिसली नव्हती म्हणून ख फ वर विचारुन झाले होते वांगी कुठे मिळतील तेव्हा नेहमी प्रमाणे कंजुस काका मदतीला धावून आले.
तर अशी सांगलीची वांगी आणि खान्देशी पध्दतीची ही भाजी.
साहित्य-
वांगी- एक किलो,
हिरवी मिरची १० ते १५,
उपासाच्या सुरळीच्या वड्या
नवरात्र चालू आहे. नऊ दिवस उपास करणाय्रांसाठी थोडी वेगळी पण चविष्ट पाककृती घेऊन आलेय. उपास नसला तरी करून आस्वाद घ्यायला हरकत नाहीच!
साहित्यः
पाऊण वाटी शिंगाडा पीठ, पाव वाटी साबुदाणा पीठ, दोन वाट्या पाणी, एक वाटी ताक, मीठ, दोन ओल्या मिरच्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ओलंखोबरं, दोन चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं.
आमसुलाची चटणी
एक मिपाकर गुरूजी म्हणाले होते जर आपण बाप्पाचे नैवेद्य देतो तर पितृपंधरवड्यात वेगवेगळ्या स्पेशल रेसिपी का नाही देत? मी काल जी चिबडाची कोशिंबीर दिली होती ती आमच्या कोकणात पक्षासाठी केली जाते. तशीच ज्याच्याशिवाय श्राध्द पक्ष पूर्ण होत नाही अशी ही आमसुलाची चटणी!
चिबडाची दह्यातली कोशिंबिर
पावसाळ्यात कोकणात ठरावीक फळभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. पडवळ, दुधी, काकडी, भेंडे, भोपळा, शिराळी, पारोशी त्यापैकीच एक चिबूड! ही काही फार वेगळी पाकृ नाहीय. पण ज्यांनी चिबूड पाहिला नसेल त्यांच्यासाठी! चिबूड नुसता मीठ साखर लावून पण चांगला लागतो.
बैदा रोटी आणि इतर...
प्रिय सर,
"गणपती साठी गावी जात असल्या कारणाने मी आज अर्ध्या दिवसाच्या रजेवर जात आहे" ,
- ‹ previous
- 21 of 122
- next ›